Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 641
ऋषिः - प्रजापतिः
देवता - इन्द्रः
छन्दः - विराडनुष्टुप्
स्वरः - गान्धारः
काण्ड नाम - 0
0
वि꣣दा꣡ म꣢घवन् वि꣣दा꣢ गा꣣तु꣢꣯मनु꣢꣯शꣳसिषो꣣ दि꣡शः꣢ । शि꣡क्षा꣢ शचीनां पते पूर्वी꣣णां꣡ पुरू꣢वसो ॥६४१
स्वर सहित पद पाठवि꣣दाः꣢ । म꣣घवन् । विदाः꣢ । गा꣣तु꣢म् । अ꣡नु꣢꣯ । शँ꣣सिषः । दि꣡शः꣢꣯ । शि꣡क्षा꣢꣯ । श꣣चीनाम् । पते । पूर्वीणा꣢म् । पु꣣रूवसो । पुरु । वसो ॥६४१॥
स्वर रहित मन्त्र
विदा मघवन् विदा गातुमनुशꣳसिषो दिशः । शिक्षा शचीनां पते पूर्वीणां पुरूवसो ॥६४१
स्वर रहित पद पाठ
विदाः । मघवन् । विदाः । गातुम् । अनु । शँसिषः । दिशः । शिक्षा । शचीनाम् । पते । पूर्वीणाम् । पुरूवसो । पुरु । वसो ॥६४१॥
सामवेद - मन्त्र संख्या : 641
(कौथुम) महानाम्न्यार्चिकः » प्रपाठक » ; अर्ध-प्रपाठक » ; दशतिः » ; मन्त्र » 1
(राणानीय) महानाम्न्यार्चिकः » अध्याय » ; खण्ड » ;
Acknowledgment
(कौथुम) महानाम्न्यार्चिकः » प्रपाठक » ; अर्ध-प्रपाठक » ; दशतिः » ; मन्त्र » 1
(राणानीय) महानाम्न्यार्चिकः » अध्याय » ; खण्ड » ;
Acknowledgment
विषय - प्रथम मंत्रात मार्गदर्शनाकरिता परमेश्वराची प्रार्थना-
शब्दार्थ -
हे (मघवन्) ज्ञानरूप धनाचे स्वामी परमेश्वर, तुम्ही (विदाः) आम्हाला (उपासकांना) जाणून घ्या (गातुम्) आमच्या आचरणाला (विदाः) जाणून घ्या (अमाचे मनोगत ओळखा व आमच्या वागणुकीवर नजर ठेवा) आम्हाला (दिशः) गंतव्य दिशांविषयी (अनुशंसिषः) उपदेश करा (उत्तमचे मार्गदर्शन करा, वा काय करावे, काय न करावे, याविषयी ज्ञान द्या) हे (शघीनांपते) ज्ञानाचे व कर्माचे स्वामी, तुम्ही आम्हाला (शिक्ष) ज्ञानप्राप्ती व कर्म करण्याची प्रेरणा द्या. हे (पुरुवस्ये) प्रचुर धनवान प्रभो, तुम्ही (पूर्वीणाम्) श्रेष्ठ दानाचे स्वामी आहात (योग्य व्यक्तींना योग्य ते दान देता) आम्हालाही त्या दानासाठी पात्र होऊ द्या.।।१।।
भावार्थ - सर्वांनी परमेश्वराकडून कर्तव्य-ज्ञान व कर्म प्रेरणा प्राप्त करून तसेच पुरुषार्थ-परिश्रमाद्वारे संपत्ती अर्जित करून सदाचाराच्या मार्गावर चालत चालत समृद्धिशाली व्हायला हवे.।।१।।
विशेष -
या मंत्रात अनेक क्रियांचा एकच कारक वा कर्ता असल्यामुळे येथे दीपक अलंकार आहे. ‘विदा’च्या आवृत्तीमुळे लाटानुप्रास आहे. ‘पूर्वी’, पुरुव’मधे छेकानुप्रास आहे.।।१।।