Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 19/ मन्त्र 36
    ऋषिः - प्रजापतिर्ऋषिः देवता - पितरो देवताः छन्दः - निचृदष्टिः स्वरः - मध्यमः
    4

    पि॒तृभ्यः॑ स्वधा॒यिभ्यः॑ स्व॒धा नमः॑ पिताम॒हेभ्यः॑ स्वधा॒यिभ्यः॑ स्व॒धा नमः॒ प्रपि॑तामहेभ्यः स्वधा॒यिभ्यः॑ स्व॒धा नमः॑। अक्ष॑न् पि॒तरोऽमी॑मदन्त पि॒तरोऽती॑तृपन्त पि॒तरः॒ पित॑रः॒ शुन्ध॑ध्वम्॥३६॥

    स्वर सहित पद पाठ

    पि॒तृभ्य॒ इति॑ पि॒तृऽभ्यः॑। स्व॒धा॒यिभ्य॒ इति॑ स्वधा॒यिऽभ्यः॑। स्व॒धा। नमः॑। पि॒ता॒म॒हेभ्यः॑। स्व॒धा॒यिभ्य॒ इति॑ स्वधा॒यिऽभ्यः॑। स्व॒धा। नमः॑। प्रपि॑तामहेभ्य॒ इति॒ प्रऽपि॑तामहेभ्यः। स्व॒धा॒यिभ्य॒ इति॑ स्वधा॒यिऽभ्यः॑। स्व॒धा। नमः॑। अक्ष॑न्। पि॒तरः॑। अमी॑मदन्त। पि॒तरः॑। अती॑तृपन्त। पि॒तरः॑। पित॑रः। शुन्ध॑ध्वम् ॥३६ ॥


    स्वर रहित मन्त्र

    पितृभ्यः स्वधायिभ्यः स्वधा नमः पितामहेभ्यः स्वधायिभ्यः स्वधा नमः प्रपितामहेभ्यः स्वधायिभ्यः स्वधा नमः । अक्षन्पितरःऽअमीमदन्त पितरोतीतृपन्त पितरः पितरः शुन्धध्वम् ॥


    स्वर रहित पद पाठ

    पितृभ्य इति पितृऽभ्यः। स्वधायिभ्य इति स्वधायिऽभ्यः। स्वधा। नमः। पितामहेभ्यः। स्वधायिभ्य इति स्वधायिऽभ्यः। स्वधा। नमः। प्रपितामहेभ्य इति प्रऽपितामहेभ्यः। स्वधायिभ्य इति स्वधायिऽभ्यः। स्वधा। नमः। अक्षन्। पितरः। अमीमदन्त। पितरः। अतीतृपन्त। पितरः। पितरः। शुन्धध्वम्॥३६॥

    यजुर्वेद - अध्याय » 19; मन्त्र » 36
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - ‘आम्ही पुत्र, शिष्य आदी लोक (स्वधायिभ्यः जे (पूज्यजन) स्वधा म्हणजे अन्न, जल आदी देण्यास पात्र आहेत, अशा (पितृभ्यः) ज्ञानीजनांना आम्ही (त्यांचे पुत्र वा शिष्य) (स्वधा) अन्न देतो आणि (नमः) त्यांचा सत्कार करतो. तसेच (स्वधायिभ्यः) पुष्कळ अन्नादी पदार्थांची इच्छा असणाऱ्या (पितामहेभ्यः) पित्याच्या पित्यांना आम्ही (स्वधा) उत्तम अन्न देतो आणि (नमः) त्यांचा सत्कार करतो. तसेच (स्वधायिभ्यः) उत्तम अन्नाची अपेक्षा करणाऱ्या (प्रपितामहेभ्यः) आजोबांच्या वडिलांना (आम्ही त्यांचे पणतू) (स्वधा) अन्न देतो व त्यांचा (नमः) आदर-सन्मान करतो. हे (पितरः) पिता आदी ज्ञानी जनहो, आम्ही उत्तम प्रकारे तयार केलेल्या अन्नाचे आपण (अक्षन्‌) सेवन करा. हे (पितरः) अध्यापक जनहो, आपण (या अन्न, सत्कार आदी कार्यामुळे) आनंदित व्हा, (सत्काराचा स्वीकार करा) आणि आम्हाला (अमीमदन्त) आनंदित करा. हे (पितरः) उपदेशकजणहो, आपण (आमच्या सत्कारादी कार्यामुळे तृप्त व्हा आणि आम्हाला (अतीतृपन्त) तृप्त वा संतुष्ट करा (आपण आम्ही केलेल्या सन्मानाने संतुष्ट झालात की आम्हाला परम तृप्ती होईल) हे (पितरः) विद्वज्जनहो, आपण शुद्ध व्हा आणि आम्हांला (शुन्धध्वम्‌) शुद्ध करा. ॥36॥

    भावार्थ - भावार्थ - (परमेश्वराचा पुत्रादीच्याप्रति उपदेश) हे पुत्रांनो, शिष्यांनो आणि पुत्रवधू आदी (घरातील सर्व लहान सदस्यांनो) तुम्ही उत्तम अन्न आदीद्वारे पिता आदी घरातील वृद्ध, वयस्कर मंडळींचा नेहमी आदर-सत्कार करीत जा. तसेच वृद्धमंडळींनी देखील तुम्हा घरातील लहान मंडळीना आनंदित ठेवावे. ज्याप्रमाणे आई-वडिलांनी लहानपणी तुमची सेवा (लालन-पालन, सुश्रूषा) केली आहे (वा करीत आहेत) त्याप्रमाणे तुम्ही लोकांनीदेखील वृद्धावस्थेत त्यांची यथोचित सेवा केली पाहिजे. ॥36॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top