Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 26/ मन्त्र 6
    ऋषिः - प्रादुराक्षिर्ऋषिः देवता - वैश्वनरो देवता छन्दः - जगती स्वरः - निषादः
    6

    ऋ॒तावा॑नं वैश्वान॒रमृ॒तस्य॒ ज्योति॑ष॒स्पति॑म्। अज॑स्रं घ॒र्ममी॑महे। उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽसि वैश्वान॒राय॑ त्वै॒ष ते॒ योनि॑र्वैश्वान॒राय॑ त्वा॥६॥

    स्वर सहित पद पाठ

    ऋ॒तावा॑नम्। ऋ॒तवा॑ना॒मित्यृ॒तऽवा॑नम्। वै॒श्वा॒न॒रम्। ऋ॒तस्य॑। ज्योति॑षः। पति॑म्। अज॑स्रम्। घ॒र्मम्। ई॒म॒हे॒। उ॒प॒या॒मगृ॑हीत॒ इत्यु॑पया॒मऽगृ॑हीतः। अ॒सि॒। वै॒श्वा॒न॒राय॑। त्वा॒। ए॒षः। ते॒। योनिः॑। वै॒श्वा॒न॒राय॑। त्वा॒ ॥६ ॥


    स्वर रहित मन्त्र

    ऋतावानँवैश्वानरमृतस्य ज्योतिषस्पतिम् । अजस्रन्घर्ममीमहे । उपयामगृहीतोसि वैश्वानराय त्वैष ते योनिर्वैश्वानराय त्वा ॥


    स्वर रहित पद पाठ

    ऋतावानम्। ऋतवानामित्यृतऽवानम्। वैश्वानरम्। ऋतस्य। ज्योतिषः। पतिम्। अजस्रम्। घर्मम्। ईमहे। उपयामगृहीत इत्युपयामऽगृहीतः। असि। वैश्वानराय। त्वा। एषः। ते। योनिः। वैश्वानराय। त्वा॥६॥

    यजुर्वेद - अध्याय » 26; मन्त्र » 6
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यांनो, ज्याप्रमाणे आम्ही (ज्ञान-विज्ञानवेत्ता लोक) (ऋतावानम्) भूमीवरील पाण्याचे शोषण करणार्‍या (वैश्‍वानरम्) सर्व मनुष्यांना प्रकाश देणार्‍या (ऋतस्य) जलाची आणि (ज्योतिषः) प्रकाशाची (पतिम्) व्यवस्था ठेवणार्‍या (घर्मम्) सूर्याची (अज्रसम्) निरंतर (ईमहे) याचना करतो, तद्वत तुम्हीही याचना (सूर्य, मेघ आणि जल यांच्या शक्तीचा, ऊर्जेचा आमच्याप्रमाणे तुम्हीही लाभ घ्या.) हे विद्वान, आपण (वैश्‍वानराय) जगनायक होण्यासाठी (उपयामगृहीतः) श्रेष्ठ नियमांनी ज्याचे मन संयमित झालेले आहे, आपण (असि) आहात. (त्वा) आपला व (ते) (एषः) (योनिः) आपले हे जे घर आहे, त्याचा व (त्वा) आपला (वैश्‍वानराय) समस्त जगाच्या हिताकरिता आम्ही सत्कार करतो. इतर सर्वांनीदेखील आपला असाच सत्कार केला पाहिजे (कारण आपण सूर्य, मेघ, जल, अग्नी आदी पदार्थाचे ज्ञान-विज्ञान आम्हास दिले व त्यांपासून लाभ प्राप्त करून दिला.) ॥6॥

    भावार्थ - भावार्थ -या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जो सूर्य अग्नी, जल आदी मूर्तिमान पदार्थांना आपल्या तेजाने छिन्न-भिन्न करतो आणि निरंतर भूमीवरील पाण्याचे आकर्षण करतो, मनुष्यांनी त्या सूर्याविषयीचे पूर्णज्ञान प्राप्त करून सर्व ऋतूमधे सुखदायक अशी घरें बांधावीत. ॥6॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top