Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 127
ऋषिः - भारद्वाजः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
य꣡ आन꣢꣯यत्परा꣣व꣢तः꣢ सु꣡नी꣢ती तु꣣र्व꣢शं꣣ य꣡दु꣢म् । इ꣢न्द्रः꣣ स꣢ नो꣣ यु꣢वा꣣ स꣡खा꣢ ॥१२७॥
स्वर सहित पद पाठयः꣢ । आ꣡न꣢꣯यत् । आ꣣ । अ꣡न꣢꣯यत् । प꣣राव꣡तः꣢ । सु꣡नी꣢꣯ती । सु । नी꣣ति । तुर्व꣡श꣢म् । य꣡दु꣢꣯म् । इ꣡न्द्रः꣢꣯ । सः । नः꣣ । यु꣡वा꣢꣯ । स꣡खा꣢꣯ । स । खा꣣ ॥१२७॥
स्वर रहित मन्त्र
य आनयत्परावतः सुनीती तुर्वशं यदुम् । इन्द्रः स नो युवा सखा ॥१२७॥
स्वर रहित पद पाठ
यः । आनयत् । आ । अनयत् । परावतः । सुनीती । सु । नीति । तुर्वशम् । यदुम् । इन्द्रः । सः । नः । युवा । सखा । स । खा ॥१२७॥
सामवेद - मन्त्र संख्या : 127
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 2;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 2;
Acknowledgment
विषय - आता इंद्र हेही ज्याचे नाव, त्या परमेश्वराच्या, विद्युतेच्या आणि राजाच्या मैत्रीची याचना केली आहे -
शब्दार्थ -
प्रथम अर्थ (परमेश्वरपर) - (यः) जो (परावतः) दूर अंतरावरील (त्याच्या प्रार्थना, उपास नादीपासून दूर) असलेल्या (यदुम्) यत्नशील मनुष्याला (सुनीती) उत्तम नीतीची प्रेरणा देऊन त्याला (तुर्षशम्) आपल्याजवळ (आनयत्) आणून घेतो (सः) तो (युवा) सदा युवकाप्रमाणे सशक्त असणारा (इन्द्रः) परमेश्वर) (नः) आमचा (सखा) सहायक मित्र व्हावा. (परमेश्वर यत्नशील उद्योगी मनुष्याला सदाचार व सुनीतीची प्रेरणा देतो)।।
द्वितीय अर्थ - (विद्युतपर) - (यः) विमान आदी यानांमध्ये प्रयुक्त होणारी जी विद्युत ऊर्जा शक्ती (यदुम्) परिश्रमी, उद्योगी मनुष्याला (परावतः) त्यंत दूर असलेल्या स्थाना (देश वा प्रदेशावरून) (तुर्वशम्) मनोवांष्लित वेगाने (सुनीती) उत्तम प्रकारे साथ देत म्हणजे त्याला कोणत्याही प्रकाराचा त्रास, बाधा न येऊ देता (आनयत्) दूर दूरवरच्या देश - प्रदेशात नेते (सः) ती सर्वज्ञात ऊर्जा विद्युत (युवा) यंत्रात प्रयुक्त होऊन पदार्थांच्या संयोजन वियोजन क्रियेद्वारे विविध पदार्थांच्या निर्माणात साधनभूत होते. ती (इन्द्रः) विद्युत शख्ती (नः) आमची (सखा) मित्र वा सहायक होऊन र्कासाधिका व्हावी (अशी आम्ही वैज्ञानिकजन कामना करतो) ।।
तृतीय अर्थ - (राजापर) - (यः) जो राजा (पारवतः) अदम मार्गापासून दूर करून (यदुम्) प्रयत्नशील, उद्यमी (तुर्वशम्) आणि ज्याचे सामर्थ्य हिंसक लोकांनाही वश करण्याएवढे सक्षम आहे, अशा माणसाला (सुनीती) उत्कृष्ट धर्म मार्गावर (आनयत्) चालावयास प्रेरित करतो (सः) असा तो (युवा) शरीराने, मनाने व आत्मिक शक्तीने संपन्न (इन्द्रः) अधर्मादीचा विदारक राजा (नः) आम्हा प्रजाजनांसाठी (सखा) मित्र म्हणून असावा (अशी आमची कामना आहे) ।। ३।।
भावार्थ - जसा विमानादी यानांमध्ये प्रयुक्त होणारा विद्युत रूप अग्नी विमान चालकांच्या इच्छेप्रमाणे लोकांना अति दूरस्थ प्रदेशाहूनही देशान्तरापर्यंत नेतो अथवा जसा एक सुयोग्य राजा अधर्म मार्गावर दूरपर्यंत गेलेल्या (अधर्म कार्यात आकंठ बुडालेल्या) प्रजाजनांना अधर्म मागापासून दूर करून धर्ममार्गावर चालण्यास प्रवृत्त करतो, त्याचप्रमाणे परमेश्वर प्रगतीसाठी धडपडणाऱ्या पण क्रुसंगामध्ये सापडून सन्मार्गापासून दूर गेलेल्या माणसाला कृपा करून आपल्याजवळ आणून (त्यास प्रेरणा देऊन) धार्मिक व्यक्ती बनवतो. ।। ३।। या मंत्राची व्याख्या करताना विवरणकाराने असे लिहिले आहे की तुर्वश आणि यदु नावाचे दोन राजपुत्र होते. याचप्रमाणे भरत स्वामी आणि सायणनेदेखील म्हटले आहे की तुर्वश व यदु नावाचे दोन राजा होऊन गेले. ज्यांना त्यांच्या शत्रूने दूर कुठे तरी नेऊन सोडले होते. आपल्या उत्तम युद्धनीतीचा वापर करून इन्द्र त्या राजांना दूर देशाहून पर त्यांच्या राज्यात घेऊन आला होता. हाच त्या विवरणकारांचा अभिप्राय आहे. पण खरे पाहता हे सर्व प्रलाप मात्र आहे. कारण वेद सृष्टीच्या आरंभ काळात परब्रह्म परमेश्वराकडून प्रादुर्भूत झाले होते. त्यामुळे त्यात कुणा परनर्ती राजा आधीचा इतिहास असणे संभवनीय नाही. या व्यतिरिक्त वैदिक कोष ‘निघण्टु’मध्ये ‘तुर्वश’ शब्द मनुष्य वाचक आणि समीपतावाचक शब्दात गणला गेला आहे आणि ‘यदु’ शब्ददेखील मनुष्यवाची शब्दात पठित आहे. यामुळे तुर्वश आणि यदु यांना कोणी ऐतिहासिक राजा मानणे मुळीच उचित होऊ शकत नाही. ।। ३।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे ।। ३।।