Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 211
ऋषिः - गोषूक्त्यश्वसूक्तिनौ काण्वायनौ देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

अ꣣पां꣡ फेने꣢꣯न꣣ न꣡मु꣢चेः꣣ शि꣡र꣢ इ꣣न्द्रो꣡द꣢वर्तयः । वि꣢श्वा꣣ य꣡दज꣢꣯य꣣ स्पृ꣡धः꣢ ॥२११॥

स्वर सहित पद पाठ

अ꣣पा꣢म् । फे꣡ने꣢꣯न । न꣡मु꣢꣯चेः । न । मु꣣चेः । शि꣡रः꣢꣯ । इ꣣न्द्र । उ꣢त् । अ꣣वर्तयः । वि꣡श्वाः꣢꣯ । यत् । अ꣡ज꣢꣯यः । स्पृ꣡धः꣢꣯ ॥२११॥


स्वर रहित मन्त्र

अपां फेनेन नमुचेः शिर इन्द्रोदवर्तयः । विश्वा यदजय स्पृधः ॥२११॥


स्वर रहित पद पाठ

अपाम् । फेनेन । नमुचेः । न । मुचेः । शिरः । इन्द्र । उत् । अवर्तयः । विश्वाः । यत् । अजयः । स्पृधः ॥२११॥

सामवेद - मन्त्र संख्या : 211
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 10;
Acknowledgment

भावार्थ - जसा एखादा वैद्य समुद्रफेन या औषधाने रोग नष्ट करतो, जसा राजा प्रजेकडून कररूपाने प्राप्त झालेल्या धनाने प्रजेचे दु:ख दूर करतो व जसे सेनापती शस्त्रास्त्र-समूहाने शत्रूचे मस्तक छाटतो, तसेच परमेश्वर व जीवात्मा मानवी मनाच्या सात्त्विक वृत्तीने पाप उन्मूलित करतात. ॥८॥ येथे सायणाचार्याने हा इतिहास प्रदर्शित केलेला आहे- प्रथम इंद्र असुरांना जिंकून ही नमुचि नामक असुराला पकडण्यात असमर्थ होता. उलट नमुचिनेच युद्ध करत इंद्राला पकडले पकडलेल्या इंद्राला नमुचिने म्हटले की, तुला मी एका शर्तीवर सोडू शकतो, की तू मला कधी दिवसा मारू नये किंवा रात्री मारू नये. शुष्क कोरड्या शस्त्राने मारू नये किंवा ओलसर शस्त्राने मारू नये. जेव्हा इंद्राने ही अट कबूल केली तेव्हा नमूचिने त्याची सुटका केली. सुटका झाल्यावर इंद्राने दिवस व रात्रीच्या संध्याकाळी फेसाद्वारे त्याचे मस्तक उडविले (कारण दिवस व रात्रीच्या संध्याकाळाला दिवस किंवा रात्र म्हणता येत नाही व फेस हा कोरडा नसतो किंवा ओला नसतो) हा इतिहास दर्शवून सायण म्हणतो की हाच विषय या ऋचेमध्ये प्रतिपादित आहे. वास्तविक हे कल्पित कथानक आहे, खरोखर घडलेला इतिहास नाही. ॥८॥

इस भाष्य को एडिट करें
Top