Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 20/ मन्त्र 57
    ऋषिः - विदर्भिर्ऋषिः देवता - अश्विसरस्वतीन्द्रा देवताः छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    2

    इन्द्रा॒येन्दु॒ꣳ सर॑स्वती॒ नरा॒शꣳसे॑न न॒ग्नहु॑म्।अधा॑ताम॒श्विना॒ मधु॑ भेष॒जं भि॒षजा॑ सु॒ते॥५७॥

    स्वर सहित पद पाठ

    इन्द्रा॑य। इन्दु॑म्। सर॑स्वती। नरा॒शꣳसे॑न। न॒ग्नहु॑म्। अधा॑ताम्। अ॒श्विना॑। मधु॑। भे॒ष॒जम्। भि॒षजा॑। सु॒ते ॥५७ ॥


    स्वर रहित मन्त्र

    इन्द्रायेन्दुँ सरस्वती नराशँसेन नग्नहुम् । अधातामश्विना मधु भेषजम्भिषजा सुते ॥


    स्वर रहित पद पाठ

    इन्द्राय। इन्दुम्। सरस्वती। नराशꣳसेन। नग्नहुम्। अधाताम्। अश्विना। मधु। भेषजम्। भिषजा। सुते॥५७॥

    यजुर्वेद - अध्याय » 20; मन्त्र » 57
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (अश्विना) वैद्य विद्येत निपुण (दो वा अधिक) (भिषजा) उत्तम वैद्यजन (इन्द्राय) दुःख (वेदना, ज्वर आदींच्या) नाशाकरिता (सुते) (परमेश्वराने) उत्पन्न केलेल्या या संसारात (मधु) ज्ञानवर्धक आणि सौम्यगुणधारक (भेषनम्‌) औषधी (अधातम्‌) धारण, कराव्यात (रोगी लोकांकरिता योग्य औषधी शोधाव्यात आणि त्या औषधी रोग्यांना द्यावीत) तसेच (नराशंसेन) माणसांनी स्तुती केल्यानंतर (वा रोगीजनांची विनंती ऐकल्यानंतर) (वैद्यजनांनी) मधुर (उपदेशपर) वाणीने (नग्नहम्‌) आनंदवर्धक विषय व गोष्टी सांगाव्यात आणि त्याद्वारे (इन्दुम्‌) ऐश्वर्याची वृद्धी करावी (स्वास्थ्यरूप धनाची वृद्धी व रक्षा करावी) ॥57॥

    भावार्थ - भावार्थ - वैद्य दोन प्रकारचे असतात. पहिल्या प्रकारचे ते वैद्य की जे ज्वर (वेदना) आदी शारीरिक रोगांचा योग्य चिकित्सा द्वारे नाश करतात आणि दुसरे प्रकारचे वैद्य ते की जे उपदेशक वा अध्यापक असून मानसिक रोगांचे यथा अविद्या, क्लेश आदींचे निवारण करतात (ते उपदेशाने मानसिक रोग दूर करतात) जेथे असे दोन प्रकारचे वैद्य राहतात, त्या प्रदेशातील लोक शारीरिक आणि मानसिक रोगांपासून मुक्त होऊन सदा, सुखी असतात. ॥57॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top