Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 5/ मन्त्र 39
    ऋषिः - आगस्त्य ऋषिः देवता - सोमसवितारौ देवते छन्दः - साम्नी बृहती,निचृत् आर्षी पङ्क्ति, स्वरः - मध्यमः, पञ्चमः
    6

    देव॑ सवितरे॒ष ते॒ सोम॒स्तꣳ र॑क्षस्व॒ मा त्वा॑ दभन्। ए॒तत्त्वं दे॑व सोम दे॒वो दे॒वाँ२ऽउपागा॑ऽइ॒दम॒हं म॑नु॒ष्यान्त्स॒ह रा॒यस्पोषे॑ण॒ स्वाहा॒ निर्वरु॑णस्य॒ पाशा॑न्मुच्ये॥३९॥

    स्वर सहित पद पाठ

    देव॑। स॒वि॒तः॒। ए॒षः। ते॒। सोमः॑। तम्। र॒क्ष॒स्व॒। मा। त्वा॒। द॒भ॒न्। ए॒तत्। त्वम्। दे॒व॒। सो॒म॒। दे॒वः। दे॒वान्। उप॑। अ॒गाः॒। इ॒दम्। अ॒हम्। म॒नु॒ष्या॒न्। स॒ह। रा॒यः। पोषे॑ण। स्वाहा॑। निः। वरु॑णस्य। पाशा॑त्। मु॒च्ये॒ ॥३९॥


    स्वर रहित मन्त्र

    देव सवितरेष ते सोमस्तँ रक्षस्व मा त्वा दभन् । एतत्त्वन्देव सोम देवो देवाँऽउपागा इदमहम्मनुष्यान्त्सह रायस्पोषेण स्वाहा निर्वरुणस्य पाशान्मुच्ये ॥


    स्वर रहित पद पाठ

    देव। सवितः। एषः। ते। सोमः। तम्। रक्षस्व। मा। त्वा। दभन्। एतत्। त्वम्। देव। सोम। देवः। देवान्। उप। अगाः। इदम्। अहम्। मनुष्यान्। सह। रायः। पोषेण। स्वाहा। निः। वरुणस्य। पाशात्। मुच्ये॥३९॥

    यजुर्वेद - अध्याय » 5; मन्त्र » 39
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - सर्व विद्यांचा प्रकाश करणारे आणि ऐश्‍वर्यसंपन्न हे सभाध्यक्ष (राष्ट्राध्यक्ष) महोदय, ज्याप्रमाणे मी (एक नागरिक) आपल्या साहाय्याने (आपण मला निर्भय वातावरण दिल्यामुळे) माझ्या वैयक्तिक वैभवाचे संग्रहण रक्षण करतो, त्याप्रमाणे आपण देखील (एषः) ही जो (ते) आपली (सोमः) ऐश्‍वर्याराशी आहे (तं) त्या राष्ट्रीय संपदेची (रक्षस्व) रक्षा करा. ज्याप्रमाणे (आपले संरक्षण मिळाल्यामुळे) शत्रुजन मला दुःख वा त्रास देऊ शकत नाहींत, त्याप्रमाणे (त्वां) आपणांस देखील त्यांच्याकडून (मा दभन्) कोणता त्रास होऊ नये (अशी माझी इच्छा आहे) हे (देव) सुखदाता आणि (सोम) आम्हांस सन्मार्गावर सज्जनांसह चालविणार्‍या हे राजन्, (त्वं) आपण (एतत्) या हेतूंसाठी सभाध्यक्ष आणि (देवः) विद्येत परिपूर्ण अशा (देवाम्) श्रेष्ठ विद्वज्जनं (उप) यांच्याजवळ (अगाः) जा आणि मीही जाईन. तसेच ज्याप्रमाणे मी (इदं) असे श्रेष्ठ आचरण करून (रायः) धनाची (पुष्ट्या) पुष्टी व समृद्धी प्राप्त करतो व (मनुष्यान्) विचारवंत मनुष्यांच्या आणि (देवान्) विद्वानांच्या जवळ जाऊन (वरूणस्य) दु:खदायी आणि अवमानकारी दुष्टांच्या (पाशात्) बंधनापासून (मुच्ये) मुक्त होतो, त्याप्रमाणे आपणही दुष्टाच्या बंधनापासून दूर वा मुक्त राहा ॥39॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. सर्व मनुष्यांचे कर्त्तव्य आहे की त्यांनी अप्राप्त ऐश्‍वर्याच्या प्राप्तीसाठी पुरुषार्थ अवश्य करावा, प्राप्त ऐश्‍वर्याची जपणूक व वृद्धी करीत राहावी. तसेच सर्वांनी धार्मिक जनांची संगती करावी सज्जनांचा आदर-मान करीत, धर्माचे पालन करीत विज्ञानात प्रगती करून सदा दुःख बंधनातून मुक्त व्हावे वा राहावे. ॥39॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top