Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 96
ऋषिः - प्रस्कण्वः काण्वः
देवता - अग्निः
छन्दः - अनुष्टुप्
स्वरः - गान्धारः
काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
0
त्व꣡म꣢ग्ने꣣ व꣡सू꣢ꣳरि꣣ह꣢ रु꣣द्रा꣡ꣳ आ꣢दि꣣त्या꣢ꣳ उ꣣त꣢ । य꣡जा꣢ स्वध्व꣣रं꣢꣫ जनं꣣ म꣡नु꣢जातं घृत꣣प्रु꣡ष꣢म् ॥९६॥
स्वर सहित पद पाठत्व꣢म् । अ꣣ग्ने । व꣡सू꣢꣯न् । इ꣣ह꣢ । रु꣣द्रा꣢न् । आ꣣दित्या꣢न् । आ꣣ । दित्या꣢न् । उ꣣त꣢ । य꣡ज꣢꣯ । स्व꣣ध्वर꣢म् । सु꣣ । अध्वर꣢म् । ज꣡न꣢꣯म् । म꣡नु꣢꣯जातम् । म꣡नु꣢꣯ । जा꣣तम् । घृ꣣तप्रु꣡ष꣢म् । घृ꣣त । प्रु꣡ष꣢꣯म् ॥९६॥
स्वर रहित मन्त्र
त्वमग्ने वसूꣳरिह रुद्राꣳ आदित्याꣳ उत । यजा स्वध्वरं जनं मनुजातं घृतप्रुषम् ॥९६॥
स्वर रहित पद पाठ
त्वम् । अग्ने । वसून् । इह । रुद्रान् । आदित्यान् । आ । दित्यान् । उत । यज । स्वध्वरम् । सु । अध्वरम् । जनम् । मनुजातम् । मनु । जातम् । घृतप्रुषम् । घृत । प्रुषम् ॥९६॥
सामवेद - मन्त्र संख्या : 96
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 10;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 10;
Acknowledgment
विषय - आता राष्ट्रवासी परमात्मरूप अग्नीला प्रार्थना करीत आहेत -
शब्दार्थ -
हे (अग्ने) परमात्मन्, (त्वम्) आपण (तुम्ही) (इह) आमच्या या राष्ट्रात (वसून्) धन- धान्य आदी संपत्तीद्वारे अन्य (ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र) वर्णांना सुखी करणाऱ्या उत्कृष्ट वैश्यजनांना (उत्पन्न करा) तसेच (रुद्रान्) शत्रूनां रडविणारे वीर क्षत्रिय (आदित्यान्) प्रकाशमान सूर्यकिरणाप्रमाणे आपल्या विद्या प्रकाशाने समृद्ध असे ब्राह्मण (उव) आणि (स्वध्वरम्) शुभ यज्ञ करणारे याज्ञिक जन (आम्हाला द्या) (मनुजातम्) मनुष्य - समाजाच्या कल्याणासाठी जन्म घेणारे उपकारी लोक आणि (घृत प्रुषम्) यज्ञामीत अथवा सत्मात्रात घृत आदी पदार्थांचे सिंचन करणारे (जनम्) पुत्र (आमच्या राया राष्ट्रात) (यज) उत्पन्न होऊ द्या।। ६।।
भावार्थ - हे जगाचे संचालक, हे देवाधिदेव परमपिता परमेश्वर, अशी कृपा करू की आमच्या राष्ट्रात धन - दान करून सर्व वर्ण आश्रमांचे पालन करणारे उत्तम वैश्य जन आणि युद्धात शत्रुजेता वीर क्षत्रिय (यांच्या घरी सुयोग्य संताने जन्मावीत) तसेच आदित्यवत् ज्ञान प्रकाशाने परिपूर्ण असे विद्वतर ब्राह्मण उत्पन्न होतील आणि (हे प्रभो, असे करा की ज्यायोगे राज्यात विविध प्रकारचे परोपकार आदी यज्ञ करणारी मानव समाजाचे कल्याण करणारी, अग्निहोत्र परायण, अतिथींचा घृतादीद्वारे सत्कार करणारी सुसंताने सर्व लोकांना प्राप्त होतील.।। ६।। या दशतीमध्ये सोम, अग्नी, वुरण, विष्णु आदी विविध नावाने परमेश्वराचे स्मरण केले आहे तसेच परमेश्वराच्या आश्रयाने अंगिरस योगीजन कसा उर्त्क साधतात याचे वर्णन आणि परमेश्वराच्या गुणांचे वर्णन करीत त्याद्वारे राक्षस - संहार व राष्ट्रोन्नतीसाठी प्रार्थना केली आहे. यामुळे या दशतीच्या विषयांची संगती यापूर्वीच्या दशतीच्या विषयांशी आहे, असे जाणावे.
विशेष -
वसू, रुद्र णि आदित्य या शब्दांचा जो अर्थ वर दिला आहे, त्याविषयी शास्त्राचे प्रमाण उद्धृत करीत आहोत. (वसवः) या शब्दाने वैश्मजन अभिप्रेत आहेत कारण यजुर्वेदाच्या मंत्र संख्या ८-१८ मध्ये वसूकडे धनाची याचना केली आहे. रुद्र शब्दाने येथे क्षत्रिय अभिप्रेत आहेत, कारण वेदांमध्ये रुद्राचे वर्णन या रूपात सापडते. ङ्गहे रुद्र, तुझ्या सेना आमच्या शत्रूंना नष्ट करू देफ (ऋ. २-३३-११) ङ्गत्या रुद्रासमोर आपल्या वाणी प्रस्तुत करा (त्याला प्रार्थना करा) की ज्या रुद्राजनक दृढ धनुष आहे, वेगवान बाण आहेत, जो स्वतः आत्मरक्षणात समर्थ आहे, जो कोणाकडूनही पराभूत होत नाही, जो शत्रूंचा पराजेता असून तीव्र शस्त्रांनी युक्त आहे (ऋ. ७-४६-१) आदित्य शब्दाने येथे ब्राह्मण ग्राह्य आहे, कारण की तैत्रिरीय संहितेमध्ये म्हटले आहे, ङ्गब्राह्मणच आद्त्यि आहेफ (तै. सं. १-१-९-८) ।। ६।।
प्रथम प्रपाठकाचा द्वितीय अर्धाचा पाचवी दशती समाप्त।।
येथे प्रथम प्रपाठक समाप्त झाला।।
प्रथम अध्यायातील दशम खंड समाप्त।।