Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 639
ऋषिः - प्रस्कण्वः काण्वः देवता - सूर्यः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - आरण्यं काण्डम्
0

अ꣡यु꣢क्त स꣣प्त꣢ शु꣣न्ध्यु꣢वः꣣ सू꣢रो꣣ र꣡थ꣢स्य न꣣꣬प्त्र्यः꣢꣯ । ता꣡भि꣢र्याति꣣ स्व꣡यु꣢क्तिभिः ॥६३९॥

स्वर सहित पद पाठ

अ꣡यु꣢꣯क्त । स꣣प्त꣢ । शु꣣न्ध्यु꣡वः꣢ । सू꣡रः꣢꣯ । र꣡थ꣢꣯स्य । न꣣प्त्यः꣢꣯ । ता꣡भिः꣢꣯ । या꣣ति । स्व꣡यु꣢꣯क्तिभिः । स्व । यु꣣क्तिभिः ॥६३९॥


स्वर रहित मन्त्र

अयुक्त सप्त शुन्ध्युवः सूरो रथस्य नप्त्र्यः । ताभिर्याति स्वयुक्तिभिः ॥६३९॥


स्वर रहित पद पाठ

अयुक्त । सप्त । शुन्ध्युवः । सूरः । रथस्य । नप्त्यः । ताभिः । याति । स्वयुक्तिभिः । स्व । युक्तिभिः ॥६३९॥

सामवेद - मन्त्र संख्या : 639
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » 5; मन्त्र » 13
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 6; खण्ड » 5;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (सूर्यपर) (सूरः) सूर्य (रथस्य) सौरमंडळरूप रथाला (नष्यः) न नष्ट होणाऱ्या वा व्यर्थ न जाणाऱ्या अशा आपल्या (सप्त) सात (शुन्ध्युवः) शोधक किरणांशी (अयुक्त) पृथ्वी आदी ग्रह-उपग्रहांना संयुक्त करतो (ग्रह-उपग्रहांना सप्तरंगी किरणें देतो) (स्वयुक्तिभिः) अशाप्रकाणे स्वतः संयुक्त केलेल्या (ताभिः) त्या किरणांद्वारे सूर्य (माप्ति) भूमंडळावर उपकार करण्यासाठी यत्नशील असतो.। द्वितीय अर्थ - (जीवात्मापर) (सूरः) प्रेरक परमात्मा (रथस्य) शरीररूप स्थानाला (नप्त्र्यः) न पडू देणाऱ्या (शुन्ध्युवः) ज्ञान-शोधक पाच ज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी या (सप्त) साठांना (अयुक्त) शरीररूप रथास जोडतो आणि (स्वयुक्तिभिः) स्वतः जोडलेल्या (ता भिः) त्या साताद्वारे (याति) आपली जीवन-यात्रा चालत असतो.।। तृतीय अर्थ - (परमात्मपर) (सूरः) सूर्य,चंद्र आदी लोकांचे संचालन करणाऱ्या परमेश्वराने (रथस्य) ब्रह्मांड रूप रथाला (नप्त्र्यः) न पडणाऱ्या (सप्त) सात (शुन्ध्युवः) शुद्ध भूमीशी म्हणजे भूः, भुवः, स्वः, महः, जनः सतपः सत्यम् या प्रमाने एकापेक्षा वर-वर असणाऱ्या सात लोकांशी (अयुक्त) कार्यात संयुक्त केले आहे. (स्वयुक्तिभिः) स्वतः जोडलेल्या त्या सात भूमींशी, लोकांशी तो परमेश्वर (याति) ब्रह्मांड-संचालन रूप क्रिया करीत आहे.।।१३।।

भावार्थ - सूर्य आपल्या सात रंगाच्या किरणांनी सौर मंडळाचे संचालन करतो, तर जीवात्मा मन, बुद्धी व ज्ञानेंद्रियरूप सात तत्त्वांद्वारे शरीराचे संचालन करतो आणि परमेश्वर स्वरचित सात लोकांद्वारे या ब्रह्मांडाचे संचालन करतो.।।१३।।

इस भाष्य को एडिट करें
Top