Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 2/ मन्त्र 33
    ऋषिः - वामदेव ऋषिः देवता - पितरो देवताः छन्दः - निचृत् गायत्री, स्वरः - षड्जः
    2

    आध॑त्त पितरो॒ गर्भं॑ कुमा॒रं पुष्क॑रस्रजम्। यथे॒ह पुरु॒षोऽस॑त्॥३३॥

    स्वर सहित पद पाठ

    आ। ध॒त्त॒। पि॒त॒रः॒। गर्भ॑म्। कु॒मा॒रम्। पुष्क॑रस्रज॒मिति॒ पुष्क॑रऽस्रजम्। यथा॑। इ॒ह। पुरु॑षः। अस॑त् ॥३३॥


    स्वर रहित मन्त्र

    आधत्त पितरो गर्भङ्कुमारम्पुष्करस्रजम् । यथेह पुरुषो सत् ॥


    स्वर रहित पद पाठ

    आ। धत्त। पितरः। गर्भम्। कुमारम्। पुष्करस्रजमिति पुष्करऽस्रजम्। यथा। इह। पुरुषः। असत्॥३३॥

    यजुर्वेद - अध्याय » 2; मन्त्र » 33
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (पितर:) विद्यादानाद्वारे रक्षण करणार्‍या विद्वज्जनहो, (यथा) ज्याप्रमाणे हा ब्रह्मचारी (इह) या जगात किंवा आमच्या कुळात शारीरिक व आत्मिकशक्ती प्राप्त करून विद्यावान आणि पुरूषार्थी (असत्) होणार आहे, (गर्भम्) मातृगर्भातील शिशूप्रमाणे शनै: शनै: वाढणारा (पुष्करस्रजम्) विद्या ग्रहण करीत हा विद्यार्थी आपल्यासमोर पुष्पमाला हाती घेऊन उभा आहे. (कुमारम्) कुमारवयातील या विद्यार्थ्यांचा ब्रह्मचार्‍याचा तुम्ही (आधत्त) प्रेमाने स्वीकार करा. (या ज्ञानार्थी कुमारास विद्यावान करा) कोणी गृहस्थ आपल्या मुलास गुरूकुलाच्या आचार्याजवळ नेऊन त्यांच्या चरणी अशी प्रार्थना करीत आहे, अशा प्रसंगी या मंत्राचा विनियोग होऊ शकतो.) ॥33॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात श्‍लेषालंकार आहे. ईश्‍वर आज्ञा करीत आहे की विद्वान पुरूष व स्त्रियांनी विद्याशक्तीची इच्छा करून जे कूमार व कुमारिका त्यांच्याकडे येतील, त्यांना गर्भातील शिशूप्रमाणे विद्यादान करीत विद्यावान बनवावे. ज्याप्रमाणे मातेच्या उदरी गर्भ क्रमाक्रमाने वाढतो, तदृत विद्यार्थ्याला/विद्यार्थीनीला ब्रह्मचार्‍याला शनै: शनै: ज्ञान देऊन त्यांना श्रेष्ठ विद्यावान करावे. तसेच पालनीय कुमार व योग्य कुमारिका विद्या प्राप्त करून धर्मात्मा आणि पुरुषार्थी होऊन सदा सुखी राहतील, असेच प्रयत्न सर्व विद्वानांनी अवश्य करावेत. ॥33॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top