Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 19/ मन्त्र 45
    ऋषिः - वैखानस ऋषिः देवता - पितरो देवताः छन्दः - निचृदनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    3

    ये स॑मा॒नाः सम॑नसः पि॒तरो॑ यम॒राज्ये॑। तेषां॑ लो॒कः स्व॒धा नमो॑ य॒ज्ञो दे॒वेषु॑ कल्पताम्॥४५॥

    स्वर सहित पद पाठ

    ये। स॒मा॒नाः। सम॑नस॒ इति॒ सऽम॑नसः। पि॒तरः॑। य॒म॒राज्य॒ इति॑ यम॒ऽराज्ये॑। तेषा॑म्। लो॒कः। स्व॒धा। नमः॑। य॒ज्ञः। दे॒वेषु॑। क॒ल्प॒ता॒म् ॥४५ ॥


    स्वर रहित मन्त्र

    ये समानाः समनसः पितरो यमराज्ये । तेषाँलोकः स्वधा नमो यज्ञो देवेषु कल्पताम् ॥


    स्वर रहित पद पाठ

    ये। समानाः। समनस इति सऽमनसः। पितरः। यमराज्य इति यमऽराज्ये। तेषाम्। लोकः। स्वधा। नमः। यज्ञः। देवेषु। कल्पताम्॥४५॥

    यजुर्वेद - अध्याय » 19; मन्त्र » 45
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (ये) जे (समानाः) समान अर्थात (आयु, ज्ञान. बुद्धि, ऐश्वर्य, आदी विषयी समान आहेत) आणि (समनसः) समान विद्या, ज्ञान-विज्ञानात समान आहेत, असे (पितरः) प्रजेचे रक्षकगण (सैनिक, पोलिस आदी) (यमराज्ये) यथोचित न्याय करणाऱ्या सभाधीश राजाच्या राज्यात असतात, (तेषाम्‌) त्यांचे (लोकः) दर्शन (स्वधा) अन्न, (नमः) सत्कार आणि (यज्ञः) योग्य तो न्याय (देवेषु) विद्वानांना (कल्पताम्‌) प्राप्त होवो. (म्हणजे राजपुरूष पोलिस आदी लोकांनी प्रजेतील विद्वानांना योग्य तो न्याय नेहमी द्यावा. त्यांच्यासाठी भोजनादीची व्यवस्था करावी आणि त्यांच्या मानसन्मान करावा.) ॥45॥

    भावार्थ - भावार्थ - ज्या राज्यात अशा विद्वानांची सभा (लोकसभा, राज्यसभा) असते की ज्यांची निष्ठा केवळ कर्तव्याविषयी आहे, तसेच जे प्रजेतील सज्जनांकडून सत्कारास पात्र आहेत आणि ज्यांच्याकरिता भोजन, धन आदीची योग्य व्यवस्था आहे, अशा विद्वानांची मिळून झालेली सभा योग्य तो न्याय करीत असते आणि त्या राज्यातच सर्व प्रजाजन ऐश्वर्य व सुखात जीवन व्यतीत करतात. ॥45॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top