Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 20/ मन्त्र 25
    ऋषिः - अश्वतराश्विर्ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    1

    यत्र॒ ब्रह्म॑ च क्ष॒त्रं च॑ स॒म्यञ्चौ॒ चर॑तः स॒ह।तं लो॒कं पुण्यं॒ प्रज्ञे॑षं॒ यत्र॑ दे॒वाः स॒हाग्निना॑॥२५॥

    स्वर सहित पद पाठ

    यत्र॑। ब्रह्म॑। च॒। क्ष॒त्रम्। च॒। स॒म्यञ्चौ॑। चर॑तः। स॒ह। तम्। लो॒कम्। पुण्य॑म्। प्र। ज्ञे॒ष॒म्। यत्र॑। दे॒वाः। स॒ह। अ॒ग्निना॑ ॥२५ ॥


    स्वर रहित मन्त्र

    यत्र ब्रह्म च क्षत्रञ्च सम्यञ्चो चरतः सह । तँलोकम्पुण्यम्प्र ज्ञेषँयत्र देवाः सहाग्निना ॥


    स्वर रहित पद पाठ

    यत्र। ब्रह्म। च। क्षत्रम्। च। सम्यञ्चौ। चरतः। सह। तम्। लोकम्। पुण्यम्। प्र। ज्ञेषम्। यत्र। देवाः। सह। अग्निना॥२५॥

    यजुर्वेद - अध्याय » 20; मन्त्र » 25
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यानो, ज्याप्रमाणे मी (एक उपासक) (यत्र) ज्या परमेश्वरात (त्याच्या ध्यानात) (ब्रह्म) ब्राह्मण म्हणजे विद्वानांच्या समूहाला (च) आणि (क्षत्रम्‌) विद्या, शौर्य आदी गुणांनी संपन्न क्षत्रियांच्या समूहाला (पाहतो) (ब्राह्मण आणि क्षत्रिय वर्णातील मनुष्यांमधे परमेश्वराचे अस्तित्व अनुभवतो) दोघांना (सह) एकत्र आणि (सम्यञ्चौ) प्रीतियुक्त पाहतो तसेच (च) त्यांच्यासह वैश्य आदी वर्णांना देखील पाहतो आणि (हे तिघे वर्ण) मिळून एकमेकाशी प्रेमळपणे व्यवहार करतात (तसेच, हे मनुष्यांनो, तुम्हीही करा) या शिवाय (यत्र) ज्या परमेश्वरात (देवाः) दिव्यगुणधारी पृथ्वी आदी लोक अथवा विद्वज्जन (अग्निना) विद्युतरूप अग्नी (सह) सह व्यवहार करतात ( वैज्ञानिकगण विद्युतेचे गुण जाणतात व त्यापासून लाभ घेतात) (तम्‌) त्या (लोकम्‌) दर्शनीय (ध्यातव्य) (पुण्यम्‌) पापरहित सुखस्वरूप परमात्म्याला मी (प्र, ज्ञेषम्‌) जाणण्याचा प्रयत्न करतो, तसे तुम्हीदेखील जाणण्याचा व त्याची उपासना करण्याचा प्रयत्न करा ॥25॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोमा अलंकार आहे. जो ब्रह्म चेतनमात्र, स्वस्वरूप, सर्वाधिकारी, पापरहित आहे आणि ज्याला केवळ ज्ञानरूप नेत्रांनीच पाहता येते, असा सर्वव्यापी, सर्वांसह वा सर्वांत विद्यमान असलेला परमेश्वरच सर्वांसाठी उपास्य देव आहे, (अन्य कोणीही उपासनीय नाही. )॥25॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top