Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 679
ऋषिः - उशना काव्यः
देवता - पवमानः सोमः
छन्दः - त्रिष्टुप्
स्वरः - धैवतः
काण्ड नाम -
0
ऋ꣢षि꣣र्वि꣡प्रः꣢ पुरए꣣ता꣡ जना꣢꣯नामृ꣣भु꣡र्धीर꣢꣯ उ꣣श꣢ना꣣ का꣡व्ये꣢न । स꣡ चि꣢द्विवेद꣣ नि꣡हि꣢तं꣣ य꣡दा꣢सामपी꣣च्या꣢३꣱ꣳ गु꣢ह्यं꣣ नाम गो꣡ना꣢म् ॥६७९॥
स्वर सहित पद पाठऋ꣡षिः꣢꣯ । वि꣡प्रः꣢꣯ । वि । प्रः꣣ । पुरएता꣢ । पु꣣रः । एता꣢ । ज꣡ना꣢꣯नाम् । ऋ꣣भुः꣢ । ऋ꣣ । भुः꣢ । धी꣡रः꣢꣯ । उ꣢श꣡ना꣢ । का꣡व्ये꣢꣯न । सः । चि꣣त् । विवेद । नि꣡हि꣢꣯तम् । नि । हि꣣तम् । य꣣त् । आ꣣साम् । अपी꣡च्य꣢म् । गु꣡ह्य꣢꣯म् । ना꣡म꣢꣯ । गो꣡ना꣢꣯म् ॥६७९॥
स्वर रहित मन्त्र
ऋषिर्विप्रः पुरएता जनानामृभुर्धीर उशना काव्येन । स चिद्विवेद निहितं यदासामपीच्या३ꣳ गुह्यं नाम गोनाम् ॥६७९॥
स्वर रहित पद पाठ
ऋषिः । विप्रः । वि । प्रः । पुरएता । पुरः । एता । जनानाम् । ऋभुः । ऋ । भुः । धीरः । उशना । काव्येन । सः । चित् । विवेद । निहितम् । नि । हितम् । यत् । आसाम् । अपीच्यम् । गुह्यम् । नाम । गोनाम् ॥६७९॥
सामवेद - मन्त्र संख्या : 679
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 10; मन्त्र » 3
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 3; सूक्त » 3; मन्त्र » 3
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 10; मन्त्र » 3
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 3; सूक्त » 3; मन्त्र » 3
Acknowledgment
विषय - पुढच्या मंत्रातही गुरुविषयीच सांगितले आहे.
शब्दार्थ -
(शिष्यगण अभिमानाने आपल्या गुरूची महती सांगताहेत) आमचे गुरूदेव (ऋषि:) वेदमंत्राचे द्रष्टा आहेत (म्हणजे वेदमंत्राचा गुह्य अर्थ जाणणारे आहेत.) (विप्र:) ते ब्राह्मण स्वभावाचे आहेत. म्हणजे शांत, संयमी व चारित्र्यसंपन्न आहेत. (जनानाम्) ते लोकांमध्ये वा समाजात (पुर:स्ता) सर्वांपुढे राहणारे अग्रगण्य आहेत. ते (ऋभु:) मेधावी आणि (धीर:) धैर्यशाली आहेत. ते (काव्येन) काव्य रचना करून (उशना) सर्वांचे कल्याण इच्छिणारे आहेत. (स:चित) तेच ती व्यक्ती आहेत की जिला (आसां गोनाम्) या वेदवाणीचा (यत्) जो (अपीच्यम्) त्यात दडलेला (गुह्यम्) गूढ अर्थ आहे, त्याला ती व्यक्ती म्हणजे आमचे गुरूदेव (विवेद) विशेषत्वाने जाणतात. ।।३।।
भावार्थ - अत्यंत गहन अशा वेदार्थाला त्यातील गुह्य अर्थाला हस्तामलकवत म्हणजे अगदी प्रत्यक्षपणे जाणतो, त्या ऋषी मेधावी ब्राह्मणालाच माणसाने आपला गुरू करावा. ।।३।। या खंडात गुरु शिष्यातील संबंधांचे वर्णन आहे. तसेच हेही सांगितले आहे की, माणसे केवळ गुरपासूनच लौकिक विद्या आणि ब्रह्मविद्या जाणून घेऊ शकतात व त्यांना ब्रह्माचा साक्षात्कार होऊ शकतो. यामुळे या खंडाची संगती यापूर्वीच्या खंडाशी आहे, असे समजावे. प्रथम अध्यायातील तृतीय खंड समाप्त
इस भाष्य को एडिट करें