Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 3/ मन्त्र 1
    ऋषिः - आङ्गिरस ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - गायत्री, स्वरः - षड्जः
    2

    स॒मिधा॒ग्निं दु॑वस्यत घृ॒तैर्बो॑धय॒ताति॑थिम्। आस्मि॑न् ह॒व्या जु॑होतन॥१॥

    स्वर सहित पद पाठ

    स॒मिधेति॑ स॒म्ऽइधा॑। अ॒ग्निम्। दु॒व॒स्य॒त॒। घृ॒तैः। बो॒ध॒य॒त॒। अति॑थिम्। आ। अ॒स्मि॒न्। ह॒व्या। जु॒हो॒त॒न॒ ॥१॥


    स्वर रहित मन्त्र

    समिधाग्निन्दुवस्यत घृतैर्बोधयतातिथिम् आस्मिन्हव्या जुहोतन ॥


    स्वर रहित पद पाठ

    समिधेति सम्ऽइधा। अग्निम्। दुवस्यत। घृतैः। बोधयत। अतिथिम्। आ। अस्मिन्। हव्या। जुहोतन॥१॥

    यजुर्वेद - अध्याय » 3; मन्त्र » 1
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे विद्वज्जन, (समिधा) ज्या ज्या इंधनांनी उत्तम प्रकारे प्रकाश होऊ शकतो, त्या लाकूड, तूप आदी पदार्थांनी (अग्निम्) भौतिक अग्नीला (बोधयल) उद्दीप्त करा, प्रकाशित करा. तसेच जसे (अतिथिम्) अतिथी म्हणजे ज्याच्या येण्या-जाण्याचा अथवा निवासाचा दिवस निश्‍चित नसतो, अशा (अ+तिथी) पाहुण्याची व संन्याशाची सेवा केली जाते, (आणि त्याच्यापासून ज्ञान विद्याही वस्तूंचा लाभ घेतला जातो) त्याप्रमाणे तुम्ही या अग्नीचा (दुवस्थव) उपयोग करा, त्यापासून लाभ घ्या. (अस्मिन्) अग्नीत (हव्या) कस्तूरी, केशर आदी सुगंधित पदार्थ, गुड, गुळीसाखर आदी गोड पदार्थ, तूप, दूध आदी पुष्टिकारक, तसेच रोगनाशक सोमलता म्हणजे गुडची आदी औषधी, या चार प्रकारच्या शाकल्याची आहुती देऊन (आजुहोतन) श्रेष्ठ प्रकारे हवन करा. ॥1॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचक लुप्तोपमालंकार आहे. ज्याप्रमाणे गृहस्थाश्रमी मनुष्य आसन, अन्न, जल, वस्त्र, देऊन आणि प्रियवचन उच्चारून घरी आलेल्या उत्तम गुणवान संन्यासी आदी वंदनीय व्यक्तींची सेवा करतात, त्यांचा आदर-सत्कार करतात, तद्वत विद्वज्जनांनी व (वैज्ञानिकांनी) यज्ञ, वेदी, मधे यथोचित इंधन, तुप आदी वस्तूंचा प्रयोग करून अग्नीस प्रज्वलित करावे. आणि त्याद्वारे वायू आणि वृष्टिजलाची शुद्धी करावी तसेच इंधन जल आणि अग्नी आदींना कलामंत्र (मशिनी) आणि यानामधे उपयोग करून यानांची निर्मिती नित्य करावी.॥1॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top