Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 2/ मन्त्र 16
    ऋषिः - परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः देवता - पूर्वार्द्धे द्यावापृथिवी मित्रावरुणौ च देवताः छन्दः - भूरिक् आर्ची पङ्क्ति,भूरिक् त्रिष्टुप्, स्वरः - धैवतः, पञ्चम
    1

    वसु॑भ्यस्त्वा रु॒द्रेभ्य॑स्त्वादि॒त्येभ्य॑स्त्वा॒ संजा॑नाथां द्यावापृथिवी मि॒त्रावरु॑णौ त्वा॒ वृष्ट्या॑वताम्। व्यन्तु॒ वयो॒क्तꣳ रिहा॑णा म॒रुतां॒ पृष॑तीर्गच्छ व॒शा पृश्नि॑र्भू॒त्वा दिवं॑ गच्छ॒ ततो॑ नो॒ वृष्टि॒माव॑ह। च॒क्षु॒ष्पाऽअ॑ग्नेऽसि॒ चक्षु॑र्मे पाहि॥१६॥

    स्वर सहित पद पाठ

    वसु॑भ्य॒ इति॒ वसु॑ऽभ्यः। त्वा॒। रु॒द्रेभ्यः॑। त्वा॒। आ॒दि॒त्येभ्यः॑। त्वा॒। सम्। जा॒ना॒था॒म्। द्या॒वा॒पृथि॒वी॒ऽ इति॑ द्यावाऽपृथिवी। मि॒त्रावरु॑णौ। त्वा॒। वृष्ट्या॑। अ॒व॒ता॒म्। व्यन्तु॑। वयः॑। अ॒क्तम्। रिहा॑णाः। म॒रुता॑म्। पृष॑तीः। ग॒च्छ॒। व॒शा। पृश्निः॑। भू॒त्वा। दिव॑म्। ग॒च्छ॒। ततः॑। नः। वृष्टि॑म्। आ॑। व॒ह॒। च॒क्षु॒ष्पाः। अ॒ग्ने॒। अ॒सि॒। चक्षुः॑। मे॒। पा॒हि॒ ॥१६॥


    स्वर रहित मन्त्र

    वसुभ्यस्त्वा रुद्रेभ्यस्त्वादित्येभ्यस्त्वा सञ्जानाथान्द्यावापृथिवी मित्रावरुणौ त्वा वृष्ट्यावताम् । व्यन्तु वयोक्तँ रिहाणाः मरुताम्पृषतीर्गच्छ वशा पृश्निर्भूत्वा दिवङ्गच्छ ततो नो वृष्टिमावह । चक्षुष्पाऽअग्नेऽसि चक्षुर्मे पाहि ॥


    स्वर रहित पद पाठ

    वसुभ्य इति वसुऽभ्यः। त्वा। रुद्रेभ्यः। त्वा। आदित्येभ्यः। त्वा। सम्। जानाथाम्। द्यावापृथिवीऽ इति द्यावाऽपृथिवी। मित्रावरुणौ। त्वा। वृष्ट्या। अवताम्। व्यन्तु। वयः। अक्तम्। रिहाणाः। मरुताम्। पृषतीः। गच्छ। वशा। पृश्निः। भूत्वा। दिवम्। गच्छ। ततः। नः। वृष्टिम्। आ। वह। चक्षुष्पाः। अग्ने। असि। चक्षुः। मे। पाहि॥१६॥

    यजुर्वेद - अध्याय » 2; मन्त्र » 16
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - आम्ही (वसुभ्य:) अग्नी आदी आदी आठ वसूंच्या साह्याने (त्वा) त्या यज्ञाला तसेच (रूद्रेभ्य:) अकरा रूद्रांच्या साह्याने (त्वा) त्या यज्ञाला तसेच (आदित्येभ्य:) बारा महिन्यांच्या सहाय्याने (त्वा) त्या यज्ञ-क्रियांना नित्य उत्तम युक्ती व रीतीद्वारे जाणावे. ज्यायोगे या यज्ञाद्वारे (द्यावापृथिनी) सूर्यप्रकाश आणि भूमी यांच्यापासून (संजोनाथाम्) प्राप्त होणारी शिल्पविद्या व शक्ती आम्हांस मिळू शकेल, सूर्यप्रकाश आणि भूमी आम्हांसाठी या रूपात अनुकूल व्हावेत. (मित्रावकणौ) सर्व जीवांच्या बाहेर राहणारा जो प्राणवायू आणि जीवांच्या शरीरात राहणारा जो उदान वायू आहे, ते दोन वायू (वृष्टीचा) शुद्ध जलाचा वृष्टीद्वारे (त्वा) सूर्यप्रकाशाचे आणि भूमी वर (अवताम्) स्थित असणार्‍या संस्काराचे रक्षण करतात. (वय:) ज्याप्रमाणे पक्षी आपापल्या घरट्यांचे निर्माण करतात आणि त्यात (व्यन्तु) राहून सुरक्षित राहतात, त्याप्रमाणे वैदिक छंदाद्वारे (रिहाणा:) पूजन करणारी आम्ही (त्वा) त्या यज्ञाचे अनुष्ठान करतो. यज्ञात हवन केलेली आहुती (पृश्‍नि:) अंतरिक्षात स्थिर होते (वशा) शोभित (भूत्वा) न गुणवती होऊन (मरूताम्) वायूच्या संगे (दिवम्) सूर्यप्रकाश (गच्छति) मिळते. (तत:) तेथून (न:) आमच्या सुखाकरिता ती आहुती (वृष्टियू) पावसाला (आलह) घेऊन येते. त्या पावसाचे पाणी (पृषती:) नाडी आणि नद्यांना प्राप्त होते. हा अग्नी (चक्षुष्पा:) नेत्रांची सुरक्षा करणारा (असि) आहे. यामुळे माझ्या किंवा आमच्या (चक्षु:) नेत्रांच्या बाहेरील रुपाचे व आतील दृष्टीशक्तीचे (पाहि) रक्षण करो. ॥16॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात लुप्तोपमालंकार आहे. मनुष्य अथवा याज्ञिकजन यज्ञात जी आहुती देतात, ती वायू द्वारे मेघमंडळापर्यंत जाते आणि सूर्याद्वारे आकर्षित पाण्याला शुद्ध करते. तेथून हे जल भूमीवर येऊन औषधींना पुष्टी देते. अशी ही उपकारक आहुती वेदमंत्रांचे उच्चारण करीतच दिली पाहिजे, कारण त्यामुळे आहुतीच्या लाभांचे ज्ञान होऊन यज्ञाविषयी नित्य श्रद्धा उत्पन्न होईल. हा अग्नी सूर्यरूप होऊन सर्व काही प्रकाशित करतो. त्याच्या कार्यामुळेच पाहणे आदी व्यवहार शक्य होतात. वसु आदीनांच देव म्हटले जाते, कारण की यांच्यामुळे प्राप्त विद्येद्वारे ज्ञात उपकारक गुणांनी दुर्गुणांना आणि दुष्ट प्राण्यांना नित्य निवारण करता येते व केले पाहिजे. या कृतीलाच पूजन म्हणतात व हाच सत्कार आहे. या आधीच्या मंत्रात जे सांगितले आहे, त्याच तत्त्वाचा या मंत्रात विशेष विस्तार केला आहे. ॥16॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top