Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 2/ मन्त्र 15
    ऋषिः - परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः देवता - अग्नीषोमौ देवते छन्दः - ब्राह्मी बृहती,निचृत् अतिजगती, स्वरः - मध्यमः, निषाद
    7

    अ॒ग्नीषोम॑यो॒रुज्जि॑ति॒मनूज्जे॑षं॒ वाज॑स्य मा प्रस॒वेन॒ प्रोहा॑मि। अ॒ग्नीषोमौ॒ तमप॑नुदतां॒ योऽस्मान् द्वेष्टि॒ यं च॑ व॒यं द्वि॒ष्मो वाज॑स्यैनं प्रस॒वेनापो॑हामि। इ॒न्द्रा॒ग्न्योरुज्जि॑ति॒मनूज्जे॑षं॒ वाज॑स्य मा प्रस॒वेन॒ प्रोहा॑मि। इ॒न्द्रा॒ग्नी तमप॑नुदतां॒ योऽस्मान् द्वेष्टि॒ यं च॑ व॒यं द्वि॒ष्मो वाज॑स्यैनं प्रस॒वेनापो॑हामि॥१५॥

    स्वर सहित पद पाठ

    अ॒ग्नीषोम॑योः। उज्जि॑ति॒मित्युत्ऽजि॑तिम्। अनु॑। उत्। जे॒ष॒म्। वाज॑स्य। मा॒ प्र॒स॒वेनेति॑ प्रऽस॒वेन॑। प्र। ऊ॒हा॒मि॒। अ॒ग्नीषोमौ॑। तम्। अप॑। नु॒द॒ता॒म्। यः। अ॒स्मान्। द्वेष्टि॑। यम्। च॒। व॒यम्। द्वि॒ष्मः। वाज॑स्य। ए॒न॒म्। प्र॒स॒वेनेति॑ प्रऽस॒वेन॑। अप॑। ऊ॒हा॒मि। इ॒न्द्रा॒ग्न्योः। उज्जि॑ति॒मित्युत्ऽजि॑तिम्। अनु॑। उत्। जे॒ष॒म्। वाज॑स्य। मा। प्र॒स॒वेनेति॑ प्रऽस॒वेन॑। प्र। ऊ॒हा॒मि॒। इ॒न्द्रा॒ग्नीऽइती॑न्द्रा॒ग्नी। तम्। अप॑। नु॒द॒ता॒म्। यः। अ॒स्मान्। द्वेष्टि॑। यम्। च॒। व॒यम्। द्वि॒ष्मः। वाज॑स्य। ए॒न॒म्। प्र॒स॒वेनेति॑ प्रऽस॒वेन॑। अप॑। ऊ॒हा॒मि॒ ॥१५॥


    स्वर रहित मन्त्र

    अग्नीषोमयोरुज्जितिमनूज्जेषँ वाजस्य मा प्रसवेन प्रोहामि । अग्नीषोमौ तमपनुदताँ यो ऽस्मान्द्वेष्टि यञ्च वयन्द्विष्मो वाजस्यैनं प्रसवेनापोहामि । इन्द्राग्न्योरुज्जितिमनूज्जेषँ वाजस्य मा प्रसवेन प्रोहामि । इन्द्राग्नी तमप नुदताँ योस्मान्द्वेष्टि यञ्च वयन्द्विष्मो वाजस्यैनम्प्रसवेनापोहामि ॥


    स्वर रहित पद पाठ

    अग्नीषोमयोः। उज्जितिमित्युत्ऽजितिम्। अनु। उत्। जेषम्। वाजस्य। मा प्रसवेनेति प्रऽसवेन। प्र। ऊहामि। अग्नीषोमौ। तम्। अप। नुदताम्। यः। अस्मान्। द्वेष्टि। यम्। च। वयम्। द्विष्मः। वाजस्य। एनम्। प्रसवेनेति प्रऽसवेन। अप। ऊहामि। इन्द्राग्न्योः। उज्जितिमित्युत्ऽजितिम्। अनु। उत्। जेषम्। वाजस्य। मा। प्रसवेनेति प्रऽसवेन। प्र। ऊहामि। इन्द्राग्नीऽइतीन्द्राग्नी। तम्। अप। नुदताम्। यः। अस्मान्। द्वेष्टि। यम्। च। वयम्। द्विष्मः। वाजस्य। एनम्। प्रसवेनेति प्रऽसवेन। अप। ऊहामि॥१५॥

    यजुर्वेद - अध्याय » 2; मन्त्र » 15
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - मी (अग्नीषोमयो:) भौतिक अग्नीचे तसेच चंद्र लोकास (उज्जितिम्) दु:ख देणार्‍या शत्रूंना (त्यांच्यापासून मिळणार्‍या लाभांना प्रदूषित करणार्‍या लोकांना) मी (अनुज्जषम्) क्रमा-क्रमाने जिंकावे आणि (वाजस्य) युद्धाच्या (प्रसवेन) साह्याने विजय मिळविणारा मी म्हणजे (मा) मी स्वत:ला (प्रोहामि) चांगल्या प्रकारे शुद्ध व तयार केलेल्या शस्त्रादी साधनाने समृद्ध संयुक्त करावे. आम्ही उत्कृष्ट विद्येद्वारे व क्रिया-कुशलतेद्वारे (तंत्र पद्धतीद्वारे) (अग्नीषौमौ) अग्नी आणि चंद्रलोकापासून प्राप्त ज्ञान व लाभाविषयी (य:) जो अन्यायी व दुष्ट मनुष्य दूषित वर्तन करतो व (अस्मान्) आम्हां न्यायशील माणसांशी जो (द्वेष्टि) शत्रुभावनेने वागतो,(मंच) आणि अन्यायाने वागणार्‍या त्या माणसाचा (वयम्) आम्ही न्यायप्रिय व न्यायाधीश लोक (द्विष्म:) विरोध करतो (तम्) अशा शत्रूला वा रोगाला (अपनुदताम्) आम्ही दूर करतो आणि मी देखील (एनम्) या दुष्ट वैरीला (वाजस्म) वेगवान् यानादी साधनांनी समृद्ध अशा सैन्याने (प्रसवेन) योग्य रीतीने (अपोहामि) दूर करतो किंवा नष्ट करतो. (इन्द्राग्न्यो:) सर्वांनी वायू आणि विद्युतरूप अग्नीचा (उज्जितिम्) विद्येद्वारे योग्य तो उत्कर्ष (अनूज्जेपम्) क्रमाक्रमाने साध्य करावा. (वाजस्य) ज्ञाना पासून प्रेरणा घेऊन वेगगमनाची कला शिकलेला मी (प्रसवेन) ऐश्‍वर्याच्या प्रप्तीसाठी वायू आणि विद्युत यांच्या शक्तीस जाणणारा मी (मां) स्वत:साठी नित्य (प्रोहामि) उत्तम रीती व मुक्तीद्वारे सुख व सोम मिळवतो (इन्द्राग्नी) वायू आणि अग्नी यांपासून लाभ घेणार्‍या आमच्याशी (म:) जो मूर्ख माणूस (अस्मान्) आम्हां विद्वानजनांशी (द्वेष्टि) अप्रीतीने वागतो (च) आणि (यं) ज्या मूर्खाशी (वयम्) आम्ही विद्वान लोक (द्विप्भ:) अप्रीतीने वागतो (तं) त्यावैर करणार्‍या अज्ञान्यास (अपनुदवाम्) आम्ही दूर करतो (आपल्या ध्येयमार्गापासून बाजूला सारतो) मी देखील (एनम्) अशा दुष्टाला (वान्सय) विज्ञानाच्या (प्रसवेन) शोध व आविष्काराद्वारे (अपोहामि) चांगले शिक्षण व ज्ञान देऊन त्यास शुद्ध करतो (त्यास योग्य मार्गावर नेतो)॥15॥

    भावार्थ - भावार्थ - ईश्‍वराने उपदेश केला आहे की सर्व मनुष्यांनी विद्या आणि रीती-युक्ती (विज्ञानाचे सिद्धांत आणि तंत्र) द्वारे अग्नी आणि जलाच्या संयोग व मिश्रण करण्याची कला अवगत करावी व त्याद्वारे वेगाने प्रवास, गमन उबदी कार्य/गुण प्राप्त करावेत. तसेच वायू आणि विद्याग्नीच्या सहाय्याने दारिद्रयाचा संपूर्ण नाश करावा व शत्रूंचा पराजय करावा. त्या पराजित शत्रूंना श्रेष्ठ ज्ञान देऊन त्यांचे अज्ञान दूर करावे. त्या मूढ मनुष्यांना विद्यावान करून या संसारात अनेक प्रकारच्या सुखांची प्राप्ती करावी. जे जे सुख स्वत:साठी प्राप्तव्य आहे ते ते इतरांना देखील प्राप्त करून देता यावे, अशा प्रकारचे उत्तम प्रयत्न सदा करीत रहावेत आणि त्यासाठी संसारात पदार्थ विद्येचा (भौतिसी) विकास अधिकाधिक करावा. या आधीच्या चौदाव्या मंत्रात ज्या कार्यांचा उल्लेख आला आहे, या मंत्रात देखील त्याच कार्यांची पुष्टी केली आहे. ॥15॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top