Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 10/ मन्त्र 17
    ऋषिः - देवावात ऋषिः देवता - यजमानो देवता छन्दः - आर्षी पङ्क्तिः स्वरः - पञ्चमः
    6

    सोमस्य॑ त्वा द्यु॒म्नेना॒भिषि॑ञ्चाम्य॒ग्नेर्भ्राज॑सा॒ सूर्य॑स्य॒ वर्च॒सेन्द्र॑स्येन्द्रि॒येण॑। क्ष॒त्राणां॑ क्ष॒त्रप॑तिरे॒ध्यति॑ दि॒द्यून् पा॑हि॥१७॥

    स्वर सहित पद पाठ

    सोम॑स्य। त्वा॒। द्यु॒म्नेन॑। अ॒भि। सि॒ञ्चा॒मि॒। अ॒ग्नेः। भ्राज॑सा। सूर्य॑स्य। वर्च॑सा। इन्द्र॑स्य। इ॒न्द्रि॒येण॑। क्ष॒त्राणा॑म्। क्ष॒त्रप॑ति॒रिति॑ क्ष॒त्रऽप॑तिः। ए॒धि॒। अति॑। दि॒द्यून्। पा॒हि॒ ॥१७॥


    स्वर रहित मन्त्र

    सोमस्य त्वा द्युम्नेनाभिषिञ्चाम्यग्नेर्भ्राजसा सूर्यस्य वर्चसेन्द्रस्येन्दिण क्षत्राणाङ्क्षत्रपतिरेध्यति दिद्यून्पाहि ॥


    स्वर रहित पद पाठ

    सोमस्य। त्वा। द्युम्नेन। अभि। सिञ्चामि। अग्नेः। भ्राजसा। सूर्यस्य। वर्चसा। इन्द्रस्य। इन्द्रियेण। क्षत्राणाम्। क्षत्रपतिरिति क्षत्रऽपतिः। एधि। अति। दिद्यून्। पाहि॥१७॥

    यजुर्वेद - अध्याय » 10; मन्त्र » 17
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (आचार्य वा विद्वान राजाला उद्देशून म्हणत आहे) हे राजा, प्रशंसनीय गुण, कर्म आणि स्वभाव असलेल्या तुला मी (आचार्य) (सोमस्य) चंद्राप्रमाणे (घुम्नेन) यशरुप प्रकाशाने (संयुक्त करीत आहे) तुला (अग्ने:) अग्नीप्रमाणे (भ्रानसा) तेजाने आणि (सूर्य्यस्य) सूर्याप्रमाणे (वर्चसा) अध्ययताने (तीव्रता आणि प्रभावत याने) संयुक्त करीत आहे. तसेच मी तुला (इन्द्रस्य) विद्युताप्रमाणे (इन्द्रियेण) मन आणि इंद्रियांसह (पूर्ण सामर्थ्याने) (त्वा) तुला (अभिषिंचामि) राज्याधिकारी करीत आहे. माझ्याप्रमाणे तुम्ही (क्षत्राणाम्) क्षत्रियकुळात उत्पन्न झालेल्या मनुष्यांमधे (क्षत्रपति:) राज्याचे पालन करणारा श्रेष्ठ राजा या रुपात (अत्येधि) सदैव तत्पर रहा. तसेच विद्या आणि धर्माचा विकास करणारे जे कर्म वा योजना आहेत, त्यांचे तू (पाहि) रक्षण कर. (राज्यात क्षत्रियांचा आदर्श नेता हो आणि विद्या धर्म यांची उन्नती कर) ॥17॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. मनुष्यांना (प्रजाजनांना) पाहिजे की त्यांनी शान्ति आदी गुणयुक्त जितेंद्रिय आणि विद्वान पुरुषाला राज्याचा अधिकारी करावे. त्याचप्रमाणे राजासाठी ही आवश्यक आहे की त्याने राज्याधिकार मिळाल्यानंतर आणखी श्रेष्ठ होत विद्या आणि धर्माची उन्नती करणार्‍या प्रजाजनांना नेहमी प्रोत्साहित करावे आणि त्यांची वृद्धी करावी. ॥17॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top