Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 15/ मन्त्र 50
    ऋषिः - परमेष्ठी ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - भुरिगार्षी त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    3

    तं पत्नी॑भि॒रनु॑ गच्छेम देवाः पु॒त्रैर्भ्रातृ॑भिरु॒त वा॒ हिर॑ण्यैः। नाकं॑ गृभ्णा॒नाः सु॑कृ॒तस्य॑ लो॒के तृ॒तीये॑ पृ॒ष्ठेऽअधि॑ रोच॒ने दि॒वः॥५०॥

    स्वर सहित पद पाठ

    तम्। पत्नी॑भिः। अनु॑। ग॒च्छे॒म॒। दे॒वाः॒। पु॒त्रैः। भ्रातृ॑भि॒रिति॒ भ्रातृ॑ऽभिः। उ॒त। वा॒। हिर॑ण्यैः। नाक॑म्। गृ॒भ्णा॒नाः। सु॒कृ॒तस्येति॑ सुऽकृ॒तस्य॑। लो॒के। तृ॒तीये॑। पृ॒ष्ठे। अधि॑। रो॒च॒ने। दि॒वः ॥५० ॥


    स्वर रहित मन्त्र

    तम्पत्नीभिरनु गच्छेम देवाः पुत्रैर्भ्रातृभिरुत वा हिरण्यैः । नाकङ्गृभ्णानाः सुकृतस्य लोके तृतीये पृष्ठे अधि रोचने दिवः ॥


    स्वर रहित पद पाठ

    तम्। पत्नीभिः। अनु। गच्छेम। देवाः। पुत्रैः। भ्रातृभिरिति भ्रातृऽभिः। उत। वा। हिरण्यैः। नाकम्। गृभ्णानाः। सुकृतस्येति सुऽकृतस्य। लोके। तृतीये। पृष्ठे। अधि। रोचने। दिवः॥५०॥

    यजुर्वेद - अध्याय » 15; मन्त्र » 50
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (देवा:) विद्वज्जन, जसे तुम्ही सर्व विद्वान (तम्) त्या अग्नीचे (गृभ्णाना:) ग्रहण करीत (दिन:) सुंदर उत्तम (सुकृतस्य) वेदोक्त सुकर्म करण्यात (अधि) व्यक्त आहात आणि (रोचने) प्रिय व सुंदर (तृतीये) विज्ञानाद्वारे प्राप्त (पृष्ठे) इच्छित (लोके) स्थानात स्थानापन्न आहांत अथवा (विचारणीय श्रेष्ठ पदावर स्थित आहात (तसे आम्ही इतर सर्वजनांनीदेखील असायला हवे) त्याचप्रमाणे जसे आपण विद्वान लोक (पत्नीभि:) आपापल्या पत्नीसह आणि (पुत्रै:) वुद्धावस्थेत होणार्‍या दु:खापासून रक्षण करणार्‍या मुलांसह तसेच (भ्रातृभि:) भाऊ-भावंडे (उत, वा) आणि इतर नातेवाईकांसह आनंदात आहात (तसे आम्हीही व्हावे) याशिवाय जसे तुम्ही (हिरण्यै:) सुवर्ण आदी धनामुळे (नीकम्) आनंद भोगत आहात, तसे आम्ही सर्व सामान्यजनांनीदेखील (पत्नी, पुत्र, भाऊ, नातेवाईक यांच्यासह पुष्कळ धन-संपत्ती प्राप्त करीत (अनु, गच्छेम) तुमचे अनुसरण करावे. ॥50॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे विद्यावान शहाणी माणसें आपल्या पत्नी, पुत्र, भाऊ, मुलगी, आई-वडील, सेवक आणि शेजार्‍यांना सद्विद्या व सदाचार शिकवून त्यांना धर्मात्मा व पुरुषार्थी करतात, त्याप्रमाणे इतरांनीदेखील करावे (जे ध्यान, विद्या, शक्ती आदीद्वारे सुसंपन्न आहेत, त्यानी समाजातील वंचित दुर्लक्षितजनांना विद्यावान, धनवान करून सुखी करावे) ॥50॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top