Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 40/ मन्त्र 8
    ऋषिः - दीर्घतमा ऋषिः देवता - आत्मा देवता छन्दः - स्वराड्जगती स्वरः - निषादः
    4

    स पर्य॑गाच्छु॒क्रम॑का॒यम॑व्र॒णम॑स्नावि॒रꣳ शु॒द्धमपा॑पविद्धम्।क॒विर्म॑नी॒षी प॑रि॒भूः स्व॑य॒म्भूर्या॑थातथ्य॒तोऽर्था॒न् व्यदधाच्छाश्व॒तीभ्यः॒ समा॑भ्यः॥८॥

    स्वर सहित पद पाठ

    सः। परि॑। अ॒गा॒त्। शु॒क्रम्। अ॒का॒यम्। अ॒व्र॒णम्। अ॒स्ना॒वि॒रम्। शु॒द्धम्। अपा॑पविद्ध॒मित्यपा॑पऽविद्धम् ॥ क॒विः। म॒नी॒षी। प॒रि॒भूरिति॑ परि॒ऽभूः। स्व॒यम्भूरिति॑ स्वय॒म्ऽभूः। या॒था॒त॒थ्य॒त इति॑ याथाऽत॒थ्य॒तः। अर्था॑न्। वि। अ॒द॒धा॒त्। शा॒श्व॒तीभ्यः॑। समा॑भ्यः ॥८ ॥


    स्वर रहित मन्त्र

    स पर्यगाच्छुक्रमकायमव्रणमस्नाविरँ शुद्धमपापविद्धम् । कविर्मनीषी परिभूः स्वयम्भूर्याथातथ्यतोर्थान्व्यदधाच्छाश्वतीभ्यः समाभ्यः ॥


    स्वर रहित पद पाठ

    सः। परि। अगात्। शुक्रम्। अकायम्। अव्रणम्। अस्नाविरम्। शुद्धम्। अपापविद्धमित्यपापऽविद्धम्॥ कविः। मनीषी। परिभूरिति परिऽभूः। स्वयम्भूरिति स्वयम्ऽभूः। याथातथ्यत इति याथाऽतथ्यतः। अर्थान्। वि। अदधात्। शाश्वतीभ्यः। समाभ्यः॥८॥

    यजुर्वेद - अध्याय » 40; मन्त्र » 8
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यानो, तो परब्रह्म (शुक्रम्) शीघ्रकारी सर्वशक्तिमान असून (अकायम्) स्थूल, सूक्ष्म वा कारण शरीर नसलेला आहे. तो (अव्रणम्) त्यात छिद्र नसून त्यास छेदता भेदता वा खंडित करता येत नाही. (अथवा त्याचा शरीर नसल्यामुळे त्याला व्रण, प्रहार आदी होणे शक्य नाही.) तो (अस्नाविरम्) शिरा, नाडी आदी नसलेला म्हणजे अशरीरी कोणत्याही बंधनात बद्ध होणारा नाही. तो (शुद्धम्) अविद्या आदी दोषापासून मुक्त असल्यामुळे सदा पवित्र असून (अपापविद्धम्) तो पापयुक्त, पापी व पाप करण्याविषयी सर्वत्र आहे आणि (मनीषी) जीवांच्या मनोवृत्ती जाणणारा आहे. तो (परिभूः) आहे म्हणजे (जीवाप्रमाणे) त्याची संयोगाने उत्पत्ती आणि वियोग-विच्छेदाने नाश होत नसून त्याला माता-पिता नाहीत, त्यास गर्भवास, जन्म, वृद्धी, आणि मरण नाही. तो परमात्मा (शाश्‍वतीभ्यः) सनातन, अनादिस्वरूप स्वरूपाने उत्पति-विनाश रहित (जो जीवात्मा) त्या (प्रजाभ्यः) जीवात्म्यासाठी (यथातथ्यतः) यथार्थ प्रकारे (अर्थात्) वेदात वर्णन केलेल्या पदार्थांची (व्यदधात्) विशेषत्वाने निर्मिती करतो. हे मनुष्यानो, तोच परमेश्‍वर तुमच्यासाठी उपासनीय आहे. (तुम्ही त्याचीच उपासना करा) ॥8॥

    भावार्थ - भावार्थ - हे मनुष्यानो, तो अनंत शक्तिमान, अजन्मा, नित्य, सदामुक्त, न्यायकारी, निर्मल, सर्वज्ञ, सर्वसाक्षी, नियन्ता, अनादिस्वरूप, परमेश्‍वर जर ब्रह्मकल्पाच्या प्रारंभी जीवांसाठी आपल्या वेदज्ञानाद्वारे शब्द, अर्थ आणि शब्दार्थसम्बन्ध या विषयाचे ज्ञान देणार नाही, (भाषा आणि वेदज्ञानाचा प्रकाश करणार नाही, तर कोणीतरी मनुष्य विद्वान होऊ शकेल काय? (वा होऊ शकला असता काय? तसेच ईश्‍वराने ते वेदज्ञान मानवास दिले नसते, तर, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची फळें उपभोगण्यासाठी कोणी समर्थ झाला असता काय? यामुळे हे मनुष्यानो, तुम्ही त्या परमेश्‍वराची. सदैव उपासना करा. ॥8॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top