Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 376
ऋषिः - सव्य आङ्गिरसः
देवता - इन्द्रः
छन्दः - जगती
स्वरः - निषादः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
अ꣣भि꣢꣫ त्यं मे꣣षं꣡ पु꣢रुहू꣣त꣢मृ꣣ग्मि꣢य꣣मि꣡न्द्रं꣢ गी꣣र्भि꣡र्म꣢दता꣣ व꣡स्वो꣢ अर्ण꣣व꣢म् । य꣢स्य꣣ द्या꣢वो꣣ न꣢ वि꣣च꣡र꣢न्ति꣣ मा꣡नु꣢षं भु꣣जे꣡ मꣳहि꣢꣯ष्ठम꣣भि꣡ विप्र꣢꣯मर्चत ॥३७६॥
स्वर सहित पद पाठअ꣣भि꣢ । त्यम् । मे꣣ष꣢म् । पु꣣रुहूत꣢म् । पु꣣रु । हूत꣢म् । ऋ꣣ग्मि꣡य꣢म् । इ꣡न्द्र꣢꣯म् । गी꣣र्भिः꣢ । म꣣दत । व꣡स्वः꣢꣯ । अ꣣र्णव꣢म् । य꣡स्य꣢꣯ । द्या꣡वः꣢꣯ । न । वि꣣चर꣢न्ति । वि꣣ । च꣡र꣢꣯न्ति । मा꣡नु꣢꣯षम् । भु꣣जे꣢ । मँ꣡हि꣢꣯ष्ठम् । अ꣣भि꣢ । वि꣡प्र꣢꣯म् । वि । प्र꣣म् । अर्चत ॥
स्वर रहित मन्त्र
अभि त्यं मेषं पुरुहूतमृग्मियमिन्द्रं गीर्भिर्मदता वस्वो अर्णवम् । यस्य द्यावो न विचरन्ति मानुषं भुजे मꣳहिष्ठमभि विप्रमर्चत ॥३७६॥
स्वर रहित पद पाठ
अभि । त्यम् । मेषम् । पुरुहूतम् । पुरु । हूतम् । ऋग्मियम् । इन्द्रम् । गीर्भिः । मदत । वस्वः । अर्णवम् । यस्य । द्यावः । न । विचरन्ति । वि । चरन्ति । मानुषम् । भुजे । मँहिष्ठम् । अभि । विप्रम् । वि । प्रम् । अर्चत ॥
सामवेद - मन्त्र संख्या : 376
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 3;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 3;
Acknowledgment
भावार्थ - जसा सुखवर्षक, असीम ऐश्वर्यवान, सर्वात पूजा करण्यायोग्य आहे, तसेच या गुणांनी युक्त राजा प्रजाजनाकडून सत्कारित व प्रोत्साहित करण्यायोग्य आहे. ॥७॥
टिप्पणी -
विवरणकार माधवने या मंत्रावर असा इतिहास लिहिलेला आहे - अंगिरा नावाचा ऋषी होता. त्याने इंद्राला पुत्ररूपाने प्राप्त करण्याची याचना करत आत्मध्यान केले. त्याच्या योगैश्वर्याच्या बलाने त्याच ध्यानामुळे त्याला सव्य नावाचा इंद्र पुत्ररूपाने प्राप्त झाला. त्याला इंद्राने मेषरूप धारण करून पळवून नेले. ही कथा इतिहास दाखविणारी ऋचा आहे, ज्यात मेषरूपधारी इंद्राची स्तुती केलेली आहे, परंतु ही घटना वास्तविक नाही. मंत्राचा ऋषी अङ्गिरस सव्य आहे व मंत्रात इंद्राला मेष म्हटले आहे. हे पाहून वरील कथा रचलेली आहे. सायणने प्रथम मेष शब्दाला तुदादिगणाच्या स्पर्धार्थक मिष धातुने निष्पन्न मानून ‘मेप’चा यौगिक अर्थ ‘शत्रुंबरोबर स्पर्धा करणारा’ असा करून ही वैकल्पिक रूपाने हा इतिहासही दिलेला आहे कि - कण्वाचा पुत्र मेधातिथी यज्ञ करत होता, तेव्हा इंद्र मेषाचे रूप धारण करून आला व त्याने सोमरसाचे प्राशन केले तेव्हा ऋषीने त्याला मेष म्हटले होते, त्यासाठी आताही इंद्राला मेष म्हटले जाते. ही कथाही काल्पनिक आहे. वास्तविक घडलेल्या इतिहासाचे वर्णन या मंत्रात नाही. हे सुज्ञांनी ओळखावे.