Loading...
ऋग्वेद मण्डल - 9 के सूक्त 24 के मन्त्र
मण्डल के आधार पर मन्त्र चुनें
अष्टक के आधार पर मन्त्र चुनें
  • ऋग्वेद का मुख्य पृष्ठ
  • ऋग्वेद - मण्डल 9/ सूक्त 24/ मन्त्र 1
    ऋषिः - असितः काश्यपो देवलो वा देवता - पवमानः सोमः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः

    प्र सोमा॑सो अधन्विषु॒: पव॑मानास॒ इन्द॑वः । श्री॒णा॒ना अ॒प्सु मृ॑ञ्जत ॥

    स्वर सहित पद पाठ

    प्र । सोमा॑सः । अ॒ध॒न्वि॒षुः॒ । पव॑मानासः । इन्द॑वः । श्री॒णा॒नाः । अ॒प्ऽसु । मृ॒ञ्ज॒त॒ ॥


    स्वर रहित मन्त्र

    प्र सोमासो अधन्विषु: पवमानास इन्दवः । श्रीणाना अप्सु मृञ्जत ॥

    स्वर रहित पद पाठ

    प्र । सोमासः । अधन्विषुः । पवमानासः । इन्दवः । श्रीणानाः । अप्ऽसु । मृञ्जत ॥ ९.२४.१

    ऋग्वेद - मण्डल » 9; सूक्त » 24; मन्त्र » 1
    अष्टक » 6; अध्याय » 8; वर्ग » 14; मन्त्र » 1

    भावार्थ - परमात्मा उपदेश करतो की, हे माणसांनो! तुम्ही परमेश्वराच्या गुणांचे चिंतन करून आपले मन, वाणी व शरीराची शुद्धी करा. ज्या प्रकारे जल शरीराची शुद्धी करते व परमात्मोपासन मनाची शुद्धी करते व स्वाध्याय अर्थात वेदाध्ययन वाणीची शुद्धी करते त्याचप्रकारे परमेश्वराचे ब्रह्मचर्य इत्यादी गुण शरीर, मन, वाणीची शुद्धी करतात. ‘ब्रह्म’ नाव येथे वेदाचे आहे. वेदनिमित्त जे व्रत इन्द्रिय-संयमांद्वारे केले जाते त्याचे नाव ‘ब्रह्मचर्य’ आहे. या व्रतात इन्द्रियांचा संयम करणे ही अत्यावश्यक असते. त्यासाठी ब्रह्मचर्याचा अर्थ जितेन्द्रियताही आहे. याचा मुख्य अर्थ वेदाध्ययन व्रत ही आहे. वेदाध्ययन व्रत इंद्रियसंयमाद्वारे शरीराची शुद्धी करते, ज्ञानाद्वारे मनाची शुद्धी करते व अध्ययनाद्वारे वाणीची शुद्धी करते. याचप्रकारे परमेश्वराचे सत्य, ज्ञान व अनंत इत्यादी गुण आल्हाद उत्पन्न करून मन, वाणी व शरीराच्या शुद्धीचे कारण बनतात. त्यामुळे उपनिषदांनी ‘सत्य ज्ञानमनन्तं ब्रह्म’ तै. २।१ इत्यादी वाक्यात परमेश्वराच्या सत्य इत्यादी गुणांचे वर्णन केलेले आहे. ॥१॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top