Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 3/ मन्त्र 47
    ऋषिः - आगस्त्य ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - विराट् अनुष्टुप्, स्वरः - गान्धारः
    2

    अक्र॒न् कर्म॑ कर्म॒कृतः॑ स॒ह वा॒चा म॑यो॒भुवा॑। दे॒वेभ्यः॒ कर्म॑ कृ॒त्वास्तं॒ प्रेत॑ सचाभुवः॥४७॥

    स्वर सहित पद पाठ

    अक्र॑न्। कर्म॑। क॒र्म॒कृत॒ इति॑ कर्म॒ऽकृतः॑। स॒ह। वा॒चा। म॒यो॒भुवेति॑ मयः॒ऽभुवा॑। दे॒वभ्यः॑। कर्म॑। कृ॒त्वा। अस्त॑म्। प्र। इ॒त। स॒चा॒भु॒व॒ इति॑ सचाऽभुवः ॥४७॥


    स्वर रहित मन्त्र

    अक्रन्कर्म कर्मकृतः सह वाचा मयोभुवा । देवेभ्यः कर्म कृत्वास्तं प्रेत सचाभुवः ॥


    स्वर रहित पद पाठ

    अक्रन्। कर्म। कर्मकृत इति कर्मऽकृतः। सह। वाचा। मयोभुवेति मयःऽभुवा। देवभ्यः। कर्म। कृत्वा। अस्तम्। प्र। इत। सचाभुव इति सचाऽभुवः॥४७॥

    यजुर्वेद - अध्याय » 3; मन्त्र » 47
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - जी माणसें (मयोभुवा) सत्य आणि मंगल कारिणी (वाचा) वेदवाणीद्वारे अथवा आपल्या मधुर भाषणा (सह) सह (सचाभुवः) पास्पर एकमेकास सहकार्य देत (कर्मकृतः) कर्म करीत (कर्म) इच्छित उद्दिष्यासाठी कार्म (अक्रन) करतात, ते (देवेभ्यः) विद्वानांकरिता किंवा उत्तम गुण आणि सुख प्राप्त करण्याकरिता (कर्म) कर्त्तव्य-कर्म(कृत्वा) करतात, ते (अस्तम्) सुखाने परिपूर्ण अशा घरास प्राप्त होतात (त्यांच्या घरी नित्य सुखाचा निवास असतो) ॥47॥

    भावार्थ - भावार्थ - मनुष्यांसाठी हे उत्तम कर्म आहे की त्यांनी आळस झटकून नित्य निरंतर पुरूषार्थ करावा. मूर्खपणा सोडून वेदविद्येने शुद्ध आणि सत्य-वाणी बोलत सदा सत्याधारण करावे. तसेच परस्परात प्रेमभाव वाढवीत एकमेकास सदैव सहाय्य करावे. जी माणसे अशा प्रकारचे संभाषण आणि आचरण करतात, तेच श्रेष्ठ सुखाने परिपूर्ण मोक्षस्थितीस व इहलोकाच्या सुखांना प्राप्त करून आनंदित होतात या व्यतिरिक्त जी आळशी माणसें आहेत, त्यांना कदापी आनंद प्राप्त होत नाही. ॥47॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top