Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 658
ऋषिः - शतं वैखानसः
देवता - पवमानः सोमः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम -
0
अ꣢च्छा꣣ को꣡शं꣢ मधु꣣श्चु꣢त꣣म꣡सृ꣢ग्रं꣣ वा꣡रे꣢ अ꣣व्य꣡ये꣢ । अ꣡वा꣢वशन्त धी꣣त꣡यः꣢ ॥६५८॥
स्वर सहित पद पाठअ꣡च्छ꣢꣯ । को꣡श꣢꣯म् । म꣣धुश्चु꣡त꣢म् । म꣣धु । श्चु꣡त꣢꣯म् । अ꣡सृ꣢꣯ग्रम् । वा꣡रे꣢꣯ । अ꣣व्य꣡ये꣣ । अ꣡वा꣢꣯वशन्त । धी꣣त꣡यः꣢ ॥६५८॥
स्वर रहित मन्त्र
अच्छा कोशं मधुश्चुतमसृग्रं वारे अव्यये । अवावशन्त धीतयः ॥६५८॥
स्वर रहित पद पाठ
अच्छ । कोशम् । मधुश्चुतम् । मधु । श्चुतम् । असृग्रम् । वारे । अव्यये । अवावशन्त । धीतयः ॥६५८॥
सामवेद - मन्त्र संख्या : 658
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 3; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 1; सूक्त » 3; मन्त्र » 2
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 3; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 1; सूक्त » 3; मन्त्र » 2
Acknowledgment
विषय - आता पुन:श्च सोमरसाविषयीच सांगत आहेत.
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ - सोम नाम औषधीच्या रसाविषयी) मी (पाचक वा निर्माता) (मधु श्चुग्म्) मधु स्रवण करणाऱ्या अथवा मधू मिश्रित अशश सोम औषधीच्या रसाला (कोशम् अच्छ) द्रोणकलशामध्ये (भरण्यासाठी (अव्ययेद्वारे) मेंढीच्या केसाने बनलेल्या गाळणीमध्ये (---) सोडतो. अशा माझ्या या (धीतय:) अंगुली (----) सोमरस गाळण्याच्या प्रक्रियेत गुंतलेल्या आहेत. (सोमरसासारखे औषधरूप पेय तयार करताना पाचकाला होणारा आनंद या मंत्रात व्यक्त केला आहे.
द्वितीय अर्थ : ब्रह्मानंन्दपर अर्थ आहे. मी (उपासक) (मधुश्चुठम्) ज्यातून माधुर्य टपकत आहे, अशा ब्रह्मानन्दरूप सोमरसाला (कोशम् अच्छ) मन, बुद्धी आणि ज्ञानेन्द्रियरूप विज्ञानमय कोशात भरण्यासाठक्ष (अव्यये नारे) अनश्वरल तसेच काम-क्रोधादि शत्रूंना दूर ठेवणाऱ्या या माझ्या आत्म्यात (असृग्रम्) ओतत आहे. माझ्या (धीतय:) स्तुती, माझी वाणी (अवावयन्त) प्रभूचे गीत गात आहे. (उपासकाचे हृदय भगवद्भक्तीने ओतप्रोत आहे व त्याची वाणी ईश्वरभक्तीचे गीत गात आहे.) ।।२।।
भावार्थ - ज्याप्रमाणे सोम औषधीचा रस गाळणीद्वारे द्रोणकलश वा पात्रात भरला जातो त्याप्रमाणे उपासकाने आत्म्याच्या माध्यमाने आपल्या मनात व बुद्धीत तो ब्रह्मानंद रस भरून घेतला पाहिजे. (आत्म्याने ब्रह्मानंदाचा जो अनुभव घेतला असेल तो आनंदानुभव मनाला व बुद्धीलाही दिला पाहिजे. यामुळष उपासकाचे व आमचे दर्शन, श्रवण, मनन, निदिध्यासन आदी सर्व व्यवहार आनंदमय होतात. ।।२।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. ।।२।।