Loading...
यजुर्वेद अध्याय - 31

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 31/ मन्त्र 18
    ऋषिः - उत्तरनारायण ऋषिः देवता - आदित्यो देवता छन्दः - निचृत्त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    0

    वेदा॒हमे॒तं पुरु॑षं म॒हान्त॑मादि॒त्यव॑र्णं॒ तम॑सः प॒रस्ता॑त्।तमे॒व वि॑दि॒त्वाति॑ मृ॒त्युमे॑ति॒ नान्यः पन्था॑ विद्य॒तेऽय॑नाय॥१८॥

    स्वर सहित पद पाठ

    वेद॑। अ॒हम्। ए॒तम्। पुरु॑षम्। म॒हान्त॑म्। आ॒दि॒त्यव॑र्ण॒मित्या॑दि॒त्यऽव॑र्णम्। तम॑सः। प॒रस्ता॑त् ॥ तम्। ए॒व। वि॒दि॒त्वा। अति॑। मृ॒त्युम्। ए॒ति॒। न। अ॒न्यः। पन्थाः॑। वि॒द्य॒ते॒। अय॑नाय ॥१८ ॥


    स्वर रहित मन्त्र

    वेदाहमेतम्पुरुषम्महान्तमादित्यवर्णन्तमसः परस्तात् । तमेव विदित्वाति मृत्युमेति नान्यः पन्था विद्यतेयनाय ॥


    स्वर रहित पद पाठ

    वेद। अहम्। एतम्। पुरुषम्। महान्तम्। आदित्यवर्णमित्यादित्यऽवर्णम्। तमसः। परस्तात्॥ तम्। एव। विदित्वा। अति। मृत्युम्। एति। न। अन्यः। पन्थाः। विद्यते। अयनाय॥१८॥

    यजुर्वेद - अध्याय » 31; मन्त्र » 18
    Acknowledgment

    व्याखान -

    सहस्रशीर्ष इत्यादी विशेषण असलेला पुरुष सर्वत्र परिणा भरलेला आहे. [पूर्णत्वात्पुरिशयनाद्वा पुरुष इति निरुक्तोक्तेः] त्या पुरुषाला मी जाणतो सर्व मनुष्यांनी ही त्या परमेश्वराला अवश्य जाणावे. त्याला कधीही विसरू नये. इतर कोणालाही ईश्वर मानू नये. तो कसा आहे? (महान्तम्) त्याच्या इतका मोठा कोणी नाही किंवा त्याच्याशी कुणाची तुलना होऊ शकत नाही. (आदित्यवर्णम्) सूर्याचा निर्माणकर्ता व प्रकाशक तोच आहे. तो (तमसः परस्तात्) अविद्या इत्यादी दोषांनी रहित आहे व भक्त आणि धर्मात्मा सत्यप्रेमी लोकांनाही अविद्या इत्यादी दोषांपासून दूर करणारा आहे. विद्वानांची अशी खात्री असते की परब्रह्माचे ज्ञान आणि त्याच्या कृपेशिवाय कोणताही जीव कधीही सुखी होऊ शकत नाही. (तमेव विदित्वे इत्यादी) त्या परमेश्वराला जाणूनच जीव मृत्यूच्या दुःखातून सुटू शकतो, अन्यथा नाही. (नाऽन्यः पन्था विद्यते ऽ यनाय) परमेश्वराच्या भक्तिशिवाय व ज्ञानाशिवाय मुक्ती मिळण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही. परमेश्वराची अशी आज्ञा आहे की सर्व माणसांनी याप्रमाणे वागावे आणि वेदाविरुद्ध आचरण [पाखंड] सोडून द्यावे.॥८॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top