Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 10/ मन्त्र 5
    ऋषिः - वरुण ऋषिः देवता - अग्न्यादयो मन्त्रोक्ता देवताः छन्दः - स्वराट धृति, स्वरः - ऋषभः
    2

    सोम॑स्य॒ त्विषि॑रसि॒ तवे॑व मे॒ त्विषि॑भूर्यात्। अ॒ग्नये॒ स्वाहा॒ सोमा॑य॒ स्वाहा॑ सवि॒त्रे स्वाहा॒ सर॑स्वत्यै॒ स्वाहा॑ पू॒ष्णे स्वाहा॒ बृह॒स्पत॑ये॒ स्वाहेन्द्रा॑य॒ स्वाहा॒ घोषा॑य॒ स्वाहा॒ श्लोक॑ाय॒ स्वाहाशा॑य॒ स्वाहा॒ भगा॑य॒ स्वाहा॑र्य॒म्णे स्वाहा॑॥५॥

    स्वर सहित पद पाठ

    सोम॑स्य। त्विषिः॑। अ॒सि॒। तवे॒वेति तव॑ऽइव। मे॒। त्विषिः॑। भू॒या॒त्। अ॒ग्नये॑। स्वाहा॑। सोमा॑य। स्वाहा॑। स॒वि॒त्रे। स्वाहा॑। सर॑स्वत्यै। स्वाहा॑। पू॒ष्णे। स्वाहा॑। बृह॒स्पत॑ये। स्वाहा॑। इन्द्रा॑य। स्वाहा॑। घोषा॑य। स्वाहा॑। श्लोका॑य। स्वाहा॑। अꣳशा॑य। स्वाहा॑। भगा॑य। स्वाहा॑। अ॒र्य्य॒म्णे स्वाहा॑ ॥५॥


    स्वर रहित मन्त्र

    सोमस्य त्विषिरसि तवेव मे त्विषिर्भूयात् अग्नये स्वाहा सोमाय स्वाहा सवित्रे स्वाहा सरस्वत्यै स्वाहा पूष्णे स्वाहा बृहस्पतये स्वाहेन्द्राय स्वाहा घोषाय स्वाहा श्लोकाय स्वाहाँशाय स्वाहा भगाय स्वाहार्यम्णे स्वाहा ॥


    स्वर रहित पद पाठ

    सोमस्य। त्विषिः। असि। तवेवेति तवऽइव। मे। त्विषिः। भूयात्। अग्नये। स्वाहा। सोमाय। स्वाहा। सवित्रे। स्वाहा। सरस्वत्यै। स्वाहा। पूष्णे। स्वाहा। बृहस्पतये। स्वाहा। इन्द्राय। स्वाहा। घोषाय। स्वाहा। श्लोकाय। स्वाहा। अꣳशाय। स्वाहा। भगाय। स्वाहा। अर्य्यम्णे स्वाहा॥५॥

    यजुर्वेद - अध्याय » 10; मन्त्र » 5
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (एक प्रजाजन म्हणत आहे) हे राजन्, ज्याप्रमाणे आपण (सोमस्य) ऐश्वर्याचा (त्विषि:) प्रकाश (वृछी व विकास) करणारे (असि) आहात, तसा मी (प्रजाजनाने) देखील व्हायला हवे. (तवेव) तुमच्याप्रमाणे (से) माझादेखील ऐश्वर्य व विद्येच्या दृष्टीने विकास व्हावा. आपण ज्याप्रमाणे (अग्नेय) विद्युत शक्तीसाठी (स्वाहा) सत्यवाणी (सिद्धांद) आणि प्रियाचरणयुक्त (हितकारिणी) विद्येचा विकास केला आहे तसेच (सोमाय) औषधींच्या ज्ञानासाठी (स्वाहा) वैद्यकीय विद्या व त्याचे प्रयोग ज्ञान प्राप्त केले आहे (त्याप्रमाणे मी म्हणजे प्रजाजनांनी देखील करायला हवे) (सवित्रे) सूर्यशक्तीचे लाभ प्राप्त करण्यासाठी आपण (स्वाहा) भूगोलविद्येचा आणि (सरस्वत्यै) वेदांचा अर्थ व उत्तम विद्या शिकविणार्‍या वाणीसाठी (स्वाहा) व्याकरण आदी अंगांचे ज्ञान प्राप्त केले आहे (त्याप्रमाणे मी ही प्राप्त करावे) ज्याप्रमाणे आपण (पूष्णे) प्राणांच्या आणि पशूंच्या रक्षणासाठी (स्वाहा) योग आणि पशुपालनविद्येचा तसेच (बृहस्पतये) महान प्रकृती आदींचा स्वामी जो पती म्हणजे परमात्मा त्याला जाणण्यासाठी (स्वाहा) ब्रह्मविद्येचे ज्ञान प्राप्त केले आहे, (तसे मी देखील प्राप्त करावे) ज्याप्रमाणे आपण (इन्द्राय) इंद्रियांचा स्वामी जो जीवात्मा, त्यांच्यासाठी (स्वाहा) विचार विद्येचा आणि (घोषायै) सत्य व प्रिय भाषणयुक्त वाणीसाठी (स्वाहा) सत्योपदेश व व्याख्यानविद्येचे ज्ञान प्राप्त केले आहे (तसे मी देखील करावे) जसे आपण (श्लोकाय) तत्त्वज्ञान, शास्त्र, उत्तम काव्य, गद्य-पद्य आणि छंद रचनेसाठी (स्वाहा) छंदशास्त्र आणि शुभमूल, काव्य-शास्त्र आदींचे आणि (अंशाय) परमाणूंचे तत्व जाणून घेण्यासाठी (स्वाहा) सूक्ष्म पदार्थांचे ज्ञान आणि (भगाय) ऐश्वर्यप्राप्तीसाठी (स्वाहा) पुरुषार्थाचे महत्त्व आणि (अर्य्यम्णे) न्यायाधीश होण्यासाठी (स्वाहा) राजनीतीचे ज्ञान प्राप्त करता, त्याचप्रमाणे मी (व सर्व प्रजाजनांनीदेखील) केले पाहिजे. ॥5॥

    भावार्थ - भावार्थ - (राज्यातील) सर्व मनुष्यांनी (प्रजाजनांनी) अशी इच्छा केली पाहिजे की सत्यवादी व धर्मात्मा राजांचे गुण, कर्म आणि स्वभाव जसे असतात, तसेच आमचे (आम्हा सर्व प्रजाजनांचेही) असायला हवेत. ॥5॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top