Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 3/ मन्त्र 42
    ऋषिः - शंयुर्ऋषिः देवता - वास्तुपतिरग्निर्देवता छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    2

    येषा॑म॒द्ध्येति॑ प्र॒वस॒न् येषु॑ सौमन॒सो ब॒हुः। गृ॒हानुप॑ह्वयामहे॒ ते नो॑ जानन्तु जान॒तः॥४२॥गृ॒हानुप॑ह्वयामहे॒ ते नो॑ जानन्तु जान॒तः॥४२॥

    स्वर सहित पद पाठ

    येषा॑म्। अ॒ध्येतीत्य॑धि॒ऽएति॑। प्र॒वस॒न्निति॑ प्र॒ऽवस॑न्। येषु॑। सौ॒म॒न॒सः। ब॒हुः। गृ॒हान्। उप॑। ह्व॒या॒म॒हे॒। ते। नः॒। जा॒न॒न्तु॒। जा॒न॒तः ॥४२॥


    स्वर रहित मन्त्र

    येषामध्येति प्रवसन्येषु सौमनसो बहुः । गृहानुप ह्वयामहे ते नो जानन्तु जानतः ॥


    स्वर रहित पद पाठ

    येषाम्। अध्येतीत्यधिऽएति। प्रवसन्निति प्रऽवसन्। येषु। सौमनसः। बहुः। गृहान्। उप। ह्वयामहे। ते। नः। जानन्तु। जानतः॥४२॥

    यजुर्वेद - अध्याय » 3; मन्त्र » 42
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (प्रवसन्) प्रवास करणारा अतिथी (येणाम्) ज्या गृहस्थांची (अध्येति) आठवण करतो, (त्यांच्या आतिथी-सत्काराचे स्मरण मोठ्या प्रेमाने करतो) आणि त्याचप्रमाणे (येषु) ज्या गृहस्थांच्या मनात अतिथीविषयी (बृहूः) अत्यंत प्रीती आहे, त्या (गृहान्) गृहस्थाची आम्ही अतिथीगण (अपहृयामहे) नेहमी प्रशंसा करतो. जे जे अशाप्रकारे अतिथीविषयी प्रेम बाळगणारे गृहस्थ आहेत, (ते) ते (जानतः) सुजाण व धार्मिक असल्यामुळे (नः) आम्हा अतिथी जनांना (जानंतु) अशाच प्रकारे जाणत राहोत (त्यांच्या मनातील अतिथी सत्काराची भावना अशीच जागृत राहो) ॥42॥

    भावार्थ - भावार्थ - गृहस्थाश्रमी लोकांनी धार्मिक अतिथीविषयी नेहमी अत्यंत प्रीतीभाव बाळगावा. तसेच अतिथीजनांनी देखील अशा स्वागतशील गृहस्थांविषयी प्रितीभाव ठेवावा, दुष्ट-दुराचारीजनांविषयी कदापी नको. तसेच गृहस्थांनी विद्वान अतिथीची संगती करून त्यांच्याशी वार्तालाप-संवाद करून आपल्या ज्ञानात वृद्धी करावी. तसेच अतिथी विद्वान असून परोपकारवृत्ती धारण करणारे आहेत, गृहस्थांनी त्यांची सेवा नित्य निरंतर व अवश्य करावी. अन्य अविद्वान स्वार्थीजनांची कदापी करूं नये ॥42॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top