Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 222
ऋषिः - मेधातिथिः काण्वः देवता - विष्णुः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
2

इ꣣दं꣢꣫ विष्णु꣣र्वि꣡ च꣢क्रमे त्रे꣣धा꣡ नि द꣢꣯धे प꣣द꣢म् । स꣡मू꣢ढमस्य पाꣳसु꣣ले꣡ ॥२२२॥

स्वर सहित पद पाठ

इ꣣द꣢म् । वि꣡ष्णुः꣢꣯ । वि । च꣣क्रमे । त्रेधा꣢ । नि । द꣣धे । पद꣢म् । स꣡मू꣢꣯ढम् । सम् । ऊढम् । अस्य । पासुले꣢ ॥२२२॥


स्वर रहित मन्त्र

इदं विष्णुर्वि चक्रमे त्रेधा नि दधे पदम् । समूढमस्य पाꣳसुले ॥२२२॥


स्वर रहित पद पाठ

इदम् । विष्णुः । वि । चक्रमे । त्रेधा । नि । दधे । पदम् । समूढम् । सम् । ऊढम् । अस्य । पासुले ॥२२२॥

सामवेद - मन्त्र संख्या : 222
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 11;
Acknowledgment

भावार्थ - विष्णू सूर्य आपल्या किरणांद्वारे सर्व ग्रहोपग्रहांना व्याप्त करून प्रकाशित करतो. सूर्याच्या तापाने औषधी, वनस्पती इत्यादी परिपक्व होते. सूर्य जरी तिन्ही स्थानी आपले किरणरूपी पाय रोवतो, तरीही त्याची किरणे पृथ्वी व आकाशातही प्रत्यक्ष रूपाने दिसून येतात. भूगर्भातही ती मातीच्या कणांना लोखंड, तांबे, सोने इत्यादी रूपात परिणत करतात. हे सर्वांचे नेत्र पाहू शकत नाहीत, तर भूगर्भवेत्ता वैज्ञानिक लोकच हे रहस्य जाणू शकतात. तसेच विष्णू परमेश्वराने आपल्या सत्तेने ब्रह्मांडाला व्याप्त केलेले आहे. तो सर्व पदार्थ सृष्टीच्या आरंभी उत्पन्न करतो, धारण करतो व प्रलयकाळी त्यांचा संहार करतो. हे तीन रूपाचे त्याचे कार्य तीन प्रकारे पाय ठेवण्याच्या रूपात वर्णिलेले आहे. जरी त्याने सर्व स्थानी पाय ठेवलेले आहेत तरी जसे एखाद्याचा धुळीने माखलेला व लपलेला पाय दिसत नाही तसेच त्याचे सर्वत्र विद्यमान स्वरूपही दृष्टिगोचर होत नाही. ॥९॥

इस भाष्य को एडिट करें
Top