Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 4/ मन्त्र 1
    ऋषिः - प्रजापतिर्ऋषिः देवता - अबोषध्यौ देवते छन्दः - विराट् ब्राह्मी जगती, स्वरः - निषादः
    5

    एदम॑गन्म देव॒यज॑नं पृथि॒व्या यत्र॑ दे॒वासो॒ऽअजु॑षन्त॒ विश्वे॑। ऋ॒क्सा॒माभ्या॑ स॒न्तर॑न्तो॒ यजु॑र्भी रा॒यस्पोषे॑ण॒ समि॒षा म॑देम। इ॒माऽआपः॒ शमु॑ मे सन्तु दे॒वीरोष॑धे॒ त्राय॑स्व॒ स्वधि॑ते॒ मैन॑ꣳहिꣳसीः॥१॥

    स्वर सहित पद पाठ

    आ। इ॒दम्। अ॒ग॒न्म॒। दे॒व॒यज॑न॒मिति॑ देव॒यज॑नम्। पृ॒थि॒व्याः। यत्र॑। दे॒वासः॑। अजु॑षन्त। विश्वे॑। ऋ॒क्सा॒माभ्या॒मित्यृ॑क्ऽसा॒माभ्या॑म्। स॒न्तर॑न्त॒ इति॑ स॒म्ऽतर॑न्तः। यजु॑र्भि॒रिति॒ यजुः॑ऽभिः। रा॒यः। पोषे॑ण। सम्। इ॒षा। म॒दे॒म॒। इ॒माः। आपः॑। शम्। ऊँ॒ऽइ॒त्यूँ॑। मे॒। स॒न्तु॒। दे॒वीः। ओष॑धे। त्राय॑स्व। स्वधि॑त॒ इति॒ स्वऽधि॑ते। मा। ए॒न॒म्। हि॒ꣳसीः॒ ॥१॥


    स्वर रहित मन्त्र

    एदमगन्म देवयजनम्पृथिव्या यत्र देवासो अजुषन्त विश्वे । ऋक्सामाभ्याँ सन्तरन्तो यजुर्भी रायस्पोषेण समिषा मदेम । इमा आपः शमु मे सन्तु देवीरोषधे त्रायस्व । स्वधिते मैनँ हिँसीः ॥


    स्वर रहित पद पाठ

    आ। इदम्। अगन्म। देवयजनमिति देवयजनम्। पृथिव्याः। यत्र। देवासः। अजुषन्त। विश्वे। ऋक्सामाभ्यामित्यृक्ऽसामाभ्याम्। सन्तरन्त इति सम्ऽतरन्तः। यजुर्भिरिति यजुःऽभिः। रायः। पोषेण। सम्। इषा। मदेम। इमाः। आपः। शम्। ऊँऽइत्यूँ। मे। सन्तु। देवीः। ओषधे। त्रायस्व। स्वधित इति स्वऽधिते। मा। एनम्। हिꣳसीः॥१॥

    यजुर्वेद - अध्याय » 4; मन्त्र » 1
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे विद्वान (यजमान) (पृथिव्याः) भूमीवर मानव जन्म घेऊन (इदम्) हे (देवयजनम्) विद्वानांचे यजन व पूजन यांसाठी जे दान द्यायला पाहिजे ते प्राप्त करून तू (यत्र) ज्या देशास (ऋक्सामाग्याम्) ऋगवेद, सामवेद व (यजुर्भिः) यजुर्वेदाच्या मंत्रामधे सांगितलेल्या विद्येने (रायस्पषिण) धनाची पुष्टी व वृद्धी केली जाते (समिषा) उत्तमोत्तम विद्या प्राप्त करण्याची कामना केली जाते, तसेच अन्न आदीद्वारे दुःखांचा (सन्तस्तः) अंत केला जातो, त्या ठिकाणी आम्ही (विश्‍वे) सर्व (वेवासः) विद्वानांनी जावे व निवास करून) सुख (अगन्य) मिळवावा (अजुषन्त) सर्व प्रकारे आनंदोपभोग करावा, (उचित व धर्म विहित आहे) त्याच प्रमाणे (मे) मी (याज्ञिकजन नियमांप्रमाणे व उत्तम ज्ञानमय विधीने शुद्ध केलेले (इमाः) हे (देवीः) शुद्धजल माझ्यासाठी जसे सुखकर आहे, तसेच तू देखील त्या ठिकाणी जाऊन माझ्या विधीने शुद्ध व पेय जलाचे (जुषरच) सेवन कर. ते शुद्ध आणि आनंददायी जल आदी पदार्थ तिथे (तू नवीन प्रदेशात गेल्यानंतर) तुझ्याकरिता देखील (शमू) शांति व सख देणारे (सन्तु) होवोत. जसे (ओषधे) सोमलता आदी औषधी समुदाय सर्व रोगांपासून आमचे रक्षण करते, त्याप्रमाणे तू ही त्यांचे सेवन करून स्वतःचे (त्रायस्व) रक्षण कर. (स्वधिते) रोगनाशनाकार्यात वज्रासमान दृढ होऊन (हे औषधी) तू (एनम्) या यजमानास वा प्राणिमात्रास (मा हि ्ँ सीः) कधीही मारूं नकोस (औषधी सेवनामुळे कोणाला हानी होऊ नये वा मृत्यू येऊ नये औषधी वनस्पती सुखकारक असाव्यात) ॥1॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात लुप्तोपमालंकार आहे. ज्याप्रमाणे ही विद्वान मंडळी ब्रह्मचर्याचे पालन करून, उषनिषदांसह चारही वेदांचे अध्ययन करून व इतरांना विद्येचा प्रकाश व विस्तार करतात आणि याप्रमाणे स्वतः विद्वान होऊन व उत्तम कर्म करून सर्वांना सुखी करतात, त्याचप्रमाणे सर्व मनुष्यांचेही हे कर्तव्य आहे की त्यांनी या विद्वानांचा सत्कार करावा, त्यांच्याकडून वैदिक विद्या प्राप्त करावी आणि स्वतः शारिरीक तसेच आत्मिक बळ मिळूवन उवम धनसंपत्ती मिळवावी याप्रकारे मनुष्यांनी स्वतःही सुखी व आनंदित असावे आणि इतरांनाही सुखी आनंदित करावे. (विद्वानांनी सामान्यजनांना वेदादी शास्त्रांचे ज्ञान द्यावे आणि इतरांनी त्यांची सेवासत्कार करून त्यांच्यापासून विद्या-लाभ प्राप्त करावा.) ॥1॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top