Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 12/ मन्त्र 82
    ऋषिः - भिषगृषिः देवता - ओषधयो देवताः छन्दः - विराडनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    2

    उच्छुष्मा॒ ओष॑धीनां॒ गावो॑ गो॒ष्ठादि॑वेरते। धन॑ꣳ सनि॒ष्यन्ती॑नामा॒त्मानं॒ तव॑ पूरुष॥८२॥

    स्वर सहित पद पाठ

    उत्। शुष्माः॑। ओष॑धीनाम्। गावः॑। गो॒ष्ठादि॑व। गो॒स्थादि॒वेति॑ गो॒स्थात्ऽइ॑व। ई॒र॒ते॒। धन॑म्। स॒नि॒ष्यन्ती॑नाम्। आ॒त्मान॑म्। तव॑। पू॒रु॒ष॒। पु॒रु॒षेति॑ पुरुष ॥८२ ॥


    स्वर रहित मन्त्र

    उच्छुष्मा ओषधीनाङ्गावो गोष्ठादिवेरते । धनँ सनिष्यन्तीनामात्मानन्तव पूरुष ॥


    स्वर रहित पद पाठ

    उत्। शुष्माः। ओषधीनाम्। गावः। गोष्ठादिव। गोस्थादिवेति गोस्थात्ऽइव। ईरते। धनम्। सनिष्यन्तीनाम्। आत्मानम्। तव। पूरुष। पुरुषेति पुरुष॥८२॥

    यजुर्वेद - अध्याय » 12; मन्त्र » 82
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    हे (पुरुष) पुरुष, शरीरात शयन करणाऱ्या (राहणाऱ्या) अथवा (सनिष्टान्तीनाम्‌) सेवन केल्यामुळे ज्या शक्ती देतात, त्या (औषधीनाम्‌) विसलला, जव आदी औषधींचे तत्त्व, सार (तू ग्रहणकरीत जा) ज्याप्रमाणे (शुष्मा:) (दूध, घृत देऊन) बळ वाढविणाऱ्या (गाव:) गायी अथवा सूर्यकिरणे आहेत की ज्या (गोष्ठादिव) आपल्या गोठ्यातून पळत-पळत आपल्या वासराकडे जातात आणि किरणें भूमीकडे जातात. त्याप्रमाणे औषधींचे तत्त्व (तव) तुझ्या (आत्मानम्‌) आत्म्याकडे (उदीरते) येत आहे (औषधी तुझ्यासाठीच निर्मित आहेत) तू त्या औषधींचे सेवन करीत जा. ॥82॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. हे मनुष्यांनो, जसे रक्षिता-पालिता गाय दूध आदी देऊन आपल्या वासऱ्यांना आणि मनुष्यांना पोषण देऊन शक्तिमान करते, त्याप्रमाणे या औषधी तुमच्या आत्म्याला आणि शरीराला पुष्ट करतात, शक्तिशाली करतात. (म्हणून तुम्ही औषधींचे सेवन करीत जा) जर कोणी औषध घेणार नाही, तर हळू हळू त्याची शक्ती आणि बुद्धीचा ऱ्हास होत जाईल. यामुळे (लक्षात ठेवा की) औषधी बळ-बुद्धीचे कारण आहे. ॥82॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top