Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 2/ मन्त्र 12
    ऋषिः - परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः देवता - सविता देवता छन्दः - भूरिक् बृहती, स्वरः - मध्यमः
    5

    ए॒तं ते॑ देव सवितर्य॒ज्ञं प्राहु॒र्बृह॒स्पत॑ये ब्र॒ह्मणे॑। तेन॑ य॒ज्ञम॑व॒ तेन॑ य॒ज्ञप॑तिं॒ तेन॒ माम॑व॥१२॥

    स्वर सहित पद पाठ

    ए॒तम्। ते॒। दे॒व॒। स॒वि॒तः॒। य॒ज्ञम्। प्र। आ॒हुः॒। बृह॒स्पत॑ये। ब्र॒ह्मणे॑। तेन॑। य॒ज्ञम्। अ॒व॒। तेन॑। य॒ज्ञप॑ति॒मिति॑ य॒ज्ञऽप॑तिम्। तेन॑। माम्। अ॒व॒ ॥१२॥


    स्वर रहित मन्त्र

    एतन्ते देव सवितर्यज्ञम्प्राहुर्बृहस्पतये ब्रह्मणे । तेन यज्ञमव तेन यज्ञपतिं तेन मामव ॥


    स्वर रहित पद पाठ

    एतम्। ते। देव। सवितः। यज्ञम्। प्र। आहुः। बृहस्पतये। ब्रह्मणे। तेन। यज्ञम्। अव। तेन। यज्ञपतिमिति यज्ञऽपतिम्। तेन। माम्। अव॥१२॥

    यजुर्वेद - अध्याय » 2; मन्त्र » 12
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (देव) हे दिव्य सुखांचे आणि उत्तम गुणांचे प्रयाता (सवित:) सर्व ऐश्‍वर्यांचे प्रदान करणार्‍या परमेश्‍वरा,तू वेदांचा प्रकाश केला आहेस. विद्वानांसाठी तूच (एतम्) पूर्वोक्त या यज्ञाचा प्रकाश केला आहेस आणि विद्वान या यज्ञाची प्रशंसा करतात. (बृहस्पतये) महानाहून महान जी वेदवाणी त्याचे पालन करणारे (ब्रह्मणे) चार वेदांच्या पठनामुळे ज्यानी ‘ब्रह्मा’ पदवी प्रापत केली आहे, अशा विद्वानांना सुख आणि श्रेष्ठ अधिकार देणार्‍या या (यज्ञम्) यज्ञविषयक धर्माद्वारे (यज्ञपतिं) यज्ञ करणार्‍या व सर्व प्राण्यांना सुखी करणार्‍या विद्वानांचे हे परमेश्‍वरा तू रक्षण कर. तसेच त्या यज्ञविद्या व यज्ञधर्माचा प्रकाश मला देऊन (मा) माझेही (अव) रक्षण कर. ॥12॥

    भावार्थ - भावार्थ - ईश्‍वराने सृष्टीच्या प्रारंभ काळी दिव्य गुणवान अशा अग्नि, वायु, रवि आणि अंगिरा या ऋषींच्या माध्यमातून सर्व मनुष्यांकरिता चारही वेदांचा उपदेश केला आहे, तसेच विद्याप्राप्ती करून यज्ञाच्या अनुष्ठान विधीचेही ज्ञान दिले आहे. चार वेद, विद्या आणि यज्ञ यांमुळे सर्वांचे कल्याण व रक्षण होते. विद्या व शुद्ध योग्य क्रिया यांशिवाय कोणासही सुख व रक्षण मिळणे शक्य नाही यासाठी आम्हा सर्वांसाठी हेच उचित आहे की यज्ञाद्वारे परस्पर प्रीतीभाव वाढवावा, आपला उत्कर्ष साधावा आणि आत्मरक्षा करावी. अकराव्या मंत्रात यज्ञाच्या जे ज्या फळांचा आणि लाभांचा उल्लेख केला आहे, परमेश्‍वराने त्याच लाभांचा पुन: या मंत्रात प्रकाश केला आहे. ॥12॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top