Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 22/ मन्त्र 10
    ऋषिः - मेधातिथिर्ऋषिः देवता - सविता देवता छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः
    2

    हिर॑ण्यपाणिमू॒तये॑ सवि॒तार॒मुप॑ह्वये। स चेत्ता॑ दे॒वता॑ प॒दम्॥१०॥

    स्वर सहित पद पाठ

    हिर॑ण्यपाणि॒मिति॒ हिर॑ण्यऽपाणिम्। ऊ॒तये॑। स॒वि॒तार॑म्। उप॑। ह्व॒ये॒। सः। चेत्ता॑। दे॒वता॑। प॒दम् ॥१० ॥


    स्वर रहित मन्त्र

    हिरण्यपाणिमूतये सवितारमुपह्वये । स चेत्ता देवता पदम् ॥


    स्वर रहित पद पाठ

    हिरण्यपाणिमिति हिरण्यऽपाणिम्। ऊतये। सवितारम्। उप। ह्वये। सः। चेत्ता। देवता। पदम्॥१०॥

    यजुर्वेद - अध्याय » 22; मन्त्र » 10
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (मंत्राचा द्रष्टा वा ईश्वरोपासनेची अनुभूती घेतलेल्या एक ऋषी वा उपासक म्हणतो) हे मनुष्यांनो, (मी) (ऊतये) रक्षण (पालन आदी) कर्मासाठी ज्या (हिरण्यपाणिम्‌) सूर्य आदी तेजस्वी पदार्थ ज्याची स्तुती करण्याची कारणें आहेत (महातेजोमय सूर्यादी ग्रहनक्षत्रांचा निर्माता असल्यामुळे जो अद्भुत प्रशंसनीय आहे) त्या (पदम्‌) प्राप्तव्य वा स्तवनीय (सवितारम्‌) समस्त ऐश्वर्याची प्राप्ती करून देणाऱ्या जगदीश्वराला (मी, एक उपासक) (उपह्वये) ध्यानयोगाद्वारे बोलावीत आहे (अंतःस्थ परमात्म्याच्या समाधी अवस्थेत अनुभव घेत आहे) (सः) तो (चेत्ता) उत्तम ज्ञानस्वरूप असल्यामुळे सत्य आणि असत्याचे ज्ञान (त्यातील भेद) लक्षात आणून देतो, तोच (देवता) उपासना करण्यास योग्य व आपल्या सर्वांचा एकमेव इष्टदेव आहे. तुम्ही हे सत्य नीट जाणून घ्या आणि केवळ त्या सच्चिदानंदस्वरूप परमेश्वराचीच उपासना करा) ॥10॥

    भावार्थ - भावार्थ - सर्वांसाठी हेच उचित आहे की या मंत्रात तसेच पूर्वोक्त गायत्री मंत्रात, की जो गुरुमंत्र आहे, जो अर्थ सांगितला आहे, त्या दोन्ही मंत्राचा तात्पर्य एकच आहे. मनचष्यांनी चेतनस्वरूप परमेश्वराची उपासना करणें सोडून अन्य कोणाही जड (वा चेतन) पदार्थाची उपासना कदापी करूं नये. कारण असें की उपासना केल्याने वा ज्याची उपासना केली जात आहे, तो जड पदार्थ हानी वा लाभ देणारा अथवा आमचे रक्षण करणारा नसतो. यामुळे चित्तवान चेतन समस्त जीवांची चेतनस्वरूप जगदीश्वराची उपासना करणेच सर्वथैव उचित आहे. त्यास सोडून इतर जडत्व आदी गुणांनी युक्त (अचेतन मूर्ती आदी) पदार्थ कदापी उपासनीय होऊ शकत नाहींत ॥10॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top