Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 18/ मन्त्र 20
    ऋषिः - देवा ऋषयः देवता - यज्ञानुष्टानात्मा देवता छन्दः - स्वराडतिधृतिः स्वरः - षड्जः
    5

    आ॒ग्र॒य॒णश्च॑ मे वैश्वदे॒वश्च॑ मे ध्रु॒वश्च॑ मे वैश्वान॒रश्च॑ मऽऐन्द्रा॒ग्नश्च॑ मे म॒हावै॑श्वदेवश्च मे मरुत्व॒तीया॑श्च मे॒ निष्के॑वल्यश्च मे सावि॒त्रश्च॑ मे सारस्व॒तश्च॑ मे पात्नीव॒तश्च॑ मे हारियोज॒नश्च॑ मे य॒ज्ञेन॑ कल्पन्ताम्॥२०॥

    स्वर सहित पद पाठ

    आ॒ग्र॒य॒णः। च॒। मे॒। वै॒श्व॒दे॒व इति॑ वैश्वऽदे॒वः। च॒। मे॒। ध्रु॒वः। च॒। मे॒। वै॒श्वा॒न॒रः। च॒। मे॒। ऐ॒न्द्रा॒ग्नः। च॒। मे॒। म॒हावै॑श्वदेव॒ इति॑ म॒हाऽवै॑श्वदेवः। च॒। मे॒। म॒रु॒त्व॒तीयाः॑। च॒। मे॒। निष्के॑वल्यः। निःके॑वल्य॒ इति॒ निःऽके॑वल्यः। च॒। मे॒। सा॒वि॒त्रः। च॒। मे॒। सा॒र॒स्व॒तः। च॒। मे॒। पा॒त्नी॒व॒त इति॑ पात्नीऽव॒तः। च॒। मे॒। हा॒रि॒यो॒ज॒न इति॑ हारिऽयोज॒नः। च॒। मे॒। य॒ज्ञेन॑। क॒ल्प॒न्ता॒म् ॥२० ॥


    स्वर रहित मन्त्र

    आग्रयाणश्च मे वैश्वदेवश्च मे धु्रवश्च मे वैश्वानरश्च मऽऐन्द्राग्नश्च मे महावैश्वदेवश्च मे मरुत्वतीयाश्च मे निष्केवल्यश्च मे सावित्रश्च मे सारस्वतश्च मे पत्नीवतश्च मे हारियओजनश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् ॥


    स्वर रहित पद पाठ

    आग्रयणः। च। मे। वैश्वदेव इति वैश्वऽदेवः। च। मे। ध्रुवः। च। मे। वैश्वानरः। च। मे। ऐन्द्राग्नः। च। मे। महावैश्वदेव इति महाऽवैश्वदेवः। च। मे। मरुत्वतीयाः। च। मे। निष्केवल्यः। निःकेवल्य इति निःऽकेवल्यः। च। मे। सावित्रः। च। मे। सारस्वतः। च। मे। पात्नीवत इति पात्नीऽवतः। च। मे। हारियोजन इति हारिऽयोजनः। च। मे। यज्ञेन। कल्पन्ताम्॥२०॥

    यजुर्वेद - अध्याय » 18; मन्त्र » 20
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (मे) माझी वा मी (आग्रयण:) आग्रहायण (मार्गशीर्ष) आदी महिन्यात केलेला यज्ञ (च) आणि त्याकरिता उपयोगात आणलेले साहित्य, (साधन आदी) तसेच (मे) माझा वा मी (वैश्वदेव:) समस्त विद्वज्जनांशी करीत असलेला विचार-विमर्ष वा चर्चा (च) आणि त्याचा परिणाम (माझ्यासाठी सुखकर होवो) (मे) माझा (ध्रुव:) स्थायी आचरण (पवित्र शुद्ध स्वभाव) (च) आणि त्यासाठी आवश्यक साधने (भाव, विचार वा प्रवृत्ती) तसेच (मे) माझा वा मी करीत असलेला (वैश्वानर:) सर्व योग्य माणसांचा सत्कार (च) आणि सत्कार करणारा (मी वा माझी माणसे, माझ्यासाठी हितकर व्हावीत) (मे) माझा वा मी (ऐन्द्राग्न:) पवन आणि विद्युतशक्तीद्वारे करीत असलेले काम (च) आणि त्यासाठी लागणारी आवश्यक ती साधनें, तसेच (महावैश्वदेव:) सार्‍या मोठ्या माणसांनी केलेली कामें वा आचरण (च) आणि त्याकरिता आवश्यक ती साधने (माझ्यासाठी उपयोगी वा हितकर व्हावीत) (मे) माझे (मरूत्वतीया:) पवनांशी संबंधित सर्व कार्य (च) आणि त्यापासून मला मिळणारे लाभ, तसेच (मे) माझी (निष्कैवल्य:) ज्यात निरंतर सुखाची प्राप्ती होते, अशी कामें (च) आणि त्यासाठी आवश्यक ती साधनें (मला सुखकर वा समर्थ व्हावीत) (मे) माझा वा मला (सावित्र:) सूर्यापासून मिळणारा प्रभाव (च) आणि त्यापासून मिळणारे लाभ, तसेच (मे) माझे (सारस्वत:) वाणीविषयक अशी सर्व कामें (च) आणि त्यापासून मला होणारे सर्व लाभ (माझ्यासाठी हितकर व्हावेत) (मे) माझे (पत्नीव्रत:) उत्तम यज्ञविषयी कार्य करणार्‍या स्त्रीच्या (पत्नीच्या) पती प्रमाणे (दृढ व्रत वा संकल्प) (च) आणि त्या व्रताच्या पूर्ततेसाठी आवश्यक कार्य (च) आणि त्यासाठी आवश्यक ती साधनें, तसेच (वे) माझे (हारियोजन:) घोड्यांना रथात जुपण्याचे आरंभ केलेले काम (च) त्यासाठी लागणारे साहित्य (यज्ञेन) पदार्थांच्या मिश्रण कलेद्वारे मला (कल्पन्ताम्) सुखकर व फलदायी होवोत) ॥20॥

    भावार्थ - भावार्थ - जे लोक कार्य, काल आणि क्रिया यांच्याविषयी नियमानुकूल वागतात आणि विद्वज्जनांच्या संगतीत राहतात, आणि विवाहिता स्त्रीप्रमाणे (स्वीकृत कार्याशी एकनिष्ठ) असतात, ते पदार्थविद्या (भोतिकशास्त्र) चे ज्ञान वलाभ प्राप्त करून सुखी आनंदी का बरे होणार नाहीत ॥20॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top