Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 648
ऋषिः - प्रजापतिः देवता - इन्द्रः छन्दः - विराडनुष्टुप् स्वरः - गान्धारः काण्ड नाम - 0
0

पू꣡र्व꣢स्य꣣ य꣡त्ते꣢ अद्रिवो꣣ꣳऽशु꣢꣯र्मदा꣢꣯य । सु꣣म्न꣡ आ धे꣢꣯हि नो वसो पू꣣र्तिः꣡ श꣢विष्ठ शस्यते । व꣣शी꣢꣫ हि श꣣क्रो꣢ नू꣣नं꣡ तन्नव्य꣢꣯ꣳ सं꣣न्य꣡से꣢ ॥६४८

स्वर सहित पद पाठ

पू꣡र्व꣢꣯स्य । यत् । ते꣣ । अद्रिवः । अ । द्रिवः । अँशुः꣢ । म꣡दा꣢꣯य । सु꣣म्ने꣢ । आ । धे꣣हि । नः । वसो । पूर्तिः꣢ । श꣣विष्ठ । शस्यते । व꣣शी꣢ । हि । श꣣क्रः꣢ । नू꣣न꣢म् । तत् । न꣡व्य꣢꣯म् । सं꣣न्य꣡से꣢ ॥६४८॥


स्वर रहित मन्त्र

पूर्वस्य यत्ते अद्रिवोꣳऽशुर्मदाय । सुम्न आ धेहि नो वसो पूर्तिः शविष्ठ शस्यते । वशी हि शक्रो नूनं तन्नव्यꣳ संन्यसे ॥६४८


स्वर रहित पद पाठ

पूर्वस्य । यत् । ते । अद्रिवः । अ । द्रिवः । अँशुः । मदाय । सुम्ने । आ । धेहि । नः । वसो । पूर्तिः । शविष्ठ । शस्यते । वशी । हि । शक्रः । नूनम् । तत् । नव्यम् । संन्यसे ॥६४८॥

सामवेद - मन्त्र संख्या : 648
(कौथुम) महानाम्न्यार्चिकः » प्रपाठक » ; अर्ध-प्रपाठक » ; दशतिः » ; मन्त्र » 8
(राणानीय) महानाम्न्यार्चिकः » अध्याय » ; खण्ड » ;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (अद्रिवः) मेघमंडळाचे स्वामी अथवा धर्ममेघ-समाधीत सहाय्यक असलेले परमेश्वर, (यत्) ज्याअर्थी (पूर्वस्य) श्रेष्ठ (ते) तुमच्या (अंशीः) तेजाची एक किरणदेखील (मदाय) (भक्तासाठी वा योगीसाठी) आनंददायक असते, त्यामुळे हे (वसो) निवासक प्रभो (नः) मला/आम्हांला (सुम्ने) मोक्षाच्या सुखात (आ घेहि) स्थित करा. हे (शविष्ठ) बलिष्ठ परमेश्वर, (पूर्तिः) तुमच्याकडून मिळालेले पूर्णत्व (शस्यते) सर्वांद्वारे प्रशंसित होते (तुम्ही दिलेले सर्व श्रेष्ठ व पूर्ण म्हणूनच प्रशंसनीय असते) (शक्रः) सर्वशनितमान असे तुम्ही (नूनम्) निश्चयच आज (वशीहि) माझे वशकर्ता झाला आहात (मला तुम्ही पूर्ण आश्रय दिला आहे) (तत्) यामुळे तुमचा वशवर्ती मी (नव्यम्) मनुष्याला सदा नवीन वाटणाऱ्या पुत्रैषणा, वित्तैषणा, लोकैषणा वा सर्व लौकिक कामनांचा त्याग करून (संन्दसे) सर्वस्व त्याग करीत आहे. आणि आता सन्यास-आश्रमात प्रविष्ट होत आहे. त्या आश्रमात असताना (नव्यम्) स्तवनीय इन्द्र परमेश्वराला (सन्यसे) हृदयात धारण करीत आहे (मी त्यास कधीही विसरणार नाही) श्लेषाद्वारे ‘नव्यम्’ व ‘सन्यसे’ या दोन शब्दांचा हा दुसरा अर्थही घेता येतो.।।८।।

भावार्थ - भोग-विलास वरकरणी रमणीय वाटतो, पण तसा तो नसतो. जे लोक त्या सुखोपभोगाचा त्याग करून, संन्यासाश्रमात प्रविष्ट होऊन निष्काम लोकसेवा करतात, त्यास व्रत मानतात, ते धन्य आहेत. ते एकाप्रकारे ब्रह्मातच लीन असतात.।।८।।

इस भाष्य को एडिट करें
Top