Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 73
ऋषिः - बुधगविष्टिरावात्रेयौ
देवता - अग्निः
छन्दः - त्रिष्टुप्
स्वरः - धैवतः
काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
0
अ꣡बो꣢ध्य꣣ग्निः꣢ स꣣मि꣢धा꣣ ज꣡ना꣢नां꣣ प्र꣡ति꣢ धे꣣नु꣡मि꣢वाय꣣ती꣢मु꣣षा꣡स꣢म् । य꣣ह्वा꣡ इ꣢व꣣ प्र꣢ व꣣या꣢मु꣣ज्जि꣡हा꣢नाः꣣ प्र꣢ भा꣣न꣡वः꣢ सस्रते꣣ ना꣢क꣣म꣡च्छ꣢ ॥७३॥
स्वर सहित पद पाठअ꣡बो꣢꣯धि । अ꣣ग्निः꣢ । स꣣मि꣡धा꣢ । स꣣म् । इ꣡धा꣢꣯ । ज꣡ना꣢꣯नाम् । प्र꣡ति꣢꣯ । धे꣣नु꣢म् । इ꣣व । आयती꣢म् । आ꣣ । यती꣢म् । उ꣣षा꣡स꣢म् । य꣣ह्वाः꣢ । इ꣣व । प्र꣢ । व꣣या꣢म् । उ꣣ज्जि꣡हा꣢नाः । उ꣣त् । जि꣡हा꣢꣯नाः । प्र । भा꣣न꣡वः꣢ । स꣣स्रते । ना꣡क꣢꣯म् । अ꣡च्छ꣢꣯ ॥७३॥
स्वर रहित मन्त्र
अबोध्यग्निः समिधा जनानां प्रति धेनुमिवायतीमुषासम् । यह्वा इव प्र वयामुज्जिहानाः प्र भानवः सस्रते नाकमच्छ ॥७३॥
स्वर रहित पद पाठ
अबोधि । अग्निः । समिधा । सम् । इधा । जनानाम् । प्रति । धेनुम् । इव । आयतीम् । आ । यतीम् । उषासम् । यह्वाः । इव । प्र । वयाम् । उज्जिहानाः । उत् । जिहानाः । प्र । भानवः । सस्रते । नाकम् । अच्छ ॥७३॥
सामवेद - मन्त्र संख्या : 73
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 8;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 8;
Acknowledgment
विषय - ऋषि, देवता, छन्द, स्वर आदीचे विवरण प्रत्येक दशतीच्या आरंभी दिलेले आहे. आपण मराठी अनुवाद छापताना ते द्यायचे की नाही हे ठरवावे.
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) यज्ञाग्नीपरक - (धेनम् इव) दुधाळ गायीप्रमाणे (आयतीम्) येणाऱ्या (उषासं प्रति) उष:काळात (जनानाम्) यजमानांनी अर्पित केलेल्या (समिधा) समिधांद्वारे (अन्ति:) हा यज्ञाग्नी (अबोधि) यज्ञवेदीत प्रबुद्ध झाला आहे. (वयाम्) आपल्या शाखांना (फांद्यांना) अज्जिहाना:) वरच्या दिशेकडे नेणाऱ्या (यहा:इव) विशाल वृक्षांप्रमाणे (मानव:) या यज्ञाग्नीच्या ज्वाळा (नाकम् अच्छ) सूर्याकडे (प्र सस्रते) प्रसारीत होत आहेत. ।।
द्वितीय अर्थ : (परमात्मग्निपरक) (धेनुम् इव) दुधाळ गायीप्रमाणे (आयतीम्) येणाऱ्या (उषासं प्रति) उष:काळात (जमानाम्) उपासकजनांच्या (समिधा) आत्मसमर्पणरूप समिदाधानाद्वारे (अग्नि:) परमात्म अग्नी (अबोधि) हृदय वेदीत प्रबुद्ध झाला आहे. (वयाम्) आपल्या शाखा प्रशाखांना (उज्जिहाना:) उंच नेणाऱ्या (यहाइव) विशाल वृक्षांप्रमाणे (मानव:) परमात्म अग्नीचे तेज (नाकम् अच्छ) जीवात्म्याकडे (प्र सस्रते) प्रसारीत करीत आहे. ।।१।।
भावार्थ - दुधाने परिपूर्ण जिचे स्तन अशा गायीप्रमाणे प्रकाशाने परिपूर्ण उजळलेल्या उषा (उष:काळ) आकाशात व भूमीवर प्रसृत आहेत. अशा या शांतिदायक प्रभातकाळी ज्याप्रमाणे अग्निहोत्रीजन यज्ञवेदीत यज्ञाग्नी प्रज्वलित करतात. त्याप्रमाणे अध्यात्मयाजी लोक हृदयातील परमेश्वराला प्रबुद्ध करतात. जशा उंच विशाल वृक्षांच्या शाखा आकाशाकडे जातात. तसेच यज्ञकुंडात प्रज्वलित यज्ञाग्नीच्या ज्वाळा सूर्याकडे हृदयात प्रबुद्ध परमात्म्याचे तेज जीवात्म्याकडे जातात. ।।१।।
विशेष -
या मंत्रात यज्ञाग्नी व परमात्माग्नी या दोष अर्थांच्या प्रकाशनामुळे येथे श्लेष अलंकार होत आहे आणि धेनुम् इव व यहाइव या शब्दात उपमालंकार आहे. ।।१।।