Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 19/ मन्त्र 10
    ऋषिः - हैमवर्चिर्ऋषिः देवता - सोमो देवता छन्दः - आर्ष्युष्णिक् स्वरः - ऋषभः
    7

    या व्या॒घ्रं विषू॑चिक॒ोभौ वृकं॑ च॒ रक्ष॑ति। श्ये॒नं प॑त॒त्रिण॑ꣳ सि॒ꣳहꣳ सेमं पा॒त्वꣳह॑सः॥१०॥

    स्वर सहित पद पाठ

    या। व्या॒घ्रम्। विषू॑चिका। उ॒भौ। वृक॑म्। च॒। रक्ष॑ति। श्ये॒नम्। प॒त॒त्रिण॑म्। सि॒ꣳहम्। सा। इ॒मम्। पा॒तु॒। अꣳह॑सः ॥१० ॥


    स्वर रहित मन्त्र

    या व्याघ्रँविषूचिकोभौ वृकञ्च रक्षति । श्येनम्पतत्रिणँ सिँहँ सेमम्पात्वँहसः ॥


    स्वर रहित पद पाठ

    या। व्याघ्रम्। विषूचिका। उभौ। वृकम्। च। रक्षति। श्येनम्। पतत्रिणम्। सिꣳहम्। सा। इमम्। पातु। अꣳहसः॥१०॥

    यजुर्वेद - अध्याय » 19; मन्त्र » 10
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (प्रजेतील, विद्वान शुभकामना करीत आहे) (आमच्या राज्यातील) (या) जी (विषूचिका) विविध अर्थांची सूचना देणारी वा बहुज्ञ अशी राणी आहे, ती (व्याघ्रम्‌) जो उडी मारून प्राण्यांना मारतो, त्या वाघाचे आणि (वृकम्‌) शेळी, बकरा आदी पशूंची शिकार करतो, त्या लांडग्याचे (उभौ) म्हणजे वाघ आणि लांडग्याचे (रक्षति) रक्षण करते (वन्य जीव जंतूंच्या रक्षणाचे, वृद्धीचे उत्तरदायित्व राणीकडे असते) तसेच ती राजमहिषी (पतत्रिम्‌) अत्यंत वेगाने धावणाऱ्या वा उडणाऱ्या पक्ष्यांचे (श्यनम्‌) आणि अन्य पक्ष्यांची शिकार करणाऱ्या बहिरी ससाणा पक्ष्याचे तसेच (सिहम्‌) हत्ती आदीना ठार मारणाऱ्या प्राण्याचे, सिंहाचे (च) देखील (रक्षति) दुष्ट व हानिकारक पशूंना नष्ट करून प्रजेचे रक्षण करते (सा) ती राणी (इमम्‌) या आमच्या राजाचे देखील (अंहसः) पापकर्म वा अपराध करण्यापासून (पातु) रक्षण करो. (राज्यातील वा अपराध करण्यापासून (पातु) रक्षण करो. (राज्यातील वन्य जीवांचे रक्षण, वृद्धी आदीसाठी दुष्ट पशूंना ठार मारावे. तसेच राणीने आपल्या पतीलाही अपराध करण्यापासून निवृत्त करावे) ॥10॥

    भावार्थ - भावार्थ - ज्या प्रमाणे एक शूरवीर राजा स्वतः दुष्ट हिंसक प्राण्यांना ठार करतो, न्याय्यमार्गाने प्रजेचे रक्षण करतो आणि आपल्या पतीला (राणीला) प्रसन्न ठेवण्यात यशस्वी होतो, तद्वत राणीने देखील व्हावे (आपल्या पतीला प्रसन्न ठेवावे, दुष्ट विनाशक पशूंचा नाश करावा आणि प्रजेचे रक्षा करावी) ज्याप्रमाणे एक राणी आपल्या प्रेमभरित आचरणाद्वारे आपल्या पतीला, राजाला प्रमाद वा अनुद्योगा पासून दूर ठेऊन त्यास सुखी व आनंदित ठेवते, तद्वत राजाने देखील आपल्या स्त्रीला, राणीला सुखी व आनंदित ठेवावे. ॥10॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top