Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 21/ मन्त्र 41
    ऋषिः - स्वस्त्यात्रेय ऋषिः देवता - विद्वांसो देवता छन्दः - अतिधृतिः स्वरः - षड्जः
    3

    होता॑ यक्षद॒श्विनाै॒ छाग॑स्य व॒पाया॒ मेद॑सो जु॒षेता॑ ह॒विर्होत॒र्यज॑। होता॑ यक्ष॒त्सर॑स्वतीं मे॒षस्य॑ व॒पाया॒ मेद॑सो जु॒षता॑ ह॒विर्होत॒र्यज॑। होता॑ यक्ष॒दिन्द्र॑मृष॒भस्य॑ व॒पाया॒ मेद॑सो जु॒षता॑ ह॒विर्होत॒र्यज॑॥४१॥

    स्वर सहित पद पाठ

    होता॑। य॒क्ष॒त्। अ॒श्विनौ॑। छाग॑स्य। व॒पायाः॑। मेद॑सः। जु॒षेता॑म्। ह॒विः। होतः॑। यज॑। होता॑। य॒क्ष॒त्सर॑स्वतीम्। मे॒षस्य॑। व॒पायाः॑। मेद॑सः। जु॒षता॑म्। ह॒विः। होतः॑। यज॑। होता॑। य॒क्ष॒त्। इन्द्र॑म्। ऋ॒ष॒भस्य॑। व॒पायाः॑। मेद॑सः। जु॒षता॑म्। ह॒विः। होतः॑। यज॑ ॥४१ ॥


    स्वर रहित मन्त्र

    होता यक्षदश्विनौ च्छागस्य वपाया मेदसो जुषेताँ हविर्हातर्यज । होता यक्षत्सरस्वतीम्मेषस्य वपाया मेदसो जुषताँ हविर्हातर्यज । होता यक्षदिन्द्रमृषभस्य वपाया मेदसो जुषताँ हविर्हातर्यज ॥


    स्वर रहित पद पाठ

    होता। यक्षत्। अश्विनौ। छागस्य। वपायाः। मेदसः। जुषेताम्। हविः। होतः। यज। होता। यक्षत् सरस्वतीम्। मेषस्य। वपायाः। मेदसः। जुषताम्। हविः। होतः। यज। होता। यक्षत्। इन्द्रम्। ऋषभस्य। वपायाः। मेदसः। जुषताम्। हविः। होतः। यज॥४१॥

    यजुर्वेद - अध्याय » 21; मन्त्र » 41
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    हे (होतः) दान देणाऱ्या मनुष्या, तू आणि (होता) (दान देणारा (अन्य मनुष्य) जसे (यक्षत्‌) अनेक प्रकारचे चांगले व्यवहार (समाजोपयोगी कामें) करता, त्याप्रमाणे (अश्विनौ) पशुपालन करणाऱ्या आणि कृषिकर्म करणाऱ्या लोकांनी (छागस्य) बकरा, गाय, म्हैस आदी पशूं विषयींचे कामें तसेच (वपायाः) बी पेरणे आणि सुती आदी वस्त्र तयार करणे (ही कामें करावीत) या शिवाय (पशुपालक आणि कृषक) यांनी (मेदसः) स्निग्ध पदार्थांचे (घृत, लोणी, दूध आदीचे) (हविः) देण्या-घेण्याचे (जुषन्ताम्‌) उचित व्यवहार करावेत (तूप, दुध आदी पदार्थ एकमेकाला द्यावेत/घ्यावेत) हे होता, तूही त्यांच्याप्रमाणे (आदान-प्रदानादी) (यज) कर्में करावीत. हे (होतः) देणाऱ्या मनुष्या, ज्याप्रमाणे एक (होता) घेणारा माणूस (मेषस्य) एडक्याच्या (वपायाः) वंशवृद्धी करणारी कामें करतो, तसेच (तुम्ही) (मेदसः) स्निग्ध (तूप आदी) पदार्थांचे केलेले (हविः) अग्नीत आहुती देण्यासाठी तयार केलेले शुद्ध पदार्थ तयार करा (सरस्वतीम्‌) विशेष ज्ञानपूर्ण वाणीचा (जुषन्ताम्‌) सेवन करा. (मधुर व माहितीपूर्ण भाषेचा उपयोग करा) हे होता, तुम्हीही तसे (यज) सर्व पदार्थांचे यथोचित मिश्रण करा. हे (होतः) देणाऱ्या माणसा, ज्याप्रमाणे (होता) एखादा घेणारा (चांगले ते स्वीकारणारा) माणूस (ऋषभस्य) बैलाच्या वंशाची (वपायाः) वृद्धी करण्याच्या (योजना व पद्धती आखतो) (मेदसः) स्निग्ध (मेदजन्य) पदार्थ आणि (हविः) देण्यास योग्य पदार्थ (तयार करतो) आणि ते (इन्द्रम्‌) परमैश्वर्यशाली व्यक्तीशी (जुषन्ताम्‌) संपर्क करतो, आणि (यक्षत्‌) उपर्युक्त पदार्थांचे यथोचित मिश्रण करतो, तसे हे होता, तुम्ही (यज) हव्य पदार्थांचे यथोचित मिश्रण कर ॥41॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जी माणसें पशूंची संख्या आणि शक्ती वाढवितात, ते स्वतः देखील शक्तिमान होतात (आणि इतरांनाही बलवान करतात) तसे जे लोक पशूंपासून मिळणाऱ्या दुधाचे आणि त्या दुधापासून निघणाऱ्या तुपाचे सेवन करतात, ते स्वभावाने शांत आणि सहनशील होतात. तसेच जे लोक बैलांचा कृषीसाठी उपयोग करतात, ते धन-धान्याने परिपूर्ण होतात. ॥41॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top