Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 9/ मन्त्र 12
    ऋषिः - बृहस्पतिर्ऋषिः देवता - इन्द्राबृहस्पती देवते छन्दः - स्वराट अति धृति, स्वरः - षड्जः
    5

    ए॒षा वः॒ सा स॒त्या सं॒वाग॑भू॒द् यया॒ बृह॒स्पतिं॒ वाज॒मजी॑जप॒ताजी॑जपत॒ बृह॒स्पतिं॒ वाजं॒ वन॑स्पतयो॒ विमु॑च्यध्यम्। ए॒षाः वः॒ स॒त्या सं॒वाग॑भू॒द् ययेन्द्रं॒ वाज॒मजी॑जप॒ताजी॑जप॒तेन्द्रं॒ वाजं॒ वन॑स्पतयो॒ विमु॑च्यध्वम्॥१२॥

    स्वर सहित पद पाठ

    ए॒षा। वः॒। सा। स॒त्या। सं॒वागिति॑ स॒म्ऽवाक्। अ॒भू॒त्। यया॑। बृह॒स्प॑तिम्। वाज॑म्। अजी॑जपत। अजी॑जपत। बृह॒स्पति॑म्। वाज॑म्। वन॑स्पतयः। वि। मु॒च्य॒ध्व॒म्। ए॒षा। वः॒। सा। स॒त्या। संवागिति॑ स॒म्ऽवाक्। अ॒भू॒त्। यया॑। इन्द्र॑म्। वाज॑म्। अजी॑जपत। अजी॑जपत। इन्द्र॑म्। वाज॑म्। वन॑स्पतयः। वि। मु॒च्य॒ध्व॒म् ॥१२॥


    स्वर रहित मन्त्र

    एषा वः सा सत्या सँवागभूद्यया बृहस्पतिँवाजमजीजपताजीजपत बृहस्पतिँवाजन्वनस्पतयो विमुच्यध्वम् । एषा वः सा सत्या सँवागभूद्ययेन्द्रँवाजमजीजपताजीजपतेन्द्रँवाजँवनस्पतयो वि मुच्यध्वम् ॥


    स्वर रहित पद पाठ

    एषा। वः। सा। सत्या। संवागिति सम्ऽवाक्। अभूत्। यया। बृहस्पतिम्। वाजम्। अजीजपत। अजीजपत। बृहस्पतिम्। वाजम्। वनस्पतयः। वि। मुच्यध्वम्। एषा। वः। सा। सत्या। संवागिति सम्ऽवाक्। अभूत्। यया। इन्द्रम्। वाजम्। अजीजपत। अजीजपत। इन्द्रम्। वाजम्। वनस्पतयः। वि। मुच्यध्वम्॥१२॥

    यजुर्वेद - अध्याय » 9; मन्त्र » 12
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (वनस्पतय्:) सूर्याच्या किरणांप्रमाणे सर्वांशी न्याय्यपणे वागणार्‍या राजपुरुषहो, (सूर्याची किरणें सर्व वनस्पती, वृक्षादींना सारखेपणाने प्रकाश देतात, तद्वत सर्वांना न्यायोचित अधिकार देणार्‍या शासकीय अधिकार्‍यांनो) (यया) ज्या उत्तम वाणी आहेत, त्या (तुमच्या वाणी वा उपदेशाने) (बृहस्पतिम्) वेदशास्त्रज्ञाता-अध्येताजनाच्या (वाजम्) अध्ययन, ज्ञान व बोधाला (अजीजपत) वाढवा. तसेच त्या उपदेशाने (बृहस्पतिम्) विशाल व महान राजाच्या रक्षक राजपुरुषाला (अजीजपत) संग्रामात विजयी करा. (सा) ती (एषा) ही आताची वाणी वा तुम्ही पुढे बोलणार ती वचने (व:) तुमच्या (संवाक्) राजनीतीमधे ती वाणी उत्तम आणि (सत्या) सत्य (अभूत्) व्हावी. (तुम्ही सदा वर्तमानकाळीं व भविष्यात देखील केवळ सत्यवचनें बोलावीत) हे (वनस्पतय:) सूर्याच्या किरणांप्रमाणे न्यायाने प्रजेचे रक्षण करणार्‍या राजपुरुष हो, तुम्ही (यथा) (तुमच्याजवळ जी तुमची श्रेष्ठवाणी, मधुरवचनें आहेत) त्या वचनांनी (इन्द्रम्) परमैश्वर्य मिळवणार्‍या सेनापतीला (वाजम्) युद्धात (अजीजपठ) विजय मिळवून द्या. (अधिकार्‍यांनी वाणी व वागणुकीने सैनिकांचा उत्साह वाढवावा) (इन्द्रम्) परमैश्वर्यशायी पुरुषाचा (वाजम्) अत्युत्तम समृद्धी देणारा उद्योग-व्यवसाय (अजीजपत) उत्तमप्रकारे यशस्वी होईल, असे करा. (सा) तुमची ती (एषा) आणि ही म्हणजे मागील काळात व पुढीलकाळी प्रकाश उत्साह देणारी वाणी सदा (सत्या) सत्यभाषणयुक्त (अभूत्) व्हावी. ॥12॥

    भावार्थ - भावार्थ - राजा, त्याचे सेवक (अधिकारी, कर्मचारी) तसेच प्रजाजन, सर्वांसाठी उचित आहे की आपली प्रतिज्ञा (दिलेले वचन, आश्वासन आदी) तसेच आपली वाणी कधीही खोटी ठरू देऊ नये. जे जे जेवढे म्हणले, बोलले, ते ते तेवढे करून दाखवावे. कारण की ज्या मनुष्याची वाणी वा वचनें सदा खरीं ठरतात, होतात तोच राज्यशासनासाठी योग्य पात्र मनुष्य असतो. जर असे असणार नाही, (बोललेले खरे करून दाखवणार नाही, तर राजा आणि प्रजा यांमध्ये कधीही परस्परात विश्वास निर्माण होणार नाही आणि परिणामीं सुखाची प्राप्ती कदापि होणार नाही. ॥12॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top