Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 323
ऋषिः - द्युतानो मारुतः
देवता - इन्द्रः
छन्दः - त्रिष्टुप्
स्वरः - धैवतः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
अ꣡व꣢ द्र꣣प्सो꣡ अ꣢ꣳशु꣣म꣡ती꣢मतिष्ठदीया꣣नः꣢ कृ꣣ष्णो꣢ द꣣श꣡भिः꣢ स꣣ह꣡स्रैः꣢ । आ꣢व꣣त्त꣢꣫मिन्द्रः꣣ श꣢च्या꣣ ध꣡म꣢न्त꣣म꣢प꣣ स्नी꣡हि꣢तिं नृ꣣म꣡णा꣢ अध꣣द्राः꣢ ॥३२३॥
स्वर सहित पद पाठअ꣡व꣢꣯ । द्र꣣प्सः꣢ । अ꣣ऽशुम꣡ती꣢म् । अ꣣तिष्ठत् । ईयानः꣢ । कृ꣣ष्णः꣢ । द꣣श꣡भिः꣢ । स꣣ह꣡स्रैः꣢ । आ꣡व꣢꣯त् । तम् । इ꣡न्द्रः꣢꣯ । श꣡च्या꣢꣯ । ध꣡म꣢꣯न्तम् । अ꣡प꣢꣯ । स्नी꣡हि꣢꣯तिम् । नृ꣣म꣡णाः꣢ । नृ꣣ । म꣡नाः꣢꣯ । अ꣣धत् । राः꣢ ॥३२३॥
स्वर रहित मन्त्र
अव द्रप्सो अꣳशुमतीमतिष्ठदीयानः कृष्णो दशभिः सहस्रैः । आवत्तमिन्द्रः शच्या धमन्तमप स्नीहितिं नृमणा अधद्राः ॥३२३॥
स्वर रहित पद पाठ
अव । द्रप्सः । अऽशुमतीम् । अतिष्ठत् । ईयानः । कृष्णः । दशभिः । सहस्रैः । आवत् । तम् । इन्द्रः । शच्या । धमन्तम् । अप । स्नीहितिम् । नृमणाः । नृ । मनाः । अधत् । राः ॥३२३॥
सामवेद - मन्त्र संख्या : 323
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 10;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 10;
Acknowledgment
भावार्थ - देहात स्थित जीवात्म्याला काम, क्रोध इत्यादी अनेक दानव त्रस्त करू इच्छितात. आपल्या पुरुषार्थाने व परमेश्वराच्या साह्याने त्यांचा पराभव करावा लागतो. तेव्हाच तो आध्यात्मिक व भौतिक ऐश्वर्य प्राप्त करू शकतो. ॥१॥
टिप्पणी -
या मंत्राचा सायण ऐतिहासिक अर्थ लावतात - ‘‘पूर्वी कृष्ण नावाचा असुर दहा हजार असुरांबरोबर अंशुमती नावाच्या नदीच्या किनारी थांबला होता. तेथे जंगलाच्या मध्यभागी स्थित त्या कृष्णासुराजवळ इंद्र बृहस्पतीबरोबर पोचला. त्याने कृष्णासुर व त्याच्या अनुचरांना बृहस्पतीच्या साह्याने मारून टाकले होते.’’ हा सर्व वृत्तांत अप्रमाणिक आहे. कारण वेदामध्ये लौकिक इतिहास नाही. या इतिहासात जर आध्यात्मिक, आधिदैविक, अधियज्ञ किंवा अधिभूत व्याख्या केल्यास संगती लागू शकते. जसा आम्ही आपल्या व्याख्येत आध्यात्मिक अर्थ दर्शविलेला आहे. आपल्या बुद्धीने चारही वेदांचा इंग्रजी भाषेत अनुवाद करणाऱ्या ग्रिफिथ महाशयांनी या मंत्राच्या अर्थामध्ये लिहिलेले आहे की, ‘कृष्ण द्रस’ अंधकारावृत चंद्र आहे व अंशुमती अंतरिक्षातील एखादी रहस्यमय नदी आहे. दहा हजार असुर अंधकाररूपी दानव आहेत. ज्यांच्या वधानंतर चंद्रमा अंधकारातून मुक्त होतो. ग्रिफिथ हा लेख आधिदैविक व्याख्येकडे संकेत आहे.