Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 2/ मन्त्र 13
    ऋषिः - परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः देवता - बृहस्पतिर्देवता छन्दः - विराट् जगती, स्वरः - निषादः
    2

    मनो॑ जू॒तिर्जु॑षता॒माज्य॑स्य॒ बृह॒स्पति॑र्य॒ज्ञमि॒मं त॑नो॒त्वरि॑ष्टं य॒ज्ञꣳ समि॒मं द॑धातु। विश्वे॑ दे॒वास॑ऽइ॒ह मा॑दयन्ता॒मो३म्प्रति॑ष्ठ॥१३॥

    स्वर सहित पद पाठ

    मनः॑। जू॒तिः। जु॒ष॒ता॒म्। आज्य॑स्य। बृह॒स्पतिः॑। य॒ज्ञम्। इ॒मम्। त॒नो॒तु॒। अरि॑ष्टम्। य॒ज्ञम्। सम्। इ॒मम्। द॒धा॒तु॒। विश्वे॑। दे॒वासः॑। इ॒ह। मा॒द॒य॒न्ता॒म्। ओ३म्। प्र। ति॒ष्ठ॒ ॥१३॥


    स्वर रहित मन्त्र

    मनो जूतिर्जुषतामाज्यस्य बृहस्पतिर्यज्ञमिमन्तनोत्वरिष्टँ यज्ञँ समिमन्दधातु । विश्वे देवासऽइह मादयन्तामो३म्प्रतिष्ठ ॥


    स्वर रहित पद पाठ

    मनः। जूतिः। जुषताम्। आज्यस्य। बृहस्पतिः। यज्ञम्। इमम्। तनोतु। अरिष्टम्। यज्ञम्। सम्। इमम्। दधातु। विश्वे। देवासः। इह। मादयन्ताम्। ओ३म्। प्र। तिष्ठ॥१३॥

    यजुर्वेद - अध्याय » 2; मन्त्र » 13
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (जूति:) वेगाने सर्वत्र जाणारे (मन:) विचार आणि ज्ञानाचे साधन माझे हे मन (उगज्यस्य) यज्ञसामग्रीचे (जुषताम्) सेवन करो (चंचल स्वभावामुळे यत्र तत्र विचलित होणारे मन यज्ञानुष्ठानाकडे केंद्रित होवो) (बृहस्पति:) महान् प्रकृती आणि विशाल आकाशादी पदार्थांचा जो स्वामी आणि पालक तो परमेश्‍वर, (इमम्) या प्रकट आणि अप्रकट (अरिष्टम्) ज्यात हिंसा करू नये अशा (यज्ञम्) सुख सुखभोगरूप यज्ञाचा (तनोतु) विस्तार करी (त्याच्या कृपेने यज्ञाची वृद्धी होवो) (इमम्) या (अरिष्टम्) ज्याचा कधी त्याग करूं नये अशा (यज्ञम्) अनुष्ठान करण्यास व विज्ञानाची प्राप्ती करून देण्यास समर्थ अशा यज्ञाचा परमेश्‍वर (संदधातु) उत्तम प्रकारे धारण करो. (यज्ञ निर्विघ्न होवो) हे (विश्‍वदेवासी) समस्त विद्वज्जनहो, तुम्ही करणीय व पालनीय अशा या दोन यज्ञाचे अनुष्ठान आणि विस्तार करून (इह) या संसारात अथवा आपल्या मनात (मादयन्ताम्) आनन्दित राहा (ओइम्) ओंकार या स्व नामाने सम्बोधित हे जगदीश्‍वर आपण (बृहस्पति:) महान् प्रकृती आदींचे पालनकर्ता आहात. कृपा करून (इह) या संसारात अथवा विद्वांनांच्या हृदयात (प्रतिष्ठ) या यज्ञाची, तसेच वेदविद्येची स्थापना करा. (विद्वज्जनांनी कधीही यज्ञानुष्ठान आणि वेदपठन या कार्यास सोडूं नये, असे करा) ॥13॥

    भावार्थ - भावार्थ - ईश्‍वर आदेश देत आहे की हे मनुष्यांनो, तुमचे मन श्रेष्ठ कर्माकडे प्रवृत्त होवो. संसारात यज्ञ करण्याची मी तुम्हाला जी आज्ञा केली आहे, त्याप्रमाणे वर्णित यथोचित रीतीने तुम्ही यज्ञाचे अनुष्ठान करून स्वत: सुखी व्हा आणि इतरांनाही सुखी करा. (ओम्) हे परमेश्‍वराचे नाव आहे. ज्याप्रमाणे पुत्राचा आणि जनकाचा प्रिय सबंध आहे, त्याप्रमाणे परमेश्‍वराचा आणि (ओम्) ओंकार नामाचा संबंध आहे. सत्कर्म केल्याशिवाय जगात कोणालाही प्रतिष्ठा प्राप्त होत नाही, याकरिता सर्व मनुष्यांसाठी हेच उचित की त्यांनी सर्वथा अधर्माचा त्याग करावा आणि धर्मकार्यांचा स्वीकार करावा, की ज्यायोगे, जगात अविद्यारूप अंधकाराचा निश्‍चयाने नाश होईल आणि विद्यारूप सूर्याचा प्रकाश सर्वत्र पसरेल. बाराव्या मंत्रामध्ये ज्या यज्ञाविषयी प्रकाश टाकला आहे, त्याच्या अनुष्ठानामुळे सर्व मनुष्यांना प्रतिष्ठा आणि सुख मिळू शकेल, हाच उपदेश मंत्रात केला आहे. ॥13॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top