Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 82
ऋषिः - वामदेवः
देवता - अग्निः
छन्दः - अनुष्टुप्
स्वरः - गान्धारः
काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
0
य꣡दि꣢ वी꣣रो꣢꣫ अनु꣣ ष्या꣢द꣣ग्नि꣡मि꣢न्धीत꣣ म꣡र्त्यः꣢ । आ꣣जु꣡ह्व꣢द्ध꣣व्य꣡मा꣢नु꣣ष꣡क्शर्म꣢꣯ भक्षीत꣣ दै꣡व्य꣢म् ॥८२
स्वर सहित पद पाठय꣡दि꣢꣯ । वी꣣रः꣢ । अ꣡नु꣢꣯ । स्यात् । अ꣣ग्नि꣢म् । इ꣣न्धीत । म꣡र्त्यः꣢꣯ । आ꣣जु꣡ह्व꣢त् । आ꣣ । जु꣡ह्व꣢꣯त् । ह꣣व्य꣢म् । आ꣣नुष꣢क् । अ꣣नु । स꣢क् । श꣡र्म꣢꣯ । भ꣣क्षीत । दै꣡व्य꣢꣯म् ॥८२॥१
स्वर रहित मन्त्र
यदि वीरो अनु ष्यादग्निमिन्धीत मर्त्यः । आजुह्वद्धव्यमानुषक्शर्म भक्षीत दैव्यम् ॥८२
स्वर रहित पद पाठ
यदि । वीरः । अनु । स्यात् । अग्निम् । इन्धीत । मर्त्यः । आजुह्वत् । आ । जुह्वत् । हव्यम् । आनुषक् । अनु । सक् । शर्म । भक्षीत । दैव्यम् ॥८२॥१
सामवेद - मन्त्र संख्या : 82
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 9;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 9;
Acknowledgment
विषय - आमची संतती कशी असावी, याविषयी -
शब्दार्थ -
(यदि) जर (वीर:) एक वीर पुत्र (एक) वेदानुकूल व्रतांचे पालन करणारा (स्यात्) असेल, (मर्त्य:) मरणधर्मा असून जर तो (अग्निम्) यज्ञाग्नीला, राष्ट्रीयत्वाच्या अग्नीला (राष्ट्रप्रेमाला) आणि परमात्म अग्नी (उपासना वृत्ती) आपल्या हृदयात (इन्धीत) प्रदीप्त करणारा असेल, आणि (आनुषक) वैत्यिक, नित्य-नैमित्तिक कर्तव्याचे नेहमी पालन करणारा असून, (हव्यम्) यज्ञाग्नीप्रत सुगंधित, मधुर, पुष्टिकारक आणि आरोग्यवर्धक हवी देत असेल, राजासाठी राजदेय कररूप हवी देणारा असेल व परमेश्वराप्रत मन, बुद्धी, प्राण आदीरूप हवीची (आजुहृ) आहुती सातत्याने देत असेल, तर तो (दैव्यम) प्रकाशक यज्ञाग्नी, राजा व परमेश्वराद्वारे प्रदत्त (शर्म) सुखाचे (भक्षीत) मनसोक्त सेवन करू शकेल. ।।२।।
भावार्थ - आमच्या राष्ट्राचे पुत्र व पुत्री आपले मरण धर्मित्व आठवून (शरीर मरणाधीन आहे, पण मरणारे भय त्यागून) जर वेदात सांगितल्याप्रमाणे आचरण करीत नित्यमेव यज्ञाग्नीत घृत, कस्तुरी, केशर आदीची हवी देत असतील राजाग्नीकरीता रादेव कररूप हवी देत असतील आणि परमात्म अग्नीत आत्मा, मळ, प्राण, बुद्धीरूप हवी समर्पित करीत असतील, तर ते समस्त अभ्युदय (ऐहिक उत्कर्ष) व नि:श्रेयस (मोक्ष) रूप सुखांचा उपभोग घेऊन शकतील. ।।२।।
विशेष -
या मंत्रात श्लेषालंकार आहे. ।।२।।