यजुर्वेद - अध्याय 15/ मन्त्र 21
ऋषिः - परमेष्ठी ऋषिः
देवता - अग्निर्देवता
छन्दः - निचृदगायत्री
स्वरः - षड्जः
2
अ॒यम॒ग्निः स॑ह॒स्रिणो॒ वाज॑स्य श॒तिन॒स्पतिः॑। मू॒र्धा क॒वी र॑यी॒णाम्॥२१॥
स्वर सहित पद पाठअ॒यम्। अ॒ग्निः। स॒ह॒स्रिणः॑। वाज॑स्य। श॒तिनः॑। पतिः॑। मू॒र्द्धा। क॒विः। र॒यी॒णाम् ॥२१ ॥
स्वर रहित मन्त्र
अयमग्निः सहस्रिणो वाजस्य शतिनस्पतिः । मूर्धा कवी रयीणाम् ॥
स्वर रहित पद पाठ
अयम्। अग्निः। सहस्रिणः। वाजस्य। शतिनः। पतिः। मूर्द्धा। कविः। रयीणाम्॥२१॥
विषय - मनुष्याने काय करावे (त्याची कर्तव्ये कोणती) पुढील मंत्रात हा विषय मांडला आहे-
शब्दार्थ -
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, ज्याप्रमाणे (अयम्) हा (अग्नि:) अग्नी हेमंत ऋतूत (सहस्रिण:) प्रशंसनीय अशा असंख्य पदार्थांनी युक्त असतो आणि (शतिंन:) उत्तम गुणांसहित विद्यमान (वाजस्य) अन्न-धान्याचा आणि (रयीणाम्) धनाचा (पति:) रक्षक असतो, आणि जो अग्नी (मूर्द्धा) शरीरातील अंगापैकी उत्तम अंग म्हणजे शिराप्रमाणे (कवि) समर्थ आहे, त्या अग्नीप्रमाणे, हे मनुष्यांनो, तुम्ही देखील व्हा (अग्नीप्रमाणे उत्तम उपकारक गुण धारण करा) ॥21॥
भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे योग्य त्या रीतीने आणि तंत्रविद्यादीद्वारे उपयोगात आणलेला अग्नी प्रभूत अन्न व समृद्धीची प्राप्ती करून देतो, त्याप्रमाणे मनुष्यांनीदेखील जर मनुष्यांनी ज्ञान आणि पुरुषार्थपूर्वक त्या अग्नीचा उपयोग केला, नंतर तो त्यांनाही ऐश्वर्यवान करतो. ॥21॥
इस भाष्य को एडिट करेंAcknowledgment
Book Scanning By:
Sri Durga Prasad Agarwal
Typing By:
N/A
Conversion to Unicode/OCR By:
Dr. Naresh Kumar Dhiman (Chair Professor, MDS University, Ajmer)
Donation for Typing/OCR By:
N/A
First Proofing By:
Acharya Chandra Dutta Sharma
Second Proofing By:
Pending
Third Proofing By:
Pending
Donation for Proofing By:
N/A
Databasing By:
Sri Jitendra Bansal
Websiting By:
Sri Raj Kumar Arya
Donation For Websiting By:
Shri Virendra Agarwal
Co-ordination By:
Sri Virendra Agarwal