Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 10/ मन्त्र 1
    ऋषिः - वरुण ऋषिः देवता - आपो देवताः छन्दः - निचृत् आर्षी त्रिष्टुप्, स्वरः - धैवतः
    3

    अ॒पो दे॒वा मधु॑मतीरगृभ्ण॒न्नर्ज॑स्वती राज॒स्वश्चिता॑नाः। याभि॑र्मि॒त्रावरु॑णाव॒भ्यषि॑ञ्च॒न् याभि॒रिन्द्र॒मन॑य॒न्नत्यरा॑तीः॥१॥

    स्वर सहित पद पाठ

    अ॒पः। दे॒वाः। मधु॑मती॒रिति॒ मधु॑ऽमतीः। अ॒गृ॒भ्ण॒न्। ऊर्ज॑स्वतीः। राज॒स्व᳕ इति॑ राज॒ऽस्वः᳖। चिता॑नाः। याभिः॑। मि॒त्रावरु॑णौ। अ॒भि। असि॑ञ्चन्। याभिः॑। इन्द्र॑म्। अन॑यन्। अति॑। अरा॑तीः ॥१॥


    स्वर रहित मन्त्र

    अपो देवा मधुमतीरगृभ्णन्नूर्जस्वती राजस्वश्चितानाः । भिर्मित्रावरुणावभ्यषिञ्चन्याभिरिन्द्रमनयन्नत्यरातीः ॥


    स्वर रहित पद पाठ

    अपः। देवाः। मधुमतीरिति मधुऽमतीः। अगृभ्णन्। ऊर्जस्वतीः। राजस्व इति राजऽस्वः। चितानाः। याभिः। मित्रावरुणौ। अभि। असिञ्चन्। याभिः। इन्द्रम्। अनयन्। अति। अरातीः॥१॥

    यजुर्वेद - अध्याय » 10; मन्त्र » 1
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - परमेश्वराचा सर्व मानवांना अथवा एक विद्वानाचा सामान्यजनांना उपदेश) हे मनुष्यांनो, (देवा:) कुशल विद्वानजन (यभि:) ज्या क्रियांद्वारे वा आचरणाद्वारे (मित्रावरूणौ) प्राणवायू आणि उदानवायूला (अभ्यिसिंचन्) सर्वप्रकारे सिंचित करतात(प्राण, उदान वायूंची शक्ती वाढवून कार्यसिद्धी करतात) तसेच विद्वज्जन ज्या क्रियांद्वारे (इन्द्रम्) विद्युत शक्तीचा उपयोग करून (अराती:) शत्रूंना (अनयन्) जिंकतात, त्या क्रिया आणि पद्धतीने तुम्ही सर्वजण (मधुमती:) प्रशंसनीय माधुर्यगुण आणि (उर्जस्वती:) बल-पराक्रम वाढविण्यासाठी (चिताना:) चैतन्य आणण्यासाठी (राजस्व:) ज्ञान आणि उत्कर्ष देणार्‍या (अप:) पाण्याचा अथवा प्राणशक्तीचा (अगृभ्णन्) ग्रहण करा (जल आणि शरीरातील प्राणशक्ती यांच्या समुचित उपयोगाने राज्याचा उत्कर्ष साध्य करा. ॥1॥

    भावार्थ - भावार्थ - मनुष्यांनी विद्वज्जनांच्या (वैज्ञानिकांच्या) साहाय्याने पाण्याविषयी संशोधन-परीक्षण करून तसेच प्राणशक्ती वाढवून, त्यांपासून लाभ द्यावेत अशा रीतीने शत्रूला दूर ठेऊन जसे प्राण आपणास प्रिय असतात, त्याप्रमाणे प्रजेशी प्रीतीपूर्वक आचरण करावे. जल आणि प्राणांचा योग्य तो उपयोग घ्यावा ॥1॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top