Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 380
ऋषिः - कुत्स आङ्गिरसः
देवता - इन्द्रः
छन्दः - जगती
स्वरः - निषादः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
प्र꣢ म꣣न्दि꣡ने꣢ पितु꣣म꣡द꣢र्च꣣ता व꣢चो꣣ यः꣢ कृ꣣ष्ण꣡ग꣢र्भा नि꣣र꣡ह꣢न्नृ꣣जि꣡श्व꣢ना । अ꣣वस्य꣢वो꣣ वृ꣡ष꣢णं꣣ व꣡ज्र꣢दक्षिणं म꣣रु꣡त्व꣢न्तꣳ स꣣ख्या꣡य꣢ हुवेमहि ॥३८०॥
स्वर सहित पद पाठप्रं꣢ । म꣣न्दि꣡ने꣢ । पि꣣तुम꣢त् । अ꣣र्चत । व꣡चः꣢꣯ । यः । कृ꣣ष्ण꣡ग꣢र्भाः । कृ꣣ष्ण꣢ । ग꣣र्भाः । निर꣡ह꣢न् । निः꣣ । अ꣡ह꣢꣯न् । ऋ꣣जि꣡श्व꣢ना । अ꣣वस्य꣡वः꣢ । वृ꣡ष꣢꣯णम् । व꣡ज्र꣢꣯दक्षिणम् । व꣡ज्र꣢꣯ । द꣣क्षिणम् । मरु꣡त्व꣢न्तम् । स꣣ख्या꣡य꣢ । स꣣ । ख्या꣡य꣢꣯ । हु꣣वेमहि ॥३८०॥
स्वर रहित मन्त्र
प्र मन्दिने पितुमदर्चता वचो यः कृष्णगर्भा निरहन्नृजिश्वना । अवस्यवो वृषणं वज्रदक्षिणं मरुत्वन्तꣳ सख्याय हुवेमहि ॥३८०॥
स्वर रहित पद पाठ
प्रं । मन्दिने । पितुमत् । अर्चत । वचः । यः । कृष्णगर्भाः । कृष्ण । गर्भाः । निरहन् । निः । अहन् । ऋजिश्वना । अवस्यवः । वृषणम् । वज्रदक्षिणम् । वज्र । दक्षिणम् । मरुत्वन्तम् । सख्याय । स । ख्याय । हुवेमहि ॥३८०॥
सामवेद - मन्त्र संख्या : 380
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 11
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 3;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 11
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 3;
Acknowledgment
भावार्थ - परमात्मा आमच्याबरोबर कसा मित्रतेचा निर्वाह करतो ते पहा! सर्वत्र व्याप्त असलेल्या रात्रीच्या अंधकाराचे निवारण करणे व वृष्टी करणे हे आमचे सामर्थ्य आहे काय? तोच कोणतेही शुल्क न घेता आमच्यावर उपकार करण्यासाठी विविध प्रकारचे कार्य करत आहे. गुरूही आमच्यावर किती उपकार करत असतो, जो संपूर्ण अविद्यारूपी रात्र हटवून, ज्ञानाचा वर्षाव करून आमच्या अंतकरणाच्या भूमीला सरस करतो. त्या परमेश्वराचा व गुरूचा आम्ही सर्व प्रकारे सत्कार करून पूजन केले पाहिजे ॥११॥
टिप्पणी -
या मंत्रावर भरत स्वामीने हा इतिहास लिहिलेला आहे की हे गर्भस्राविणी उपनिषद् आहे. कृष्ण नावाचा एक असुर होता. त्या कृष्णाच्या र्गीावती स्त्रियांना इंद्राने गर्भ नष्ट करण्यासाठी मारले. ऋजिश्वा नावाचा राजर्षि कृष्णासुराचा शत्रू होता. त्याच्या हितासाठी इंद्राने कृष्णासुरांचाही वध केला व त्याला पुत्रही उत्पन्न होऊ नये, या हेतुने त्याच्या गर्भवती बायकांचाही वध केला. सायणनेही आपल्या भाष्यात असाच इतिहास लिहिलेला आहे; परंतु हा कल्पनाविलास आहे. यात मुळीच वास्तविकता नाही. सत्यव्रत सामश्रमीने सायणच्या व्याख्येला अरुचिकर मानून लिहिले आहे - येथे विवरणकाराचे व्याख्यान अधिक उत्कृष्ट आहे, ज्याने आधिदैविक अर्थ करत लिहिलेले आहे की ‘कृष्णगर्भा:’ चे तात्पर्य हे आहे काळ्या मेघात गर्भरूपाने राहणारे जल, ज्याना इंद्र त्यातून काढून वृष्टी करवितो. ‘निरहन’ मध्ये हन् धातु अन्तर्णीतव्यर्थ आहे, ज्याचा अर्थ काढणे किंवा खाली पाडणे असा आहे ॥ या दशतिमध्ये इंद्राची महिमा वर्णित असल्यामुळे, त्याचे स्तोत्र गाण्यासाठी प्रेरणा असल्यामुळे, द्यावा पृथ्वीचेही त्याच धर्माने धृत असल्यामुळे व इंद्र नावाने राजाच्या कर्तव्याचे वर्णन असल्यामुळे, या दशतिच्या विषयाची पूर्व दशतिच्या विषयाबरोबर संगती आहे