Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 13/ मन्त्र 24
    ऋषिः - इन्द्राग्नी ऋषी देवता - प्रजापतिर्देवता छन्दः - निचृद्धृतिः स्वरः - ऋषभः
    1

    वि॒राड् ज्योति॑रधारयत् स्व॒राड् ज्योति॑रधारयत्। प्र॒जाप॑तिष्ट्वा सादयतु पृ॒ष्ठे पृ॑थि॒व्या ज्योति॑ष्मतीम्। विश्व॑स्मै प्रा॒णाया॑पा॒नाय॑ व्या॒नाय॒ विश्वं॒ ज्योति॑र्यच्छ। अ॒ग्निष्टेऽधि॑पति॒स्तया॑ दे॒वत॑याङ्गिर॒स्वद् ध्रु॒वा सी॑द॥२४॥

    स्वर सहित पद पाठ

    वि॒राडिति॑ वि॒ऽराट्। ज्योतिः॑। अ॒धा॒र॒य॒त्। स्व॒राडिति॑ स्व॒ऽराट्। ज्योतिः॑। अ॒धा॒र॒य॒त्। प्र॒जाप॑ति॒रिति॒ प्र॒जाऽप॑तिः। त्वा॒। सा॒द॒य॒तु॒। पृ॒ष्ठे। पृ॒थि॒व्याः। ज्योति॑ष्मतीम्। विश्व॑स्मै। प्रा॒णाय॑। अ॒पा॒नायेत्य॑पऽआ॒नाय॑। व्या॒नायेति॑ विऽआ॒नाय॑। विश्व॑म्। ज्योतिः॑। य॒च्छ॒। अ॒ग्निः। ते॒। अधि॑पति॒रित्यधि॑ऽपतिः। तया॑। दे॒वत॑या। अ॒ङ्गि॒र॒स्वत्। ध्रु॒वा। सी॒द॒ ॥२४ ॥


    स्वर रहित मन्त्र

    विराड्ज्योतिरधारयत्स्वराड्ज्योतिरधारयत्। प्रजापतिष्ट्वा सादयतु पृष्ठे पृथिव्या ज्योतिष्मतीम् । विश्वस्मै प्राणायापानाय व्यानाय विश्वञ्ज्योतिर्यच्छ । अग्निष्टे धिपतिस्तया देवतयाङ्गिरस्वद्धरुवा सीद ॥


    स्वर रहित पद पाठ

    विराडिति विऽराट्। ज्योतिः। अधारयत्। स्वराडिति स्वऽराट्। ज्योतिः। अधारयत्। प्रजापतिरिति प्रजाऽपतिः। त्वा। सादयतु। पृष्ठे। पृथिव्याः। ज्योतिष्मतीम्। विश्वस्मै। प्राणाय। अपानायेत्यपऽआनाय। व्यानायेति विऽआनाय। विश्वम्। ज्योतिः। यच्छ। अग्निः। ते। अधिपतिरित्यधिऽपतिः। तया। देवतया। अङ्गिरस्वत्। ध्रुवा। सीद॥२४॥

    यजुर्वेद - अध्याय » 13; मन्त्र » 24
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - जी (विराट्) अनेक विद्याविद्‌ असल्यामुळे कीर्तिमंत स्त्री (ज्योति:) विद्येचा प्रकाश (ज्ञान) (अधारमत्‌) स्वत: धारण करते आणि इतरांना करविते आणि जो (स्वराट्) सर्व धर्मयुक्त कार्य आणि शुद्ध आचरण करणारे पुरुष (ज्योति:) विद्युत आदीचा प्रकाश (अधारयत्‌) धारण करतात आणि करवितात (स्वत: विजेचा यथोचित वापर करतात आणि इतरांना त्यापासून लाभ मिळवून देतात) ते दोघे (विद्यावान पत्नी आणि विज्ञानवान पती) संपूर्ण सुख प्राप्त करोत, (ही आमची कामना आहे) यानंतर विद्वान स्त्रीला उद्देशून सामाजिकजन म्हणतात) हे स्त्री, हा जो (अग्नि:) अग्नीप्रमाणे तेजस्वी विज्ञानमय (वैज्ञानिक) (ते) तुझा (अधिपति:) पती आहे, (तया) त्या (देवतया) सुंदर देवस्वरूप पतीसह तू (अड्गिरस्वत्‌) सूत्रात्मा वाढू प्रमाणे (ध्रुवा) दृढतेने (सीद) स्थिर रहा (त्याच्यापासून कधीही वेगळी होऊ नकोस) (पत्नीला उद्देशून) हे पती, अग्निप्रमाणे रक्षण करणारी तेजस्विनी अशी जी तुझी पत्नी आहे, त्या देवीसह तू प्रेमाने राहण्याचा निर्धार करून प्राणाप्रमाणे रहा (म्हणजे प्राण जसे सर्वांना प्रिय असतात तसा व तशी तू पत्नीसह सदैव रहा) (पत्नी उद्देशून) हे पत्नी, (प्रजापति:) प्रजेचे रक्षण करणारा तुझा पती (पृथिव्या:) (पृष्ठे) भूमीवर वा राज्यात (विश्‍वस्मै) जे सर्व अधिकार तुला देईल (तुझ्यावर जी जी जबाबदारी सोपवील), ती ती तू पार पाडत जा) (प्राणाय) सुखाप्राप्तीसाठी (अपानाय) दु:खनिवृत्तीसाठी आणि (व्यानाय) सर्व उत्तम कुल, कर्म, स्वभाव प्राप्त करण्यासाठी (ज्योतिष्मतीम्‌) उत्तम विद्याज्ञान संपन्न (त्वा) तुझ्या पतीने तुला जबाबदारी (सादयतु) सोपवावी (तुला कर्तव्य पूर्ण करण्यासाठी सांगावे) त्या (विश्‍वम्‌) सर्व (ज्योति:) विज्ञानाला तू (यच्छ) ग्रहण कर. आणि या उत्तम विज्ञानाला प्राप्त करण्यासाठी सदा पतीसह रहा आणि (त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी त्याला साहाय्यभूत हो) ॥24॥

    भावार्थ - भावार्थ - जे स्त्री-पुरुष (वा पति-पत्नी) सत्संग, म्हणजे एकमेकास सहकार्य करीत आणि विद्याभ्यासाद्वारे विद्युत आदी शक्ती आणि भौतिकशास्त्राविषयी अधिक रुची (वा शोध, प्रयोगाकरिता विशेष प्रघटन) करतात, ते या जमात अवश्‍य सुखी होतात. पतीने पत्नीचा आणि पत्नीने पतीचा संघ आदर-सत्कार करावा (एकमेकास विद्याभ्यासासाठी प्रेरणा द्यावी व चांगले केल्याबद्दल आदर-सत्कार करावा (एकमेकास विद्याभ्यासासाठी प्रेरणा द्यावी व चांगल्याबद्दल उत्साह वाढवावा) अशाप्रकारे प्रेमाची वागणूक देत दोघांनी सुख अनुभवाने ॥24॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top