Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 90
ऋषिः - वामदेवः कश्यपो वा मारीचो मनुर्वा वैवस्वत अभौ वा
देवता - अग्निः
छन्दः - अनुष्टुप्
स्वरः - गान्धारः
काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
2
जा꣣तः꣡ परे꣢꣯ण꣣ ध꣡र्म꣢णा꣣ य꣢त्स꣣वृ꣡द्भिः꣢ स꣣हा꣡भु꣢वः । पि꣣ता꣢꣫ यत्क꣣श्य꣡प꣢स्या꣣ग्निः꣢ श्र꣣द्धा꣢ मा꣣ता꣡ मनुः꣢꣯ क꣣विः꣢ ॥९०
स्वर सहित पद पाठजा꣣तः꣢ । प꣡रे꣢꣯ण । ध꣡र्म꣢꣯णा । यत् । स꣣वृ꣡द्भिः꣢ । स꣣ । वृ꣡द्भिः꣢꣯ । स꣣ह꣢ । अ꣡भु꣢꣯वः । पि꣣ता꣢ । यत् । क꣣श्य꣡प꣢स्य । अ꣣ग्निः꣢ । श्र꣣द्धा꣢ । श्र꣣त् । धा꣢ । मा꣣ता꣢ । म꣡नुः꣢꣯ । क꣣विः꣢ ॥९०॥
स्वर रहित मन्त्र
जातः परेण धर्मणा यत्सवृद्भिः सहाभुवः । पिता यत्कश्यपस्याग्निः श्रद्धा माता मनुः कविः ॥९०
स्वर रहित पद पाठ
जातः । परेण । धर्मणा । यत् । सवृद्भिः । स । वृद्भिः । सह । अभुवः । पिता । यत् । कश्यपस्य । अग्निः । श्रद्धा । श्रत् । धा । माता । मनुः । कविः ॥९०॥
सामवेद - मन्त्र संख्या : 90
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 9;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 9;
Acknowledgment
भावार्थ - जेव्हा जीवात्मा मृत्यूच्या वेळी शरीरातून निघतो तेव्हा सूक्ष्म शरीर त्याच्याबरोबर वर्तमान असते व सूक्ष्म शरीरस्थ चित्तात धर्माधर्म नावाचे शुभाशुभ कर्मसंस्कार आत्म्याबरोबर जातात. धर्माने तो मनुष्य-जन्म व अधर्माने पशु-पक्षी इत्यादीचा जन्म प्राप्त करतो. जीवात्मा ज्ञानग्रहण करण्यास सामर्थ्यवान असल्यामुळे कश्यप अर्थात् द्रष्टा आहे, त्यासाठी त्याला संपूर्ण ज्ञान-विज्ञानाचा संचय केला पाहिजे. कारण परमेश्वर त्याचा शरीरदाता आहे. त्यासाठी पित्याच्या महत्तेचा विचार करून त्याला जीवनात श्रद्धेला मातेप्रमाणे स्वीकारले पाहिजे व स्वत: मननशील व मेधावी बनले पाहिजे ॥१०॥
टिप्पणी -
जे लोक हे म्हणतात, की कश्यप ऋषीचे नाव आहे, श्रद्धा देवीचे नाव आहे व मनुने वैवस्वत मनुचे ग्रहण होते, त्यांचे मत वेदात लौकिक इतिहास नसल्यामुळे योग्य नाही. या दशतिमध्ये परमात्म्याचे यश, तेज, धन, बल इत्यादीची प्रार्थना, परमात्म्याच्या प्रभावाचे वर्णन, अतिथी परमात्म्याला हव्यसमर्पण व त्याच्या पूजेची प्रेरणा असल्यामुळे व परमात्म्याला पिता व श्रद्धेला माता या रूपाने वर्णित करण्याने या विषयाची पूर्वदशतिबरोबर संगती आहे, हे जाणा