यजुर्वेद - अध्याय 11/ मन्त्र 13
यु॒ञ्जाथा॒ रास॑भं यु॒वम॒स्मिन् यामे॑ वृषण्वसू। अ॒ग्निं भर॑न्तमस्म॒युम्॥१३॥
स्वर सहित पद पाठयु॒ञ्जाथा॑म्। रास॑भम्। यु॒वम्। अ॒स्मिन्। यामे॑। वृ॒ष॒ण्व॒सू॒ इति॑ वृषण्ऽवसू। अ॒ग्निम्। भर॑न्तम्। अ॒स्म॒युमित्य॑स्म॒ऽयुम् ॥१३ ॥
स्वर रहित मन्त्र
युञ्जाथाँ रासभँयुवमस्मिन्यामे वृषण्वसू । अग्निम्भरन्तमस्मयुम् ॥
स्वर रहित पद पाठ
युञ्जाथाम्। रासभम्। युवम्। अस्मिन्। यामे। वृषण्वसू इति वृषण्ऽवसू। अग्निम्। भरन्तम्। अस्मयुमित्यस्मऽयुम्॥१३॥
विषय - यानंतर पुढील मंत्रात हे सांगितले आहे की मनुष्यांनी कुठे कुठे कशाकशाचा संग्रह करावा.
शब्दार्थ -
शब्दार्थ - सूर्य आणि वायूप्रमाणे सुखाची वृष्टी करणार्या अथवा सुखातच निवास करणार्या हे शिल्पीजनहो (कारागीर, यांत्रिक, अभियंता आदी लोक हो) आणि त्यांचे स्वामीजनहो (कारखानदार व उद्योगपती), (युवम्) तुम्ही दोघे (अस्मिन्) या (यामे) यानामधे (रासभम्) जल आणि अग्नीच्या वेगगुणरुप अश्वाला जुपणारे आणि (अस्मुयुम्) आम्हा (नागरिकांना) त्या यानातून घेऊन जाणारे तसेच (भरन्तम्) आमचे धारण-पोषण करणारे व्हा. आणि त्यासाठी यानामध्ये (अग्निम्) भौतिक अग्नीचा आणि विद्युतरुप अग्नीचा (युज्जाथाम्) उपयोग करा. (राष्ट्रातील सर्वांसाठी विमानादी यानांची निर्मिती करा व त्यात अग्नी, जल, विद्युत या शक्तींचा कौशल्यपूर्ण उपयोग करा) ॥13॥
भावार्थ - भावार्थ - जे लोक विमान आदी यानांत यंत्र, जल आणि अग्नीचा उपयोग करतात, तेच दुसर्या देशांचा प्रवास करण्यात (वा येणे-जाणे करिता) समर्थ होतात. ॥13॥
इस भाष्य को एडिट करेंAcknowledgment
Book Scanning By:
Sri Durga Prasad Agarwal
Typing By:
N/A
Conversion to Unicode/OCR By:
Dr. Naresh Kumar Dhiman (Chair Professor, MDS University, Ajmer)
Donation for Typing/OCR By:
N/A
First Proofing By:
Acharya Chandra Dutta Sharma
Second Proofing By:
Pending
Third Proofing By:
Pending
Donation for Proofing By:
N/A
Databasing By:
Sri Jitendra Bansal
Websiting By:
Sri Raj Kumar Arya
Donation For Websiting By:
Shri Virendra Agarwal
Co-ordination By:
Sri Virendra Agarwal