Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 16/ मन्त्र 61
    ऋषिः - परमेष्ठी प्रजापतिर्वा देवा ऋषयः देवता - रुद्रा देवताः छन्दः - निचृदार्ष्यनुस्टुप् स्वरः - गान्धारः
    2

    ये ती॒र्थानि॑ प्र॒चर॑न्ति सृ॒काह॑स्ता निष॒ङ्गिणः॑। तेषा॑ सहस्रयोज॒नेऽव॒ धन्वा॑नि तन्मसि॥६१॥

    स्वर सहित पद पाठ

    ये। ती॒र्थानि॑। प्र॒चर॒न्तीति॑ प्र॒ऽचर॑न्ति। सृ॒काह॑स्ता॒ इति॑ सृ॒काऽह॑स्ताः। नि॒ष॒ङ्गिणः॑। तेषा॑म्। स॒ह॒स्र॒यो॒ज॒न इति॑ सहस्रऽयोज॒ने। अव॑। धन्वा॑नि। त॒न्म॒सि॒ ॥६१ ॥


    स्वर रहित मन्त्र

    ये तीर्थानि प्रचरन्ति सृकाहस्ता निषङ्गिणः । तेषाँ सहस्रयोजने व धन्वानि तन्मसि ॥


    स्वर रहित पद पाठ

    ये। तीर्थानि। प्रचरन्तीति प्रऽचरन्ति। सृकाहस्ता इति सृकाऽहस्ताः। निषङ्गिणः। तेषाम्। सहस्रयोजन इति सहस्रऽयोजने। अव। धन्वानि। तन्मसि॥६१॥

    यजुर्वेद - अध्याय » 16; मन्त्र » 61
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (सृकाहस्ता:) हातात वज्र धारण करून आणि (निषड्निण:) उत्कृष्ट बाण व भाता धारण करून (ये) जे सैनिक (तीर्थ्यानि) दु:खसागरातून पार नेणारे वेदाचार्य आहेत की जे सत्यभाषण आणि ब्रह्मचर्य आदी उत्तम नियमांचे पालन करतात. (त्यांच्या रक्षणासाठी आम्ही सैनिक आपले धनुष्य आदी अस्त्र सदा तत्पर ठेवतो) तसेच तीर्थ्य म्हणजे समु्द्र पार करण्याची जी साधनें, नौका आदी आहेत, त्याद्वारे जे लोक (तात्विक, व्यापारी, व्यवसायी आदी लोक) व्यापार वा प्रचार करतात, (तेषाम्) त्यांच्या रक्षणासाठी आम्ही (सहस्र योजने) हजार योजन विस्तृत अशा देशामधे) धन्वानि) आमचे धनुष्य आदी अस्त्र शस्त्र (अव, तन्मसि) तयार ठेवतो. (आमच्यामुळे वेदाध्यायी आणि व्यावसायिक लोक निर्भय व सुरक्षित राहतात) ॥61॥

    भावार्थ - भावार्थ - मनुष्यांसाठी तीर्थ दोन प्रकारचे आहेत पहिले ते की जे ब्रह्मचर्य, गुरुसेवा, वेदाध्ययन-अध्यापन, सत्संग, ईश्वरोपासना, सत्यभाषण आदी सद्गुणांचा उपदेश देऊन व आचरण करण्याचे सांगून मनुष्याला दु:खसागरातून पैलतीरास (सुखाकडे) नेतात, ते तीर्थ आहेत. दुसरे तीर्थ-नौका आदी वाहन की ज्याद्वारे समुद्र, नदी, जलाशय आदीच्या पलीकडे जातात. ॥61॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top