Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 4/ मन्त्र 21
    ऋषिः - वत्स ऋषिः देवता - वाग्विद्युतौ देवते छन्दः - विराट् आर्षी बृहती, स्वरः - मध्यमः
    1

    वस्व्य॒स्यदि॑तिरस्यादि॒त्यासि॑ रु॒द्रासि॑ च॒न्द्रासि॑। बृह॒स्पति॑ष्ट्वा सु॒म्ने र॑म्णातु रु॒द्रो वसु॑भि॒राच॑के॥२१॥

    स्वर सहित पद पाठ

    वस्वी॑। अ॒सि॒। अदि॑तिः। अ॒सि॒। आ॒दि॒त्या। अ॒सि॒। रु॒द्रा। अ॒सि॒। च॒न्द्रा। अ॒सि॒। बृह॒स्पतिः॑। त्वा॒। सु॒म्ने। र॒म्णा॒तु॒। रु॒द्रः। वसु॑भि॒रिति॒॑ वसु॑ऽभिः। आ। च॒के॒ ॥२१॥


    स्वर रहित मन्त्र

    वस्व्यस्यदितिरस्यादित्यासि रुद्रासि चन्द्रासि । बृहस्पतिष्ट्वा सुम्ने रम्णातु रुद्रो वसुभिरा चके ॥


    स्वर रहित पद पाठ

    वस्वी। असि। अदितिः। असि। आदित्या। असि। रुद्रा। असि। चन्द्रा। असि। बृहस्पतिः। त्वा। सुम्ने। रम्णातु। रुद्रः। वसुभिरिति वसुऽभिः। आ। चके॥२१॥

    यजुर्वेद - अध्याय » 4; मन्त्र » 21
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे विद्वान मनुष्य, (वस्वी) 24 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य धारण करून व्रतस्थ माणसांनी ज्या अग्नीची सेवा केली (असि) आहे. किंवा करतात आणि (अग्नीच्या गुणांचा शोध करून त्यापासून यज्ञ, शिल्पविद्यादी विद्या प्राप्त केली आहे किंवा करतात, जो विद्या (अदितिः) प्रकाशकारी (असि) आहे, (रूद्राः) प्राणवायु विषयक ज्या विद्येला 44 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य धारण करणारे व्रतस्थजन प्राप्त करतात किंवा करू शकतात, अशी (असि) जी आहे, जी विद्या (आदिती) सूर्याप्रमाणे सर्व विद्यांना प्रकाशित करणारी (असि) आहे आणि ज्या विद्येला 48 वर्षापर्यंत ब्रह्मचर्यसेवी मनुष्यांनी जाणले असते, जी (चन्द्रा) अह्लाददायी (असि) आहे, जी विद्या (बृहस्पतिः) सर्वश्रेष्ठ (रूद्रः) रूद्र म्हणजे परमेश्‍वर किंवा ज्ञानी विद्वान (सुम्ने) सुखासाठी (रम्णातु) उपभोग करण्यासाठी देतात व दिली आहे, तसेच ज्या विद्येचा (वसुभिः) विद्याया मनुष्य वाणी वा विद्युत रूपाने (आचके) निर्माण करतात व ज्याची कामना करतात अथवा ज्या वाणी व विद्युतेची मी कामना करतो, माझ्याप्रमाणे त्या विद्येचा (वाणी व विद्युत-शास्त्राचा) (त्वा) तू देखील (रम्णातु) उपभोग घे त्या विषयी विविध प्रयोग, क्रिया आदी करून) त्या विद्येस प्राप्त करण्याची इच्छा कर. ॥21॥

    भावार्थ - भावार्थ – या मंत्रात श्‍लेष आणि वाचकलुप्तोपमा, हे दोन अलंकार आहेत. ज्याप्रमाणे पृथ्वीवर असलेले वाणी, विद्युत व प्राणशक्ती यांचा विद्वज्जन (ज्ञानी व वैज्ञानिकजन) अनेक व्यवहारांसाठी अथवा कार्यपूर्तीसाठी उपयोग करतात आणि ज्यांचा धर्मपूर्वक सेवन करून त्यांपासून जितेंद्रिय जन यथोचित उपयोग घेतात, त्या वाणी आणि विद्युत शक्तीचा शोध व बोध मनुष्यांनी वैज्ञानिक क्रिया प्रयोगादीद्वारे अधिकाधिक वाढविला पाहिजे व त्याद्वारा सुखांचा उपयोग घ्यायला पाहिजे ॥21॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top