Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 2/ मन्त्र 7
    ऋषिः - परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - बृहती, स्वरः - मध्यमः
    5

    अग्ने॑ वाजजि॒द् वाजं॑ त्वा सरि॒ष्यन्तं॑ वाज॒जित॒ꣳ सम्मा॑र्ज्मि। नमो॑ दे॒वेभ्यः॑ स्व॒धा पि॒तृभ्यः॑ सु॒यमे॑ मे भूयास्तम्॥७॥

    स्वर सहित पद पाठ

    अग्ने॑। वा॒ज॒जि॒दिति॑ वाजऽजित्। वाज॑म्। त्वा॒। स॒रि॒ष्यन्त॑म्। वा॒ज॒जित॒मिति॑ वाज॒ऽजित॑म्। सम्। मा॒र्ज्मि॒। नमः॑। दे॒वेभ्यः॑। स्व॒धा। पि॒तृभ्य॒ इति॑ पि॒तृऽभ्यः॑। सु॒यमे॒ऽइति॑ सु॒ऽयमे॑। मे॒। भू॒या॒स्त॒म् ॥७॥


    स्वर रहित मन्त्र

    अग्ने वाजजिद्वाजन्त्वा सरिष्यन्तँ वाजजितँ सम्मार्ज्मि । नमो देवेभ्यः स्वधा पितृभ्यः सुयमे मे भूयास्तम् ॥


    स्वर रहित पद पाठ

    अग्ने। वाजजिदिति वाजऽजित्। वाजम्। त्वा। सरिष्यन्तम्। वाजजितमिति वाजऽजितम्। सम्। मार्ज्मि। नमः। देवेभ्यः। स्वधा। पितृभ्य इति पितृऽभ्यः। सुयमेऽइति सुऽयमे। मे। भूयास्तम्॥७॥

    यजुर्वेद - अध्याय » 2; मन्त्र » 7
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (अग्ने) हा अग्नी (वाजजित्) उत्कृष्ट अन्न धान्य देणारा आहे आणि सर्व पदार्थांना शुद्ध करणारा आहे, म्हणून मी (त्वा) त्या (वाजम्) वेगशाली (अरिष्यन्तम्) सर्व पदार्थांना अंतरिक्षात पाठविणार्‍या आणि (वाजजितम्) युद्धात विजय देणार्‍या भौतिक अग्नीला (सम्मार्ज्मि) चांगल्या प्रकारे शुद्ध करतो. (त्याचा योग्य पद्धतीने उपयोग घेतो) यज्ञात प्रयुक्त या अग्नीद्वारे (देरेभ्य:) सुखकारक पूर्वोक्त वसु आदी पदार्थांपासून सुख प्राप्त होते आणि (नम:) अत्यंत मधुर व श्रेष्ठ जल मिळते. तसेच (पितृभ्य:) पालनकरणारे जे वसंत आदी ऋतु आहेत, त्यांपासून आरोग्य प्राप्त करण्याकरिता (स्वधा) अमृतरूप जे अन्न प्राप्त होते, (सुयमे) शक्ती आणि पराक्रम देणार्‍या अशा या यज्ञामुळे ते अन्न-धान्य (मे) माझ्यासाठी (भूयास्तम्) उबलब्ध व्हावेत. ॥7॥

    भावार्थ - भावार्थ- ईश्‍वराने उपदेश केला आहे की प्रथम मंत्रात सांगितल्याप्रमाणे यज्ञाचे प्रमुख साधन अग्नी आहे. ज्याप्रमाणे प्रत्यक्षात देखील दिसते की अग्नीच्या ज्वाळा वरच्या दिशेला जाता, कारण की अग्नीचा स्वभाव वरच्या दिशेला जाण्याचा आणि सर्व पदार्थांना छिन्न-भिन्न करण्याचा (हलके करून वर पाठविण्याचा) आहे. याच अग्नीचा यान आदी मधे व अस्त्रशस्त्रामध्ये प्रयोग केल्यानंतर अग्नी शीघ्रगमन करणारा आणि विजयदायी होतो. तसेच हा अग्नी वसंत आदी ऋतूमधे उत्तमोत्तम पदार्थ देऊन अग्नीची आणि जलाची शुद्धता करतो आणि सर्वांसाठी सुखकारी होतो. सर्वांनी अग्नीच्या या गुणांना उत्तमप्रकारे जाणावे व त्यापासून लाभ घ्यावेत. ॥7॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top