Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 2/ मन्त्र 18
    ऋषिः - परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः देवता - विश्वेदेवा देवताः छन्दः - स्वराट् त्रिष्टुप्, स्वरः - धैवतः
    2

    स॒ꣳस्र॒वभा॑गा स्थे॒षा बृ॒हन्तः॑ प्रस्तरे॒ष्ठाः प॑रि॒धेया॑श्च दे॒वाः। इ॒मां वाच॑म॒भि विश्वे॑ गृ॒णन्त॑ऽआ॒सद्या॒स्मिन् ब॒र्हिषि॑ मादयध्व॒ꣳ स्वाहा॒ वाट्॥१८॥

    स्वर सहित पद पाठ

    स॒ꣳस्र॒वभा॑गाः। स्थ॒। इ॒षा। बृ॒हन्तः॑। प्र॒स्तरे॒ष्ठाः। प॒रि॒धेयाः॑। च॒। दे॒वाः। इ॒माम्। वाच॑म्। अ॒भि। विश्वे॑। गृ॒णन्तः॑। आ॒सद्य॑। अ॒स्मिन्। ब॒र्हिषि॑। मा॒द॒य॒ध्व॒म्। स्वाहा॑। वाट् ॥१८॥


    स्वर रहित मन्त्र

    सँस्रवभागा स्थेषा बृहन्तः प्रस्तरेष्ठाः परिधेयाश्च देवाः । इमाँवाचमभि विश्वे गृणन्तऽआसद्यास्मिन्बर्हिषि मादयध्वँ स्वाहा वाट् ॥


    स्वर रहित पद पाठ

    सꣳस्रवभागाः। स्थ। इषा। बृहन्तः। प्रस्तरेष्ठाः। परिधेयाः। च। देवाः। इमाम्। वाचम्। अभि। विश्वे। गृणन्तः। आसद्य। अस्मिन्। बर्हिषि। मादयध्वम्। स्वाहा। वाट्॥१८॥

    यजुर्वेद - अध्याय » 2; मन्त्र » 18
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (बृहन्ते:) वृद्धी व उत्कर्ष प्राप्त करणार्‍या (प्रस्तरेष्ठा:) न्याय्य विद्यारूप असनावर अधिष्ठान करणार्‍या, (परिङेया:) धारण आणि बुद्धीने युक त (इमाम्) या (वाचम्) चार वेदांचा उपदेश करणार्‍या (देवा:) विद्वजनहो, तुम्ही (इषा) आपला ज्ञानाने (संस्रवभागा:) होमामधे घृतादी पदार्थांची आहुती देणारे (स्थ) व्हा. (स्वाहा) मधुर प्रिय वचनांद्वारे (वाट्) प्राप्त होणारी व सुख वाढविणारी जी क्रिया व जे आचरण आहे, त्याचा (अस्मिन् या प्रत्यक्ष (बर्हिषि) ज्ञनामधे आणि कर्मकांडामधे (मादयध्वम्) आचरण करून स्वत: आनंदित रहा आणि इतरांनाही आनंदित करा. अशा प्रकारे ज्ञान आणि कर्मकांड यामधे वेदवाणीचा प्रयोग करीत तुम्ही सर्व जण विचार व ज्ञान प्राप्त करून देणारी क्रिया करीत (बृहनत:) स्वत:ची वृद्धी आणि उन्नती करा (प्रस्तरेष्ठा:) उत्तमकार्य करीत राहा (विश्‍वे) सर्व (देवा:) उत्तम पदार्थांना (परिघेया:) धारण करा, त्यांना प्राप्त करा आणि इतरांनाही ते प्राप्त होऊ द्या. सर्वांचे सहकार्य घेत ज्ञान-प्राप्ती आणि कर्माचरण यांमधे सद्य (मादयध्वम्) आनंदित राहा. ॥18॥

    भावार्थ - भावार्थ - ईश्‍वराने आदेश दिला आहे की मनुष्यांनी धर्म, पुरूषार्थ, वेदविद्येचा प्रसार आणि उत्तम आचरण इ. सर्व करावे. जे लोक असे धार्मिक, पुरूषार्थी आहेत, वेदविद्येचा प्रचार करतात आणि श्रेष्ठ कर्म करतात, त्यांनाच सुख मिळते. तेच सुखी होतात. या आधीच्या मंत्रात अग्नी शब्दाचे ईश्‍वर आणि भौतिक अग्नी असे दोन अर्थ सांगितले आहेत, मनुष्यांनी त्यांपासून या मंत्रात सांगितलेले लाभ व उपकार घ्यावेत हे या मंत्रात सांगितले आहे. ॥18॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top